एन. रघुरामन यांचा कॉलम:सर्व्हिलन्स प्रायसिंगचे बळी तर होत नाही ना…

अलीकडेच मी लॅपटॉप ठेवण्यासाठी एक उंच व वक्र आकाराचे सेंटर टेबल विकत घेतले. घरी आलेल्या एका नातेवाइकाला ते इतके आवडले की ते त्यांनी सोबत नेले. स्वतःसाठी पुन्हा ऑर्डर करण्यासाठी मी मोबाइल पाहिला. तेव्हा मला धक्काच बसला. ते टेबल 20% महाग झाले होते. पत्नीने तिच्या मोबाइलवर तेच टेबल शोधले. तेव्हा त्याची किंमत माझ्या खरेदीपेक्षाही कमी दिसली. या अनुभवाने मला विचार करायला भाग पाडले. आपण रास्त किमतींच्या काळापासून दूर जात आहोत का? आता आपण ‘सर्व्हिलन्स प्रायसिंग’च्या युगात प्रवेश करत आहोत. यामध्ये कंपन्या तुमचा वैयक्तिक डेटा आणि इंटरनेटवर गोष्टी शोधण्याच्या सवयींवरून अंदाज लावतात. तुम्ही किती पैसे मोजायला तयार आहात, हे त्यातून ठरवले जाते. चिंतेची बाब म्हणजे भविष्यात याचा परिणाम डेटा आणि एआय तज्ज्ञांच्या मदतीने कंपन्या वेगाने किमती बदलतात. प्रत्येक ग्राहक जास्तीत जास्त किती पैसे देऊ शकतो, हे त्यांनी ओळखले तर आपण जास्त पैसे देण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत पैसे कसे वाचवायचे. एकाच प्लॅटफॉर्मवरही किमती तपासा: वेगवेगळ्या शॉपिंग प्लॅटफॉर्मवर किमती पाहणे पुरेसे नाही. वेगवेगळ्या ब्राउझर व उपकरणांवरही किमती तपासा. लॉग इन करून व लॉग इन न करता किमती तपासा. यात फरक दिसू शकतो. तुम्हीही प्रयोग करा: कंपन्या ग्राहकांवर प्रयोग करत आहेत. त्यामुळे तुम्हीही प्रयोग करा. जोडीदार किंवा वेगवेगळ्या ठिकाणी राहणाऱ्या मित्रांना एकाच वेळी वेगवेगळ्या उपकरणांवर त्याच वस्तूची किंमत पाहण्यास सांगा. त्यानंतर किमतींची तुलना करा. जिथे सर्वात कमी किंमत असेल, तिथूनच खरेदी करा. डेटा सुरक्षित ठेवा: डकडकगोसारख्या गोपनीयतेला प्राधान्य देणाऱ्या सर्च इंजिनचा वापर करण्याचा विचार करा. ब्राउझरची अशी सेटिंग निवडा ज्यामुळे ऑनलाइन हालचालींवर लक्ष ठेवण्यावर मर्यादा येतील. सदस्यत्वाच्या अटी वाचा: नियमित ग्राहकांना मिळणारी सूट उपयुक्त ठरू शकते. पण यामुळे तुमच्या खरेदीची पद्धत कंपनीला समजू शकते. डेटा शेअर करण्यापूर्वी अटी नक्की वाचा. मॅनेजमेंट टिप: आपण किती पैसे खर्च करू शकतो याचा अंदाज लावण्यात कंपन्या जितक्या तरबेज होतील, तितकेच आपल्याला सतर्क राहावे लागेल. पेमेंटची माहिती देण्यापूर्वी किमती तपासा आणि संशयास्पद फरकाबाबत प्रश्न विचारा.

This post was originally published on this site.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *