आपल्यापैकी अनेकांनी आजूबाजूला अशी अनेक मुले पाहिली असतील, ज्यांनी कधी जेवण बनवण्यात मदत केलेली नाही. काही मुलांचे इतके लाड केले जातात की त्यांनी स्वतःची खोलीही कधी स्वच्छ केलेली नसते. याचे कारण असे की, अनेक पालक स्वतः ज्या अडचणींमधून गेलेत, त्या अडचणींचा सामना आपल्या मुलांना करावा लागू नये यासाठी ते कष्ट करतात. ते आपल्या मुलांना चांगले अन्न, आरामदायी घर, महागडे गॅझेट्स, वाहतुकीची साधने आणि सर्व शक्य सुखसोयी पुरवतात. मात्र, यामुळे मुले या सर्व सुविधांना कोणाच्या तरी कष्टांचे फळ मानण्याऐवजी स्वतःचा हक्क समजू लागण्याची शक्यता असते. आता मी आपल्याला एका अशा शिबिरात घेऊन जातो, जे वर वर्णन केलेल्या दृश्यापेक्षा पूर्णपणे वेगळे आहे. येथे आपल्याला 10 वर्षांचे एक मूल बटाट्याच्या शेतात खणून बटाटे काढताना दिसेल. 7 वर्षांचे मूल डुकरांच्या फार्ममध्ये चारा नेताना दिसेल. 15 वर्षांचा मुलगा घोड्याला आंघोळ घालून तबेला स्वच्छ करत असेल. येथे 6 ते 16 वर्षांपर्यंतची मुले जनावरांचे शेण काढताना, जळतण तोडताना आणि जेवण बनवतानाही दिसू शकतात. संपूर्ण महिनाभर एवढे कष्ट करूनही या मुलांना त्या बदल्यात कोणतेही पैसे दिले जात नाहीत. उलट, त्यांचे पालक त्यांना अशा ‘हार्डशिप कॅम्प’मध्ये पाठवण्यासाठी दीड लाख रुपयांपर्यंत शुल्क भरतात. ही शिबिरे प्रामुख्याने नैऋत्य चीनमधील ग्रामीण भागात चालवली जातात. आपल्या मुलांना कष्ट आणि पैशाचे महत्त्व शिकवण्याची इच्छा असणाऱ्या चिनी पालकांमध्ये या प्रकारच्या शिबिरांबद्दलची उत्सुकता सातत्याने वाढत आहे. आता प्रश्न असा की, पालक आपल्या मुलांना अडचणींपासून वाचवण्यात इतके यशस्वी झालेत का की, एकेकाळी साधे जीवन सहज आणि मोफत शिकवायचे, ते सर्व धडे शिकवण्यासाठी आता त्यांना इतरांना पैसे द्यावे लागत आहेत? याचे उत्तर आहे- हो. याच कारणामुळे पालक आपल्या लाडक्या मुलांना वेगाने लोकप्रिय होत असलेल्या या समर प्रोग्राम्समध्ये पाठवत आहेत. सिचुआन, गुइझोऊ आणि युन्नानसारख्या भागांत आयोजित या शिबिरांत शहरातील मुलांना ग्रामीण जीवनाचा अनुभव दिला जातो. या दरम्यान त्यांना मोबाइल फोन आणि इंटरनेटपासून दूर ठेवले जाते. या सर्वांचा उद्देश मुलांच्या बालपणात अडचणी आणणे नव्हे तर त्यांना जीवनातील आव्हानांना तोंड देण्यास सक्षम बनवणे हा आहे. कठोर परिश्रम मुलांना अपयशाशी लढायलाही शिकवतात. जेव्हा त्यांना एखादे काम पूर्ण करण्यासाठी संघर्ष करावा लागतो, तेव्हा ती संयम शिकतात. चुका झाल्यावर त्या सुधारण्यास शिकतात. स्वतःच्या कष्टाने मिळवलेल्या गोष्टींचे मोलही त्यांना अधिक समजते. सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे, गैरसोयींचा सामना करावा लागणे म्हणजे नेहमी पराभव स्वीकारणे नव्हे, तर कधीकधी ती पुढे जाण्याची संधीही असते, हे त्यांच्या लक्षात येऊ लागते. या शिबिरांच्या चालकांचे म्हणणे आहे की, शहरातील सुविधांयुक्त जीवनाची सवय झालेल्या मुलांना स्वतः कष्ट करून पैसे कमावणे किती कठीण असते, याची जाणीव करून देणे हा त्यांचा उद्देश आहे. स्मार्टफोनच्या अतिवापराची सवय मोडणे, खाण्यापिण्यातील नखरे आणि आळसाची प्रवृत्ती दूर करणे तसेच पालकांच्या कष्टांबद्दल मुलांच्या मनात कृतज्ञतेची भावना निर्माण करणे, हेही आपले ध्येय असल्याचे ते सांगतात. या उपक्रमांमध्ये मुले सहभागी होत असल्याने, त्यांच्याकडून त्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त शारीरिक श्रम करवून घेतले जाणार नाहीत, याची बहुतांश संचालक काळजी घेतात. त्याचबरोबर, काम आणि विश्रांती यांच्या दरम्यान त्यांच्यासाठी मनोरंजक उपक्रमांची व्यवस्थाही केली जाते. या शिबिरांमुळे मुलांच्या सवयी खरोखरच बदलतात का? या प्रश्नावर तज्ज्ञ आणि पालकांचे मत विभागलेले आहे. शिक्षण तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, थोड्या वेळेसाठी करवून घेतलेल्या कठीण शारीरिक श्रमाचा मुलांची जीवनशैली आणि सवयींमधील सुधाराशी थेट संबंध जोडला जाऊ नये. एखाद्या मुलाला कठीण परिस्थितीत ठेवल्यास ते काही काळासाठी आत्मपरीक्षण करताना दिसले, तरी ती तणावावरील त्याची तात्कालिक प्रतिक्रिया असू शकते. केवळ ‘अडचणी सहन करण्याचा’ अनुभव ही स्वतःहून चारित्र्यनिर्मितीची हमी ठरू शकत नाही. तरीही, शहरात वाढलेल्या मुलांना अशा शिबिरांमध्ये श्रमाचा प्रत्यक्ष अनुभव देणे केवळ शैक्षणिक दृष्ट्या उपयुक्त ठरले नाही, तर शिबिरातून परतल्यानंतर त्यांच्या वर्तनातही सकारात्मक बदल दिसून आल्याचे काही पालकांचे म्हणणे आहे. ती मुले पूर्वीपेक्षा अधिक संवेदनशील आणि दयाळू झाली आहेत. आपल्याला भारतात अशा विंटर कॅम्प्सबद्दल जाणून घ्यायचे असल्यास, मला नक्की लिहा. फंडा हा आहे की, केवळ आपल्या मुलांचे जीवन आरामदायी बनवण्यासाठीच कष्ट करू नका. ती स्वतः कष्ट करण्यास सक्षम व्हावीत, यासाठीही प्रयत्न करा. आरामदायी बालपण हा एक विशेषाधिकार आहे, पण कठीण परिस्थितीला तोंड देण्याची क्षमता ही आयुष्यभर उपयोगी पडणारी खरी पुंजी आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: पिंपरी-चिंचवडच्या मारुंजी परिसरात थरकाप उडवणारी घटना: चालकाला चालत्या गाडीतच हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने भीषण अपघात, उपचारापूर्वीच मृत्यू
- पुणे: मुंढवा जॅकवेलचे ५ पंप सुरू; शेतीसाठी दररोज ४५ कोटी लिटर पाणी सोडण्यास सुरुवात, अखेर जलसंपदा विभागाला आली जाग
- पुणे: शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक वादाच्या भोवऱ्यात मतदानासाठी 'स्पायकॅम पेन' आणि पैसे वाटपाचे गंभीर आरोप, राजकीय वातावरण तापले
- नाशिक: शालार्थ आयडी घोटाळा उच्च न्यायालयाकडून अमोल कुलकर्णीचा अटकपूर्व जामीन फेटाळला, बनावट कागदपत्रांच्या आधारे कोट्यवधींची फसवणूक उघड
महाराष्ट्र
- पुणे: हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचे उद्घाटन अनिश्चित काळासाठी स्थगित, पंतप्रधानांच्या दौऱ्यावरील अनिश्चितता ठरली कारण
- पुणे: पिंपरी-चिंचवडच्या मारुंजी परिसरात थरकाप उडवणारी घटना: चालकाला चालत्या गाडीतच हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने भीषण अपघात, उपचारापूर्वीच मृत्यू
- पुणे: मुंढवा जॅकवेलचे ५ पंप सुरू; शेतीसाठी दररोज ४५ कोटी लिटर पाणी सोडण्यास सुरुवात, अखेर जलसंपदा विभागाला आली जाग
- पुणे: शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक वादाच्या भोवऱ्यात मतदानासाठी 'स्पायकॅम पेन' आणि पैसे वाटपाचे गंभीर आरोप, राजकीय वातावरण तापले
गुन्हा
- गडचिरोली: दारू तस्करीची भन्नाटक्कल उघड: दुचाकींच्या पेट्रोल टाकी अन् सीट कव्हरमध्ये लपवून नेली जात होती दारू, २.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त!
- मुंबई: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण ९वीत नापास, वेल्डिंगचे काम अन् जुना गुन्हेगारी रेकॉर्ड; असा आहे शार्प शूटर रेहानचा प्रवास!
- सातारा: सोन्याच्या दागिन्यांची थोरांडी चोरी! बायकोसाठी हार घ्यायचा बहाणा करून फोटो काढण्याच्या बहाण्याने चोरटा १४ लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन पसार!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: दिल्लीतील व्यापाऱ्यांचे राहुल गांधींना पत्र; रामलळा मैदानातील रॅली पुढे ढकलण्याची मागणी, १०,००० कोटी रुपयांच्या नुकसानीचा इशारा
- नवी दिल्ली: राजधानी दिल्लीत एसआयआरविरोधातील आंदोलने अधिक तीव्र १४५ संघटनांचे एकत्र येऊन निवडणूक आयोगावर धडक मोर्चा, राकेश टिकैतही मैदानात
- गोवा: एआय धोरण २०२६ जाहीर तरुणांना प्रशिक्षण, स्टार्टअप्सला चालना आणि तंत्रज्ञान क्रांतीच्या दिशेने मोठी झेप!
- उत्तर प्रदेश: मनेागरणात डेंगूमुळे पतीचा मृत्यू, पाठोपाठ पत्नीनेही दम तोडला; एकाच चितेवर झाले अंत्यसंस्कार


























Subscribe to my channel




