Mayuri Chaudhari Death : चेन्नईमध्ये फिरायला गेलेल्या महाराष्ट्रातील 26 विद्यार्थ्यांच्या एका समूहासोबत अत्यंंत दुर्दैवी घटना घडली आहे. तामिळनाडूतील गोल्डन बिचवर फिरायला गेलेल्या या विद्यार्थ्यांपैकी तीन विद्यार्थी पाण्यात अडकल्याचे समोर आले आहे. यात एका मयुरी चौधरी नावाच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यात जय पाटील नावाचा विद्यार्थीदेखील गायब आहे. तर राज केदारी या तिसऱ्या विद्यार्थ्याला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे. ही दुर्घटना समजताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तामिळाडूच्या सरकारशी संपर्क साधला आहे. तसेच गायब झालेल्या विद्यार्थ्याचा शोध घ्यावे, असे आवाहन केले आहे.
चेन्नईला फिरायला गेली होती मयुरी
मिळालेल्या माहितीनुसार जय पाटीलचे पालक चेन्नईत पोहोचले आहेत. तर मयुरी चौधरीचे कुटुंबीय नागपूरहून चेन्नईच्या दिशेने रवाना झाले आहेत. मयुरी चौधरी ही मुळची भंडारा जिल्ह्यातील वरठी येथील रहिवासी आहे. ही घटना समोर आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मयुरीच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या. त्यांनी रेस्क्यू ऑपरेशनला गती द्यावी, अशी विनंती तामिळनाडू सरकारकडे केल आहे. तसेच आम्ही विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांच्या संपर्कात आहोत, असेही मुख्यमंत्री कार्यालयाने सांगितले आहे.
मयुरीच्या मैत्रिणीने दिली माहिती
मिळालेल्या माहितीनुसार मयुरीने 15 दिवसांपूर्वीच नोकरीला सुरुवात केली होती. शनिवारी सुटी असल्याने ती आपल्या सहकाऱ्यांसोबत फिरायला गेली होती. परंतु पाण्यात गेल्यानंतर एकूण तीन जण अडकले. यात मयुरीचा मृत्यू झाला. या घटनेबाबत तिच्या मैत्रिणीने सांगितले आहे.
मयुरीचा मृतदेह कुटुंबीयांकडे सोपवण्याची मागणी
दरम्यान ही घटना समोर आल्यानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मयुरीचा मृतदेह लवकरात लवकर आमच्या ताब्यात द्यावा, अशी मागणी तिच्या कुटुंबीयांकडून केली जात आहे. शवविच्छेदन केल्यनंतर मयुरीचा मृतदेह तिच्या कुटुंबीयांकडे सोपवला जाईल. तर जय पाटीलचा रेस्क्यू टीमकडून शोध घेतला जात आहे. ही घटना समोर येताच आता फिरायला गेल्यानंतर योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे, असे मत व्यक्त केले जात आहे. सोबतच फिरायला गेल्यानंतर तरुणाईने योग्य ते भान राखूनच आनंद घ्यायला हवा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
- पुणे: लवळे फाट्या जवळ भीषण साखळी अपघात! सिमेंटचा ट्रक, डंपर, टेम्पो आणि दोन दुचाकींमध्ये जोरदार धडक; एक जण जागीच ठार, दोघे गंभीर जखमी
- पुणे: म्हाळुंगे-नांदे रोडवर मोठा अपघात! चालकाला डुलकी लागल्याने कर्नाटक पासिंगचा आरएमसी ट्रक उलटला; रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप
महाराष्ट्र
- पुणे: सरकारला फुले-आंबेडकरी विचारांची ताकद बघायची आहे का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा संतप्त सवाल
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- कोल्हापूर: गांधी जयंतीनिमित्त कोल्हापुरात अनोखी परंपरा! कारागीर फिरोज सत्तारमेकर यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यास सर्वप्रथम अर्पण केली पुष्पमाला
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?























Subscribe to my channel




