अमेरिकेने चीनवर पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत, गलवानमध्ये उफाळलेल्या संघर्षापूर्वी काही दिवस आधी चीनने सीक्रेट न्यूक्लियर टेस्ट केली होती, असा दावा अमेरिकेकडून करण्यात आला आहे, अमेरिकेच्या या आरोपानंतर आता दोन्ही देशांमधील तणाव पुन्हा एकदा वाढला आहे, अमेरिकेनं केलेल्या दाव्यावर चीनने देखील प्रतिक्रिया दिली आहे. चीनने 22 जून 2020 साली एक सीक्रेट न्यूक्लिअर टेस्ट केली होती, ही घटना गलवानमध्ये भारत आणि चीनमध्ये झालेल्या संघर्षानंतर करण्यात आली होती, या संघर्षामध्ये भारताने आपल्या वीस सैनिकांना गामावलं, त्यानंतर चीनने 22 जून 2020 साली एक सीक्रेट न्यूक्लिअर टेस्ट केली, असा दावा अमेरिकेनं केला आहे.
अमेरिका एवढ्यावरच थांबली नाही, तर चीनने न्यूक्लिअर टेस्ट लपवण्याचा प्रयत्न केला असंही यावेळी अमेरिकेनं म्हटलं आहे. अमेरिकेचे शस्त्रास्त्र नियंत्रण आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा विभागाचे उप-सचिव थॉमस डीनॅनो यांनी केलेल्या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे. चीनने जी न्यूक्लिअर टेस्ट केली होती, त्याची माहिती अमेरिकेला होती. चीनी सैन्याने न्यूक्लिअर स्फोट लपवण्याचा प्रयत्न केला, कारण अशी टेस्ट उघडपणे करणं हे न्यूक्लिअर टेस्ट संदर्भातील आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन ठरेल हे त्यांना माहिती होतं, असा दावा थॉमस डीनॅनो यांनी केला आहे.
दरम्यान त्यानंतर आता चीनकडून देखील अमेरिकेच्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. चीनचे राजदूत शेन जिआय यांनी म्हटलं आहे की, आमच्या हे आता लक्षात आलं आहे की, अमेरिका चीनपासून जगाला न्यूक्लिअरचा धोका आहे, हे सांगण्यासाठी या प्रकारचे दावे करत आहे, अमेरिकेकडून हे आमच्यावर खोटे आरोप केले जात आहेत. आम्ही अमेरिकेकडून करण्यात येणाऱ्या या खोट्या आरोपांचा तीव्र शब्दात निषेध करतो, शस्त्रास्त्र वाढवण्याच्या स्पर्धेत जर कोणी दोषी असेल तर त्यामध्ये अमेरिका पहिल्या स्थानावर आहे, असं चीनने म्हटलं आहे, दरम्यान चीनने दिलेल्या प्रत्युत्तरानंतर आता अमेरिका आणि चीनमधील संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे. चीनकडून अमेरिकेचा हा दावा फेटाळून लावण्यात आला आहे.
शहर
- महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम: पुढील ५ दिवस सतर्कतेचा इशारा; शाळा-महाविद्यालयांच्या सुट्टीबाबतचे ताजे अपडेट्स
- झारखंड हादरले! अनैतिक संबंधांतून पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा केला भीषण खून; आरोपींना बेड्या
- शिक्षकांची जिद्द! २० वर्षांपासून बंद असलेली नांदेडमधील जिल्हा परिषद शाळा शिक्षकांच्या पुढाकाराने पुन्हा गजबजली
- कोल्हापूरच्या भुदरगडमध्ये 'मॅग्नेटिक पॉइंट'? उताराऐवजी चढाच्या दिशेनं धावतेय न्यूट्रल गाडी; व्हिडिओ व्हायरल
महाराष्ट्र
- महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम: पुढील ५ दिवस सतर्कतेचा इशारा; शाळा-महाविद्यालयांच्या सुट्टीबाबतचे ताजे अपडेट्स
- शिक्षकांची जिद्द! २० वर्षांपासून बंद असलेली नांदेडमधील जिल्हा परिषद शाळा शिक्षकांच्या पुढाकाराने पुन्हा गजबजली
- कोल्हापूरच्या भुदरगडमध्ये 'मॅग्नेटिक पॉइंट'? उताराऐवजी चढाच्या दिशेनं धावतेय न्यूट्रल गाडी; व्हिडिओ व्हायरल
- पुणे: मुंबई द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पाचे स्वतंत्र ऑडिट करा; सुप्रिया सुळेंची मागणी
गुन्हा
- तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा! कामावर निघालेल्या ५० वर्षीय महिलेला पार्कमध्ये ओढत नेऊन अत्याचार
- क्रूरतेचा कळस! इमारतीवरून ढकलूनही पती वाचला; शेवटी प्रियकराच्या सांगण्यावरून 'कॅन्यूला'मधून दिले टॉयलेट क्लीनरचे इंजेक्शन
- RTO विभागातील भ्रष्टाचाराची SIT द्वारे होणार चौकशी; दोषींवर होणार कठोर कारवाई!
- पुणे: व्हॉट्सॲप चॅटमध्ये गुपिते उघड चॅटमध्ये सिया आणि चेतन यांनी एकमेकांशी केलेल्या 'सिक्रेट लग्ना' बद्दल माहिती
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- पावसाळी आरोग्य इशारा: कॅन्सर रुग्ण आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या व्यक्तींनी राहावे सावधान!
- व्हॉट्सॲपवरूनच बनवा आयुष्मान कार्ड; केंद्र सरकारचा ‘आयुष्मान सारथी’ चॅटबॉट लाँच!
- आज ७ जुलै रोजी या राशींवर बरसेल धन, वाचा तुमचे आर्थिक भविष्य
- पावसाळ्यातील फंगल इन्फेक्शनपासून राहा सुरक्षित; त्वचेच्या आरोग्यासाठी 'या' सोप्या टिप्स नक्की फॉलो करा!
मनोरंजन
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-इंग्लंड तिसरा टी२०: टीम इंडियात मोठे बदल; रवी बिश्नोई बाहेर, तर वैभव सूर्यवंशीवर सर्वांचे लक्ष!
- तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा! कामावर निघालेल्या ५० वर्षीय महिलेला पार्कमध्ये ओढत नेऊन अत्याचार
- क्रूरतेचा कळस! इमारतीवरून ढकलूनही पती वाचला; शेवटी प्रियकराच्या सांगण्यावरून 'कॅन्यूला'मधून दिले टॉयलेट क्लीनरचे इंजेक्शन
- तेलंगणा: प्रियकरासाठी पत्नीने नर्स असूनही सलाईनमध्ये टॉयलेट क्लीनर टाकून नवऱ्याचा केला गेम

























Subscribe to my channel

