नागपूर: एका हत्या प्रकरणात कारागृहात असलेल्या आणि सुमारे दोन महिन्यांपूर्वी जामिनावर बाहेर आलेल्या 20 वर्षीय तरुणाची दगडाने डोके ठेचून निघृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना नागपुरातील वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. सिंबॉयसिस कॉलेजच्या मागील जंगल परिसरातील झुडुपांमध्ये काल शुक्रवारी सकाळी रक्ताच्या थारोळ्यात या तरुणाचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणी वाठोडा पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतलं असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. मृतकाची ओळख प्रतीक राजू करांडेकर (वय 20) अशी झाली आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, प्रतीक याच्याविरुद्ध 2025 मध्ये एचबी टाऊन परिसरात झालेल्या एकाहत्या प्रकरणात गुन्हा दाखलकरण्यात आला होता. या प्रकरणात प्रतीकला त्याच्या तीन साथीदारांसह अटक करण्यात आली होती. सुमारे दोन महिन्यांपूर्वी प्रतीक आपल्या अन्य दोन साथीदारांसह जामिनावर कारागृहातून बाहेर आला होता. गुरुवारी 6 ऑगस्ट रोजी सायंकाळी प्रतीक मोटारसायकल घेऊन घराबाहेर पडला होता. काही कामानिमित्त बाहेर जात असल्याचं त्याने कुटुंबीयांना सांगितलं होतं. मात्र, त्यानंतर तो घरी परतला नाही. काल शुक्रवारी सकाळी सिंबॉयसिस कॉलेजच्या मागील जंगल परिसरात एका तरुणाचा रक्तबंबाळ अवस्थेतील मृतदेह आढळून आल्यानं परिसरात खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच वाठोडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविला.
हत्येचं गूढ उकलणार?
प्राथमिक तपासात प्रतीक रात्री काही जणांसोबत याच परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. या सर्वांनी एकत्रितपणे मद्यपान केल्याचंही तपासात समोर आलं आहे. मद्यपान करताना कोणत्या तरी कारणावरून त्यांच्यात वाद झाला असावा आणि त्यानंतर प्रतीकच्या डोक्यावर दगडाने वार करून त्याची हत्या करण्यात आली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणात तीन संशयितांना ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरू आहे. हत्या नेमकी कोणत्या कारणातून झाली, आरोपी आणि मृतक यांच्यात पूर्वीपासून काही वाद किंवा वैमनस्य होतं का, तसेच या हत्येमागे आणखी कोणाचा सहभाग आहे का? या सर्व शक्यता तपासल्या जात आहेत. या प्रकरणाचा तपास वाठोडा पोलीस करत असून घटनास्थळावरील पुरावे, सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल कॉल रेकॉर्ड तसेच संशयितांच्या चौकशीतून हत्येचं गूढ उकलण्याचा प्रयत्न सुरू आहे.
शहर
- अमरावती: रिद्धपूर येथे स्कूल बसमधून उतरताना पडून ७ वर्षांच्या चिमुकलीचा जागीच मृत्यू.
- पुणे: भोरमध्ये संतापजनक घटना; दारू पिण्यास विरोध करणाऱ्या पोटच्या आईलाच दारुड्या मुलाने लोखंडी रॉडने ठेचून संपवले, मृतदेह घरात ठेवून पळाला.
- दिल्ली: ४२ वर्षीय महिला वकिलाचा हैदरपूर उड्डाणपुलावरून पडून मृत्यू; पतीने ढकलून दिल्याची कुटुंबीयांची तक्रार, पतीवर गुन्हा दाखल.
- सातारा: जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला; कोयना धरणाचे विसर्ग कमी, धरणाचे वक्र दरवाजे दोन फुटांवर खाली आणले.
महाराष्ट्र
- अमरावती: रिद्धपूर येथे स्कूल बसमधून उतरताना पडून ७ वर्षांच्या चिमुकलीचा जागीच मृत्यू.
- पुणे: भोरमध्ये संतापजनक घटना; दारू पिण्यास विरोध करणाऱ्या पोटच्या आईलाच दारुड्या मुलाने लोखंडी रॉडने ठेचून संपवले, मृतदेह घरात ठेवून पळाला.
- कोल्हापुर: कबनुरात रील बनवताना तरुणाच्या डोक्यात घुसली गोळी; दुचाकीवरून पडल्याचा बनाव सिटी स्कॅनने उघडकीस.
- रत्नागिरी: मूल होण्यासाठी औषध व विधीचे आमिष दाखवून सव्वा लाखांचे दागिने लंपास.
गुन्हा
- पुणे: भोरमध्ये संतापजनक घटना; दारू पिण्यास विरोध करणाऱ्या पोटच्या आईलाच दारुड्या मुलाने लोखंडी रॉडने ठेचून संपवले, मृतदेह घरात ठेवून पळाला.
- दिल्ली: ४२ वर्षीय महिला वकिलाचा हैदरपूर उड्डाणपुलावरून पडून मृत्यू; पतीने ढकलून दिल्याची कुटुंबीयांची तक्रार, पतीवर गुन्हा दाखल.
- कोल्हापुर: कबनुरात रील बनवताना तरुणाच्या डोक्यात घुसली गोळी; दुचाकीवरून पडल्याचा बनाव सिटी स्कॅनने उघडकीस.
- मुंबई: सायबर भामट्यांचा प्रताप! कंपनीच्या संचालकांच्या नावाने बनावट व्हॉट्सॲप डीपी आणि टीम्स ग्रुप तयार करून तब्बल ४.२८ कोटींचा गंडा.
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- अंक भविष्य ४ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या मूलांक १ ते ९ नुसार तुमचे आजचे राशीभविष्य
- आजचे राशिभविष्य ३ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या आज कोणत्या राशींवर होणार शिवाची कृपा आणि कोणाला मिळणार ग्रहांची साथ
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: ४२ वर्षीय महिला वकिलाचा हैदरपूर उड्डाणपुलावरून पडून मृत्यू; पतीने ढकलून दिल्याची कुटुंबीयांची तक्रार, पतीवर गुन्हा दाखल.
- बंगळुरु: २ कोटींच्या विम्यासाठी सलाईनमधून विष देऊन माजी सैनिकाचा खून; प्रियकराच्या सेल्फी व्हिडिओमुळे तीन महिन्यांनी मृतदेह बाहेर काढून पर्दाफाश.
- बिहार: पाटण्यात संतापाचा लाव्हा; भरधाव बसच्या धडकेत तरुणाचा मृत्यू; संतप्त लोकांकडून बस आणि पोलिसांच्या गाड्यांची तोडफोड करत आगजनी.
- हैदराबाद: ऑनलाईन बेटिंगचा बळी; युट्यूबवर पाहून हेलियम गॅसच्या सहाय्याने चार्टर्ड अकाऊंटंटने संपवले जीवन























Subscribe to my channel



