‘तू माझ्या वडिलांना कधी शाळेत होणाऱ्या पॅरेंट्स-टीचर्स मीटिंगला (पीटीएम) येताना पाहिले आहे का? ते नेहमी ऑफिसमध्ये व्यग्र असायचे आणि माझ्या आयुष्यातील त्या महत्त्वाच्या टप्प्यांमध्ये सहभागी होण्याची त्यांना कधीही काळजी वाटली नाही. नेहमी आईच यायची...’. ‘लक्ष्य’ चित्रपटात एक दृश्य आहे, ज्यात हृतिक रोशन आपल्या बालपणीच्या मित्राकडे वडिलांची तक्रार करत असतो. त्याने निवडलेल्या करिअरबाबत वडिलांची तीव्र असहमती असते. पण आजची कथा त्या हीरोची नाही, तर त्या पित्यांची आहे, ज्यांना हेदेखील माहीत नाही की एवढी मेहनत करून आपल्या मुलांचे जीवन सुरक्षित करण्यासाठीही त्यांच्यावर टीका केली जात आहे. ही अशा पित्यांची कहाणी आहे, ज्यांनी क्वचितच आपल्या मुलांना ‘आय लव्ह यू’ म्हटले असेल, कारण ते आपले प्रेम वास्तवात सिद्ध करण्यात मग्न होते. ही अशा वडिलांची कहाणी आहे, जे आपल्या मुलांना कधी वीकेंडला बाहेर फिरायला नेऊ शकले नाहीत - पीटीएमला जाणे तर दूरची गोष्ट आहे. कारण त्यांच्यासाठी कामावरून एक दिवसाच्या गैरहजेरीचा अर्थ संपूर्ण कुटुंबासाठी एका दिवसाच्या उत्पन्नाचे नुकसान असा होता. त्यांच्यासाठी रविवारसारखी कोणतीही गोष्ट नव्हती. जर तुम्ही विचार करत असाल की आजच्या जगातही असे पिता अस्तित्वात आहेत का, तर चला, मी तुमची ओळख 73 वर्षीय बुरसी प्रधान आणि त्यांची 62 वर्षीय पत्नी अनुसया यांच्याशी करून देतो. ते ओडिशातील एका दुर्गम गावात एका मोडक्या घरात राहतात. बुरसी यांनी आपल्या आयुष्यातील मोठा काळ रोजंदारीवरील मजूर म्हणून व्यतीत केला. कामाच्या शोधात ते थेट केरळपर्यंत गेले, कारण त्यांच्यासाठी एक दिवस काम न करण्याचा अर्थ कुटुंबाने एक दिवस उपाशी राहणे असा होता. जेव्हा खराब प्रकृतीमुळे त्यांना पुन्हा गावात परतण्यास भाग पाडले आणि संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर अवलंबून राहिला, तेव्हा कुठे बुरसी यांना त्यांच्या अनेक वर्षांच्या कठोर परिश्रमाचे फळ मिळू लागले. बुरसी यांचा मोठा मुलगा बिभीषण याने 2021 मध्ये कोरापुटच्या श्री लक्ष्मण नायक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमध्ये प्रवेश घेतला. गेल्या वर्षी मुलगी मोनालिसाही त्याच कॉलेजमध्ये पोहोचली. या वर्षी मुलगा असरिया आणि मुलगी सुनेमी यांनीही अनुक्रमे भवानीपटना आणि बलांगीरच्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एमबीबीएसची जागा मिळवली. त्यांच्या भावाच्या घरातही असेच काहीसे घडले. बुरसी यांच्या लहान भावाची मुलगी मिनखी हिनेही या वर्षी नीट परीक्षा उत्तीर्ण केली आणि पुरीच्या श्री जगन्नाथ मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमध्ये प्रवेश घेतला. सात मुलांचे वडील असलेल्या बुरसी यांच्यासाठी यापैकी काहीही सहज शक्य झाले नव्हते. बुरसी यांच्यासारख्या पित्यांचे सर्वात मोठे स्वप्न अतिशय साधे-सोपे असते- त्यांच्या मुलांनी तसे आयुष्य जगू नये, जे त्यांनी जगले आहे, अशी त्यांची इच्छा असते. माझ्या मुलांनो, असे होऊ शकते की काही वडिलांकडे तुमच्यासाठी आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी वेळ मिळाला नसेल. जेव्हा तुम्हाला फॅशनेबल कपडे हवे होते, तेव्हा कदाचित ते हे कपडे खरेदी करण्यासाठी आणखी काही रुपये कसे कमवायचे, याचा विचार करत असतील. जेव्हा तुम्हाला चांगले जेवण हवे होते, तेव्हा कदाचित ते आणखी एक दिवस कसे काम करता येईल, याचा विचार करत असतील. जेव्हा तुम्ही शांत झोप घेत होता, तेव्हा कदाचित ते दुसऱ्या दिवसाच्या खर्चाचा हिशेब लावत असतील. ते तुम्हाला आपला वेळ यासाठी देऊ शकले नाहीत, कारण ते तुम्हाला एक चांगले आयुष्य देण्याच्या प्रयत्नात मग्न होते. म्हणूनच जेव्हा ते तुमच्यासाठी नवीन कपडे घेऊन येतील, तेव्हा त्यांना हेदेखील विचारा की त्यांनी स्वतःसाठी काय खरेदी केले. जेव्हा तुम्ही त्या पिझ्झाचा आनंद घेत असता, ज्यासाठी त्यांनी आपले क्रेडिट कार्ड स्वाइप केले आहे, तेव्हा ते स्वतः काय खात आहेत याकडेही लक्ष द्या. फंडा असा आहे की, बहुतांश घरांमध्ये वडील क्वचितच म्हणतात, ‘मी तुझ्यावर प्रेम करतो.’ आणि कदाचित पितृत्वाची हीच सर्वात सुंदर व्याख्या आहे की, एका व्यक्तीने शांतपणे कठीण जीवनाचा स्वीकार करावा, जेणेकरून त्याच्या मुलांना थोडे सोपे आयुष्य जगता येईल. मी विनंती करेन की अशा पित्यांना सलाम करा.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६ महायुतीकडून भाजपचे कौस्तुभ गावडे अधिकृत उमेदवार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सूचनेनुसार मंगेश चिवटेंची माघार
- पुणे: एमपीएससी आंदोलनाला भेट देण्यासाठी गेलेल्या दिपाली सय्यद यांना विद्यार्थ्यांच्या रोषाचा सामना; एका विधानामुळे प्रचंड गोंधळ
- अहिल्यानगर: खासदार सुप्रिया सुळेंच्या जावयाच्या कंपनीच्या नावावर १२८० एकर सरकारी जमीन; शेतकरी आणि विरोधक आक्रमक, राजकीय वातावरण तापले
- मुंबई: सोयीनुसार रंग बदलणं म्हणजे काँग्रेसचं राजकारण; मत चोरीच्या आरोपांवरून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
महाराष्ट्र
- बीड: वडवणीत मन हेलावणारी दुर्घटना; सिमेंट मिक्सरमध्ये पडून १६ वर्षीय बालकामगाराचा जागीच मृत्यू, प्लांटवरील कर्मचारी फरार
- मुंबई: ७ लाख ९० हजार मतदार यादीतून गायब, हे मतदार गेले कुठे? निवडणूक आयोगाच्या आकडेवारीतील घोळावरून आदित्य ठाकरेंचा घणाघात
- गोंदिया: भरधाव वाहनाच्या धडकेत बिबट्या जागीच ठार; पितांबरटोला गावाजवळील घटनेने वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
- अमरावती: शिक्षक मतदारसंघ निवडणूक एकूण २६ उमेदवार रिंगणात; पोहरादेवीच्या महंतांसह महायुतीच्या तिघांची माघार
गुन्हा
- भंडारा: पालकमंत्र्यांसमोर डोळ्यात पाणी आणून व्यथा मांडणाऱ्या हतबल शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
- नागपूर: दारूच्या नशेत अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या पित्याची अल्पवयीन मुलीनेच केली हत्या; एमआयडीसी परिसरातील घटना
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- उत्तराखंड: काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवर हरीश रावत यांनी सोडले मौन; विनापरवानगी जनसंवाद यात्रेवरून हायकमांड नाराज!
- नवी दिल्ली: शिवसेनेच्या अंतर्गत नियुक्त्या लोकशाही मूल्यांशी सुसंगत नाहीत; धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष नियंत्रण वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी!
- दिल्ली: मी इथे सरकार बदलायला आलो नाही; प्रसिद्ध युट्युबर ध्रुव राठीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासमोर मांडले तीन कठीण सवाल!
- उत्तर प्रदेश: वृंदावनातील प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी; कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यासाठी प्रशासनाला पत्र!


























Subscribe to my channel



