Tata Punch EV Facelift: भारतीय बाजारात अखेर टाटा मोटर्सने Punch EV Facelift लाँच केली आहे. Tata Punch EV ची सुरुवातीची एक्स शोरुम किंमत ९.६९ लाख रुपये ठेवण्यात आली आहे. तर याच्या टॉप व्हेरिएंटची किंमत १२.५९ लाख रुपये ठेवण्यात आली आहे. कंपनी बॅटरी एज-ए-सर्व्हीस ( BaaS ) चा पर्याय देखील देत आहे, त्यामुळे या अंतर्गत सुव्ह ६.४९ लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीवर खरेदी केली जाऊ शकते. या प्लानमध्ये ग्राहकांना बॅटरीच्या भाड्याच्या रुपाने प्रति किलोमीटर २.६ रुपये द्यावे लागतील. याची बुकींग ऑनलाईन आणि डिलरशिप दोन्ही ठिकाणी सुरु झाली आहे. हे मॉडेल MR आणि LR सारख्या वेगवेगळ्या रुपात उपलब्ध आहे.
Tata Punch EV Facelift
या अपडेट सोबत कंपनीचे टार्गेट या मायक्रो इलेक्ट्रीक एसयुव्हीला येत्या काळासाठी तयार करणे आहे. पंच ईव्ही फेसलिफ्ट कॉम्पॅक्ट डायमेन्शन आणि एसयुव्ही सारख्या डिझाईन सह येणार आहे. भारतीय बाजारात या कारचा मुकाबला सिट्रोएन ईसी ३ शी होईल.पंच ईव्हीच्या बंपरच्या डिझाईनमध्ये काही बदल केले आहेत. या बदलांमुळे ही कार डिझाईनच्या बाबतीत नेक्सॉन ईव्ही आणि हॅरियर ईव्ही सारख्या अन्य कारसारखी दिसत आहे.
Tata Punch EV फीचर्स
या कार मध्ये Apple CarPlay, Android Auto, फ्रंट व्हेंटिलेटेड सिट्स, कूल्ड ग्लोव्हबॉक्स, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, 10-इंचाचा इंफोटेनमेंट स्क्रीन, व्हॉईस असिस्टेंट, 360-डिग्री कॅमरा, रिअर वायपर आणि डिफॉगर, ESP आणि सहा एअर बॅग्स स्टँडर्ड फिचर्स म्हणून मिळत आहेत.
Tata Punch EV इंटेरिअर
पंच ईव्हीच्या इंटेरिअरमध्ये काही बदल केले आहेत. यात आता दहा इंचाचा इन्फोटेन्मेंट स्क्री , डिजिटल इंस्ट्रुमेंट क्लस्टर आणि चमकत्या लोगोसह दोन स्पोकचा स्टिअरिंग व्हिल देण्यात आला आहे. सेंटर कन्सोलमध्ये टच ऑपरेटेड कंट्रोल आणि रोटरी डायल देखील आहे. लेदरेट अपहोल्ट्री आणि डॅशबोर्डवर ड्युअल-टो शेड्ससोबत कन्सोलमध्ये रोटरी डायलचा वापर यामुळे ही कार दमदार झाली आहे.
Tata Punch EV चे सेफ्टी फिचर्स
सेफ्टी फिचर्ससाठी होल्ड असिस्ट, सहा एअर बॅग्स, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलीटी प्रोग्रॅम, आय-टीपीएमएस आणि आयसोफिक्स माऊंट सारख्या मानक फिचर्स सर्वच मॉडेलमध्ये मिळत आहेत. टाटा पंच ईव्ही फेसलिफ्ट १९५ मिमीचा ग्राऊंड क्लिअरन्स आणि ४५० मिमीसोबत येते.कारचा कर्ब वेट १३६० किलोग्रॅम आहे. ज्यामुळे कारला चांगली स्थिरता मिळते.
Tata Punch
टाटा पंच ईव्हीत तीन चार्जिंग ऑप्शन दिले आहेत
डीसी फास्ट चार्जर- सीसीएस 2
वॉल बॉक्स चार्जर- 7.2 किलोवॅट
होम चार्जर- 3.3 किलोवॅट
Tata Punch EV बॅटरी पॅक आणि रेंज
Tata Punch EV फेसलिफ्ट मध्ये मोठी 40kWh बॅटरी पॅक दिलेला आहे.ARAI च्यानुसार या कारची कमाल रेंज ४६८ किमी आहे. तर रोजच्या वापरासाठी सुमारे ३५५ किमीची रेंज ही कार देते. यासोबत 30kWh बॅटरीचा पर्याय देखील मिळतो. ज्यामुळे ३६५ किमीची रेंज मिळते. डीसी फास्ट चार्जर मुळे २० ते ८० टक्क्यांपर्यंत चार्ज करण्यास २६ मिनिटे लागतात. आणि केवळ १५ मिनिटांच्या चार्जिंगने सुमारे १३५ किमीचे अंतर कापता येते. कंपनी बॅटरीवर लाईफटाईम वॉरंटी देखील देत आहे. हे मॉडेल Acti.ev प्लेटफॉर्मवर बेस्ड आहे.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
- पुणे: लवळे फाट्या जवळ भीषण साखळी अपघात! सिमेंटचा ट्रक, डंपर, टेम्पो आणि दोन दुचाकींमध्ये जोरदार धडक; एक जण जागीच ठार, दोघे गंभीर जखमी
- पुणे: म्हाळुंगे-नांदे रोडवर मोठा अपघात! चालकाला डुलकी लागल्याने कर्नाटक पासिंगचा आरएमसी ट्रक उलटला; रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप
महाराष्ट्र
- पुणे: सरकारला फुले-आंबेडकरी विचारांची ताकद बघायची आहे का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा संतप्त सवाल
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- कोल्हापूर: गांधी जयंतीनिमित्त कोल्हापुरात अनोखी परंपरा! कारागीर फिरोज सत्तारमेकर यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यास सर्वप्रथम अर्पण केली पुष्पमाला
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?























Subscribe to my channel




