खळबळजनक! बसमध्ये आढळला कुजलेल्या अवस्थेत मृतदेह

वसई/विरार - विरार पूर्व मनवेल पाडा परिरासत एका व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आनंद नावाच्या या खाजगी बसमध्ये हा मृतदेह आढळून आला आहे. हा मृतदेह एक पुरुषाचा असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली होती. स्थानिक नागरिकांना जेव्हा बस तपासली तेव्हा हा मृतदेह त्यांना आढळून आला.

त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. घटनास्थळी विरार पोलीस दाखल झाले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. विरार पूर्व मनवेल पाडा परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या खजिगी बस पार्कींग केल्या जातात. त्यामुळे तळीराम व इतर नशा करणारे या परिसरात पार्ट्या करतात. स्थानिकांनी अनेक वेळा पालिका व पोलिसांना तक्रार करून देखील या परिसरात कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *