मी शुक्रवारी दोन बातम्या वाचल्या. अमेरिकेतील बहुतांश विद्यापीठे इतक्या वेगाने एआय प्रोग्राम सुरू करत आहेत की, संशोधकांना त्यांना ट्रॅक करणे कठीण होत आहे. यामागचा विचार असा की, एआय जागतिक अर्थव्यवस्थेत बदल घडवून आणत असल्याने, कॉलेज आणि विद्यार्थी या दोघांनाही स्पर्धेत टिकणे गरजेचे आहे. इकडे, तेलंगणाच्या एका बातमीत म्हटले होते की, आयटी जॉब मार्केटमधील अनिश्चितता आणि फ्रेशर्ससाठी कमी होत असलेल्या संधींमुळे पारंपरिक इंजिनिअरिंग शाखा पुन्हा लोकप्रिय होत आहेत. बातमीत तंत्रशिक्षण विभागाने जाहीर केलेल्या जागा वाटपाचा हवाला देत म्हटले की, सिव्हिल, मेकॅनिकल आणि त्यांच्याशी संबंधित शाखांच्या किमान 80% जागांचे वाटप झाले आहे. केमिकल इंजिनिअरिंग, ॲग्रिकल्चरल इंजिनिअरिंग आणि फूड टेक्नॉलॉजीसारख्या बिगर-आयटी कोर्सेसमध्येही 82% जागा भरल्या जाण्याची अपेक्षा आहे. कॉलेज शिक्षणाच्या या दोन पैलूंनी मला काही तज्ज्ञांशी बोलण्यास भाग पाडले. त्यांनी इतिहासाचा हवाला देत म्हटले की, ‘एके काळी उद्योग अभिमानाने स्वतःला ‘कम्प्युटराइज्ड’ म्हणवून घेत असत. नंतर सर्वच जण कम्प्युटराइज्ड झाले आणि हे विशेषण गायब झाले. इंटरनेटच्या बाबतीतही असेच घडले. आज कोणतीही कंपनी ‘इंटरनेट-एनेबल्ड’ असल्याचा दावा करत नाही, कारण डिजिटल कनेक्टिव्हिटी स्वाभाविक झाली आहे.’ ते म्हणाले की, ‘एआय देखील त्याच दिशेने वाटचाल करत आहे. येत्या दशकात कॉलेज कदाचित ‘एआय-एनेबल्ड मेकॅनिकल इंजिनिअरिंग’ किंवा ‘एआय-एनेबल्ड सिव्हिल इंजिनिअरिंग’ सारखे मार्केटिंग करणार नाहीत. गणित, भौतिकशास्त्र आणि कॉम्प्युटर साक्षरतेप्रमाणे एआय देखील एक बेसिक टूल बनेल. प्रत्येक इंजिनिअरकडून अशी अपेक्षा असेल की, शाखा कोणतीही असली तरी, त्याला इंटेलिजेंट सिस्टिम्ससोबत काम करता आलेच पाहिजे.’ तज्ज्ञ बरोबर आहेत. तेलंगणातून दरवर्षी सीएसई आणि संबंधित शाखांमधून सुमारे 60 हजार पदवीधर पास होतात, तर एंट्री-लेव्हल आयटी जॉब्स कमी होत आहेत. विद्यार्थ्यांना वाटते की, कोअर शाखांमध्ये स्पर्धा कमी आहे आणि शैक्षणिकदृष्ट्या चांगली कामगिरी करण्यास जास्त वाव आहे. तसेच खासगी आणि सरकारी अशा दोन्ही क्षेत्रांत संधी उपलब्ध आहेत. पण त्यांनी हे समजून घेतले पाहिजे की, भविष्यात एआय केवळ कोड लिहिणारा किंवा प्रश्नांची उत्तरे देणारा चॅटबॉट राहणार नाही. आपल्या मूळ स्वरूपात एआय असे तंत्रज्ञान आहे, जे डेटा ॲनालाइज करते, पॅटर्न ओळखते, परिणामांचा अंदाज लावते आणि वेगाने चांगले निर्णय घेण्यास मदत करते. प्रत्येक इंजिनिअरिंग शाखा असा डेटा तयार करते. जो डेटा ॲनालाइज करण्यासाठी आपल्याला दोन आठवडे लागतात, एआय ते काही मिनिटांत करते. एक सिव्हिल इंजिनिअर स्ट्रक्चरल स्ट्रेस, बांधकामाचा दर्जा आणि पायाभूत सुविधांच्या देखरेखीचे काम करतो. एआय ड्रोनने घेतलेल्या फोटोंचे विश्लेषण करून पुलांवरील भेगा धोकादायक बनण्यापूर्वीच ओळखू शकते. मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्येही हाच बदल दिसत आहे. आधुनिक कारखाने मशीन्समध्ये बिघाड होण्यापूर्वीच त्याचा शोध घेण्यासाठी एआयवर अवलंबून राहत आहेत. अशा स्थितीत जे इंजिनिअर मशीन्स आणि इंटेलिजेंट सॉफ्टवेअर दोन्ही समजतात, ते अत्यंत महत्त्वाचे बनतील. हाच कल इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्येही दिसतो. स्मार्ट ग्रीड विजेच्या मागणीचा अंदाज लावण्यासाठी, रिन्युएबल एनर्जी स्रोतांमध्ये संतुलन राखण्यासाठी आणि रिअल-टाइममध्ये बिघाड शोधण्यासाठी एआयचा वापर करत आहेत. कृषी क्षेत्रात प्रिसिजन फार्मिंग वाढत आहे, जिथे एआय सॅटेलाइट फोटो, हवामानाचा अंदाज आणि मातीच्या स्थितीचे विश्लेषण करून सिंचन आणि खतांच्या वापराबाबत सूचना देते. केमिकल इंजिनिअर्स नवीन मटेरियल तयार करण्यासाठी, मॅन्युफॅक्चरिंग प्रक्रियेला ऑप्टिमाइज करण्यासाठी आणि कचरा कमी करण्यासाठी एआयचा वापर करत आहेत. यापैकी कोणताही बदल इंजिनिअर्सची गरज संपवत नाही. उलट, हे त्या इंजिनिअर्सचे महत्त्व अधिक वाढवतात, ज्यांच्याकडे आपल्या क्षेत्रातील तज्ज्ञतेसोबतच डिजिटल स्किल्सदेखील आहेत. यावरून हे स्पष्ट होते की, कोअर इंजिनिअरिंगकडे वाढणाऱ्या कलाकडे तंत्रज्ञानापासून मागे हटणे म्हणून पाहण्याची चूक करू नये. भविष्य केवळ सॉफ्टवेअर इंजिनिअर्सचे नाही आणि फक्त पारंपरिक इंजिनिअर्सचेही नाही, तर नव्या पिढीतील त्या व्यावसायिकांचेही आहे, जे एआयचा वापर करून अधिक स्मार्ट, सुरक्षित आणि कुशल फिजिकल वर्ल्ड बनवू शकतील. फंडा असा आहे की, एआय हा काही तात्पुरता ट्रेंड नाही आणि कोअर इंजिनिअरिंगही कोणतेही नॉस्टॅल्जिक कमबॅक करत नाहीये. हे दोन्ही आता वेगळे राहू शकत नाहीत. येत्या दशकांमध्ये इंजिनिअरिंग शिक्षण मशीन्स आणि अल्गोरिदम यांच्यातील निवडीभोवती फिरणार नाही, तर या दोन्हीमध्ये प्रावीण्य मिळवावे लागेल.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: आंबेगाव तालुक्यात बिबट्याची दहशत कायम! निर्गुदसर येथे ब्रिडिंगसाठी आणलेली ६० हजारांची शेळी फस्त, वनविभागाने पिंजरा लावण्याची शेतकऱ्यांची मागणी!
- पुणे: बारामतीत राजकीय भूकंप! सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीत विद्यमान चेअरमन पुरुषोत्तम जगतापांचे बंड, स्वतंत्र पॅनेलची घोषणा केल्याने रंगत वाढली!
- मुंबई: शिवाजी पार्कवर मोठा राडा: कॉकरोच जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांमध्ये जोरदार खडाजंगी, आंदोलनापूर्वीच वातावरण तापले!
- मुंबई: ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंचा मोठा गौप्यस्फोट: मनोज जरांगे पाटलांचे आंदोलन म्हणजे नौटंकी, उपोषणाबाबत केले अत्यंत गंभीर आरोप!
महाराष्ट्र
- पुणे: आंबेगाव तालुक्यात बिबट्याची दहशत कायम! निर्गुदसर येथे ब्रिडिंगसाठी आणलेली ६० हजारांची शेळी फस्त, वनविभागाने पिंजरा लावण्याची शेतकऱ्यांची मागणी!
- पुणे: बारामतीत राजकीय भूकंप! सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीत विद्यमान चेअरमन पुरुषोत्तम जगतापांचे बंड, स्वतंत्र पॅनेलची घोषणा केल्याने रंगत वाढली!
- मुंबई: शिवाजी पार्कवर मोठा राडा: कॉकरोच जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांमध्ये जोरदार खडाजंगी, आंदोलनापूर्वीच वातावरण तापले!
- मुंबई: ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंचा मोठा गौप्यस्फोट: मनोज जरांगे पाटलांचे आंदोलन म्हणजे नौटंकी, उपोषणाबाबत केले अत्यंत गंभीर आरोप!
गुन्हा
- पुणे: कारेगावात दिवसाढवळ्या थरारक गोळीबार पाण्याच्या प्लँटवर कामावर गेलेल्या तरुणाच्या डोक्यात गोळी झाडून निर्घृण हत्या!
- कोलकाता: दुर्गा पूजेच्या नावाखाली ५०-६० कोटींचा महाघोटाळा; माजी मंत्री इंद्रनील सेन यांच्या घरी भल्या पहाटे ईडीची धडक कारवाई
- पुणे: मोरगाव परिसरातील शेरेवाडीत दोन वयोवृद्ध महिलांची झोपेतच धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; दरोड्याच्या संशयाने खळबळ
- बीड: १५ वर्षांच्या मैत्रीचा रक्तरंजित अंत! दारूच्या नशेत चालत्या कारमध्ये सीटबेल्टने आवळला गळा; मित्राचीच हत्या करून मृतदेह घाटात फेकला
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग
- लंडन: युझवेंद्र चहलची काउंटी टीमला भावनिक साद; 3 वर्षे, 9 बळी आणि असंख्य आठवणी चहलचा नॉर्थम्प्टनशायरला भावनिक निरोप

























Subscribe to my channel




