गोंदियातील शिंदे समर्थक आमदाराच्या कार्यालयावर शिवसैनिकांचा हल्ला

गोंदिया : गोंदिया विधानसभा क्षेत्राचे अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांच्या कार्यालयावर आज सोमवारी दुपारी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. गोंदिया विधानसभा मतदारसंघातून निवडून गेलेले अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांनी सुरुवातीला महाविकास आघाडीला साथ दिली. नंतर त्यांनी भारतीय जनता पक्षाला पाठिंबा जाहीर केला. आता आपण भाजप व एकनाथ शिंदे यांच्या सोबत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे आज सोमवारी गोंदियात त्यांच्या या प्रतिक्रियेचे पडसाद उमटले. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या कार्यालयात तोडफोड केली. हल्ल्याविरोधात अग्रवाल समर्थकांनी गोंदिया शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली व आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी आंदोलन सुरू केले आहे. पोलिसांकडे तक्रार दाखल करताना आमदाराचे मोठे बंधू व सचिव.

 



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *