शरद पवारांच्या घरावरील हल्ला प्रकरण : DCP ना हटवले

मुंबई: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानावर हल्ला झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी DCP झोन २ चे पोलीस उपायुक्त योगेश कुमार यांना त्यांच्या पदावरुन तात्पुरते हटवण्यात आले आहे. डीसीपी, डिटेक्शन, नीलोत्पल यांना झोन 2 चा प्रभार देण्यात आला आहे.

आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी कालच्या प्रकरणावरुन पोलिसांवर नाराजी व्यक्त केली होती. आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि मुंबई पोलीस आयुक्त पांडे यांच्यासोबत बैठक घेतली होती. या बैठकीत त्यांनी आयुक्त पांडे यांना अहवाल देण्याचे आदेश दिले होते.

एसटी कर्मचारी आंदोलनाची माहिती पोलिसांना का मिळाली नाही, असा प्रश्न सगळीकडून होत होता. अचानक एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन करुन शरद पवार (Sharad Pawar) यांच्या निवासस्थानी दगडफेक केली होती. या घटनेनंतर राज्यातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *