
Pune : प्रेमप्रकरणातून झालेल्या वादातून नायजेरियन तरुणाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून त्याचा खून करण्यात आला. ही घटना कोंढव्यातील पिसोळी परिसरात घडली. या प्रकरणी काळेपडळ पोलिसांनी दोन नायजेरियन तरुणांना ताब्यात घेतले असून, इतर साथीदारांचा शोध सुरू आहे.
काय घडलं?
येमेका क्रिस्टीएन (वय ४०, सध्या रा. फुरसुंगी, मूळ रा. नायजेरिया) असे मृत तरुणाचे नाव आहे. नायेमेका मदुबची ओनिओ आणि किन्सली ओबा (दोघेही रा. लिमरास हाइट सोसायटी, पद्मावतीनगर, पिसोळी, मूळ रा. नायजेरिया) यांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्या इतर साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती काळेपडळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मानसिंग पाटील यांनी दिली.
|
|
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिसोळीतील नायजेरियन महिलेने सोमवारी (१२ जानेवारी) मित्रांना जेवायला घरी बोलावले होते. त्या वेळी येमेका क्रिस्टीएन, किन्सली, ओबी, ओजे ओजगवा आणि नायेमेका मादूबुची ओनिया हे तिच्या घरी आले होते. जेवणादरम्यान प्रेमप्रकरणातून क्रिस्टीएन आणि इतरांमध्ये वाद झाला. वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. त्यात किन्सली, ओबी, नायेमेका मादूबुची ओनिया आणि ओजे ओजगवा यांनी क्रिस्टीएनला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.
गंभीर जखमी अवस्थेत क्रिस्टीएनला त्याचा मित्र गिफ्ट सिव्होनस ऊटाह (वय ३९, रा. वडाचीवाडी, उंड्री) याने वानवडीतील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक मानसिंग पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला. पोलिसांनी ओनिओ आणि किन्सली ओबा यांना ताब्यात घेतले. उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. प्रेमसंबंधातून हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती






















Subscribe to my channel


1 thought on “Pune Crime : मैत्रिणीच्या घरी मेजवानी, बोलता बोलता विषय भरकटला; कोंढव्यात थरारक घटना!”