
पुणे : करोना संकटाच्या दोन वर्षांच्या कालखंडात माउलींच्या सोबतीने विठुरायाच्या भेटीला जाण्याची रुखरुख आज संपली… संकटाची वर्ष सरल्यानंतर आता अलंकापुरीत आलेला वैष्णवांचा मेळा माउलींच्या सावलीत पंढरीच्या वाटेवर निघाला… श्रीक्षेत्र आळंदी येथून मंगळवारी (२१ जून) संध्याकाळी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीने आषाढीच्या अलौकिक सोहळ्यासाठी पंढरीकडे प्रस्थान ठेवले. उत्साहाने भारलेले वारकऱ्यांनी देहभान हरपून ‘माउली, माऊली…’ चा अखंड अखंड घोष करीत चैतन्य भरले आणि भक्तीकल्लोळाला जणू उधाणच आले…
दोन वर्षानंतर पहिल्यांदाच माउलींच्या पालखी सोहळ्यात सहभागी होण्याचे भाग्य मिळणार असल्याने गेल्या काही दिवसांपासूनच राज्याच्या विविध भागातील लाखो वारकऱ्यांची पावले आळंदीकडे येत होती. त्यामुळे आळंदीत भक्तीचे अनोखे चैतन्य साकारले होते. पालखीच्या प्रस्थानाचा दिवस उजाडताच अगदी पहाटेपासूनच इंद्रायणीच्या काठावर वैष्णवांचा मेळा भरला. पंचक्रोशीत हरिनामाचे सूर निघू लागले. माउलींच्या संजीवन समाधी मंदिरात प्रस्थान सोहळ्याची तयारी सुरू झाली. सकाळपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल होती. त्यामुळे मंदिरात चैतन्यदायी वातावरण निर्माण झाले.
पांढरे शुभ्र वस्त्र, डोहीवर टोपी आणि खांद्यावर भागवत धर्माचा पताका घेऊन टाळ-मृदंगाचा अखंड गजर वारकऱ्यांकडून सुरू झाला. प्रस्थानाच्या मुख्य सोहळ्यासाठी मानाच्या दिंड्यांचा मंदिरात प्रवेश सुरू होताच वारकऱ्यांच्या उत्साहाला उधाण आले. हरिभक्तीचे विविध खेळ रंगवीत वारकर्यांनी सोहळ्यात रंग भरले. अगदी देहभान हरपून वारकऱ्यांनी टाळ-मृदंगाच्या गजरात ठेका धरला. हा सोहळा डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी भाविकही मोठ्या संख्येने अलंकापुरीत दाखल झाले होते.
आकर्षक फुलांनी सजविलेल्या पालखीमध्ये संध्याकाळी सव्वासातच्या सुमारास माउलींच्या पादुका ठेवण्यात आल्या. श्रीगुरु हैबतरावबाबा यांच्या वतीने आरती करण्यात आली. आळंदी देवस्थानच्या वतीने प्रमुख मानकऱ्यांचा नारळ प्रसाद आणि परंपरेनुसार पागोटे देण्यात आले. आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्थ योगेश देसाई, सोहळा प्रमुख विकास ढगे पाटील यांच्यासह इतर विश्वस्थ, पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर तसेच प्रमुख चोपदार आदी मंडळी त्यावेळेस उपस्थित होती. वीणा मंडपात आळंदीकरांनी पालखी खांद्यावर घेऊन नाचवली. त्यावेळेस प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंदाची आणि सुखाची अनोखी अनुभूती दिसत होती. विना मंडपातून पालखी बाहेर येताच दिंड्यांनी एकच जल्लोष केला. ‘माऊली, माऊली’ च्या जयघोषात परिसर दुमदुमून निघाला. महाद्वारातून बाहेर पडून पालखीची मंदिर प्रदक्षिणा झाली. त्यानंतर माउली त्यांच्या आजोळघरी म्हणजे गांधी वाड्यात मुक्कामासाठी दाखल झाले. बुधवारी (२२ जून) सकाळी पालखी सोहळा पुणे मुक्कामासाठी मार्गस्थ होणार आहे.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले


























Subscribe to my channel
