IPL 2022 : पुण्यात हैदराबाद आणि राजस्थान यांच्यात पहिली लढत

IPL 2022 : आयपीएलमध्ये उद्या दोन माजी विजेत्यांमध्ये लढत रंगणार आहे. सनरायझर्स हैदराबाद-राजस्थान रॉयल्स या दोन संघांमध्ये पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये लढत रंगणार आहे. या वेळी विजयी सलामीसाठी दोन संघ प्रयत्नांची शिकस्त करताना दिसतील.

राजस्थान रॉयल्सने २००८ मध्ये शेन वॉर्नच्या नेतृत्वात आयपीएल स्पर्धा जिंकण्याची करामत करून दाखवली होती. आयपीएलचा हा पहिलाच मोसम होता. त्यानंतर मात्र १३ मोसमांमध्ये या संघाला चमकदार कामगिरी करता आलेली नाही. संजू सॅमसनकडे या संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. त्याच्यासाठी ही स्पर्धा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या स्पर्धेमध्ये त्याने दमदार कामगिरी केली तर आगामी टी-२० विश्‍व करंडकासाठी भारतीय संघाचे दरवाजे त्याच्यासाठी उघडे होऊ शकतील.

जॉस बटलर, देवदत्त पडीक्कल यांना राजस्थान रॉयल्ससाठी सलामीची भूमिका पार पाडावी लागेल. रॉसी वॅन डर ड्युसेन, शिमरॉन हेटमायर, जेमी निशाम, रेयान पराग यांना मधल्या फळीत प्रतिस्पर्धी संघातील गोलंदाजांवर वर्चस्व गाजवावे लागणार आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *