चीनच्या झेजियांग प्रांतातील वेनझोऊ येथे राहणाऱ्या लेन लू यांचे नुकतेच लग्न झाले होते आणि ते काही अतिरिक्त कमाईच्या शोधात होते. तेव्हाच त्यांना ‘शियानयू’ (चिनी भाषेत ‘निरुपयोगी मासा’) नावाच्या वेबसाइटबद्दल समजले. हे चीनमधील सर्वात मोठे ‘कंझ्युमर-टू-कंझ्युमर’ सेकंड हँड मार्केटप्लेस आहे. अलिबाबा ग्रुपचा हा प्लॅटफॉर्म प्रामुख्याने एका ॲपच्या स्वरूपात चालतो, जो ताओबाओ आणि अलिपेसारख्या पेमेंट ॲप्सशी जोडलेला आहे. यावर युजर्स कपड्यांपासून ते इलेक्ट्रॉनिक्सपर्यंतच्या जुन्या वस्तूंची खरेदी-विक्री करू शकतात. लू यांनी सहज यावर एक जाहिरात पोस्ट केली आणि त्यानंतर जे घडले त्याने ते चकित झाले. देशभरातून अनेक लोकांनी त्यांच्याशी संपर्क साधला. याच दरम्यान त्यांचा एक हजार युआनचा फिलिप्सचा इलेक्ट्रिक टूथब्रश खराब झाला. तो विकून नवीन घेण्याऐवजी त्यांनी तो उघडून पाहिला आणि त्यांना जाणवले की हे दुरुस्त करणे सोपे आहे. याच क्षणाने त्यांचा दृष्टिकोन बदलला. त्यांनी अधिकृतपणे स्वतःला शियानयूवर ‘लहान उपकरणांची दुरुस्ती’ करणारी सेवा म्हणून नोंदवले. केवळ एक स्मार्टफोन आणि वस्तू दुरुस्त करण्याची इच्छा - एवढ्यावरच त्यांचे दुकान सुरू झाले, तेही कोणत्याही अनामत रकमेशिवाय किंवा कर्मचाऱ्यांशिवाय. गॅजेट्समधील अंतर्गत अभ्यास व दुरुस्तीची आवड असलेल्या लू यांनी मागणीवर आधारित ‘गिग जॉब’ सुरू केला. यातून वार्षिक 2 लाख युआनपेक्षा (सुमारे 27,80,650 रुपये) जास्त कमाई होऊ शकते यावर त्यांचा विश्वासच बसला नाही. घरातील प्रत्येक खराब वस्तू आता त्यांच्याकडे येऊ लागली. त्यांनी आपल्या कामाचे दोन भाग केले. सुरुवातीला ते वृद्धाश्रमात सल्लागार म्हणून सेवा देत असत आणि त्यानंतर घरी रात्री दोन वाजेपर्यंत काम करणे हा त्यांच्या दिनचर्येचा भाग बनला. यानंतर मोठे बदल झाले. या साइड बिझनेसने त्यांच्या करिअरबद्दलचा कुटुंबीयांचा दृष्टिकोन बदलला. त्यांचे पालक आधी कायमस्वरूपी नोकरीच्या बाजूने होते, पण नंतर त्यांचे मत बदलले. त्यांच्या वडिलांना वाटते की मुलगा उत्तम काम करत असून त्याला खूप मागणी आहे. शेवटी लू यांनाही वाटले की, त्यांना कुटुंबाला आपली किंमत दाखवून देण्याचे साधन मिळाले आहे. जेव्हा ते एखादी वस्तू दुरुस्त करतात, तेव्हा त्यांना वैयक्तिकरीत्या यशाची जाणीव होते आणि कंटाळा येत नाही. एवढेच नाही तर, आज ते आणि त्यांचे कुटुंब या कामाकडे एका दार्शनिक दृष्टिकोनातून पाहतात. लू यांचे काम हे ‘डिस्पोजेबल कंझम्पशन’ला (वापरा आणि फेका संस्कृती) दिलेले उत्तर आहे, असे त्यांना वाटते. म्हणजेच, जी उपकरणे लोकांनी फेकून दिली असती, त्यांचे आयुष्य वाढवून ते पृथ्वी वाचवण्यास हातभार लावत आहेत. ही केवळ लू यांची गोष्ट नाही, तर हा एक वाढता कल (ट्रेंड) दर्शवतो की तरुण रोजगाराच्या संधींकडे कोणत्या दृष्टीने पाहत आहेत. ‘चायना न्यू एम्प्लॉयमेंट रिसर्च सेंटर’चा ताजा अहवाल सांगतो की, चीनमधील तरुण कायमस्वरूपी आणि दीर्घकालीन नोकऱ्यांऐवजी ‘विविध भूमिका आणि ओळख’ असलेल्या लवचिक मॉडेलकडे वळत आहेत. आता प्रश्न असा आहे की लोक जुन्या वस्तू का खरेदी करतील? याचे कारण असे की लोकांची खर्च करण्याची पद्धत आता केवळ वस्तू खरेदी करण्याऐवजी अनुभव घेण्याकडे आणि वैयक्तिक विकासाकडे वळत आहे. यातूनच अशा डिजिटल सेवा फोफावल्या आहेत, ज्या त्याच वस्तू अर्ध्या किमतीत उपलब्ध करून देतात.
फंडा असा की, तरुणांमध्ये उदयास येत असलेली ‘गिग वर्क कल्चर’ आणि वाढती ‘प्लॅटफॉर्म इकॉनॉमी’ हे दोन्ही मिळून तरुण ज्या पद्धतीने रोजगार बाजारपेठेत प्रवेश करायचे, ती पद्धत बदलत आहेत. जगाच्या काही भागांत होत असलेल्या या बदलाच्या संधी आपल्या तरुणांनीही गमावता कामा नये.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
- पुणे: लवळे फाट्या जवळ भीषण साखळी अपघात! सिमेंटचा ट्रक, डंपर, टेम्पो आणि दोन दुचाकींमध्ये जोरदार धडक; एक जण जागीच ठार, दोघे गंभीर जखमी
- पुणे: म्हाळुंगे-नांदे रोडवर मोठा अपघात! चालकाला डुलकी लागल्याने कर्नाटक पासिंगचा आरएमसी ट्रक उलटला; रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप
महाराष्ट्र
- पुणे: सरकारला फुले-आंबेडकरी विचारांची ताकद बघायची आहे का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा संतप्त सवाल
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- कोल्हापूर: गांधी जयंतीनिमित्त कोल्हापुरात अनोखी परंपरा! कारागीर फिरोज सत्तारमेकर यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यास सर्वप्रथम अर्पण केली पुष्पमाला
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

मुंबई: शिवाजी पार्कमध्ये विद्यार्थ्यांचे आंदोलन
मुंबई: शिवाजी पार्कमधील आंदोलनादरम्यान ७५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
मुंबई: अभिनेता डिनो मोरिया यांची मिठी नदी गाळ उपसा प्रकरणात चौकशी
देश विदेश
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?























Subscribe to my channel





https://shorturl.fm/JLHgo