मुंबई: आगामी स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतून एक अत्यंत खळबळजनक आणि गंभीर बातमी समोर आली आहे. स्वातंत्र्यदिनापूर्वी ( १५ ऑगस्ट ) मुंबईवर मोठा दहशतवादी हल्ला करण्याची धमकी देण्यात आली असून, मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या अधिकृत ईमेल अकाउंटवर हा धमकीचा ई-मेल पाठवण्यात आला आहे. या धमकीच्या सत्रामुळे संपूर्ण पोलीस प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये मोठी खळबळ उडाली असून शहरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
कोणती ठिकाणे आहेत निशाण्यावर? प्राप्त माहितीनुसार, या धमकीच्या ईमेलमध्ये मुंबईतील अत्यंत महत्त्वाची आणि संवेदनशील ठिकाणे उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. यामध्ये मुंबईच्या महापौरांचे कार्यालय आणि त्यांची अधिकृत गाडी, मुख्यमंत्री कार्यालय (CMO), ऐतिहासिक बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) इमारत, तसेच शहरातील महत्त्वाच्या शाळा आणि मुंबई मेट्रोचा समावेश आहे. या मेलमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, १५ ऑगस्टपूर्वी मुंबईत मोठे घातपात घडवून आणले जातील.
पालक आणि नागरिकांसाठी विशेष इशारा: या धमकीच्या ईमेलचे गांभीर्य लक्षात घेता सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत. विशेष म्हणजे, या मेलमध्ये पालकांना आणि नागरिकांना एक गंभीर इशारा देण्यात आला असून, "मुलांना शाळेत पाठवू नका आणि प्रवासासाठी मेट्रोचा वापर करू नका," असे नमूद करण्यात आले आहे. तसेच या मेलमध्ये काही खलिस्तान समर्थक घोषणा आणि विशिष्ट व्यक्तींची नावे देखील नमूद करण्यात आली असल्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा, सायबर सेल आणि बॉम्ब शोधक व नाशक पथकाने (BDDS) तातडीने सूत्रे हलवली आहेत. संबंधित धमकीचा ईमेल कुणी पाठवला, त्याचा स्रोत (IP Address) नेमका कुठे आहे, याचा कसून शोध घेतला जात असून महापौरांच्या कार्यालयासह सर्व प्रमुख संवेदनशील ठिकाणांच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
शहर
- पुणे: नाशिक रेल्वे मार्गातील बदलामुळे विकासाला अडथळा; रेल्वे सरळ मार्गानेच झाली पाहिजे, शिवाजीराव आढळराव पाटील यांची मागणी.
- निसर्गसौंदर्याने नटलेले शिरदाळे गाव ठरतेय पर्यटकांचे आवडते ठिकाण; शेकडो राष्ट्रीय पक्षी मोरांच्या थव्यांमुळे परिसर बहरला, पण शेतकऱ्यांसमोर चिंतेचे संकट
- सिंधुदुर्ग: लाचलुचपत विभागाचा बनावट अधिकारी बनून शासकीय नोकरीचे आमिष; तरुणीसह वडिलांना लाखांचा गंडा, कणकवलीत गुन्हा दाखल.
- मुंबई: चालत्या लोकल ट्रेनमध्ये थरार, संतापलेल्या तरुणाकडून महिलेला बेल्टने अमानुष मारहाण; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल.
महाराष्ट्र
- पुणे: नाशिक रेल्वे मार्गातील बदलामुळे विकासाला अडथळा; रेल्वे सरळ मार्गानेच झाली पाहिजे, शिवाजीराव आढळराव पाटील यांची मागणी.
- सांगली: मध्य प्रदेशातून आणलेली ११ पिस्तुले आणि २२ काडतुसे जप्त, खानापूरमधील तिघांना बेड्या.
- अहमदाबाद: अन्नासाठी हट्ट करणाऱ्या २ वर्षांच्या मुलीला मारणाऱ्या आईला गुजरात उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर; अतिगरीबी आणि व्यवस्थेच्या अपयशावर भाष्य.
- सातारा: शेअर मार्केटमध्ये भरघोस परताव्याचे आमिष दाखवून व्यावसायिकासह ५ जणांना २९ लाखांचा चुना; शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.
गुन्हा
- सातारा: शेअर मार्केटमध्ये भरघोस परताव्याचे आमिष दाखवून व्यावसायिकासह ५ जणांना २९ लाखांचा चुना; शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.
- वाशीम: अनैतिक संशयावरून लष्करातील जवानाने केली ७ महिन्यांच्या गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या; कारंजा येथील घटना.
- नंदुरबार: अल्पवयीन मुलांसह तरुणांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला अटक; मोबाईलमध्ये सापडले २०० हून अधिक अश्लील व्हिडिओ.
- मुंबई: चालत्या लोकल ट्रेनमध्ये थरार, संतापलेल्या तरुणाकडून महिलेला बेल्टने अमानुष मारहाण; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल.
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य ३ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या आज कोणत्या राशींवर होणार शिवाची कृपा आणि कोणाला मिळणार ग्रहांची साथ
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- बिहार: पाटण्यात संतापाचा लाव्हा; भरधाव बसच्या धडकेत तरुणाचा मृत्यू; संतप्त लोकांकडून बस आणि पोलिसांच्या गाड्यांची तोडफोड करत आगजनी.
- हैदराबाद: ऑनलाईन बेटिंगचा बळी; युट्यूबवर पाहून हेलियम गॅसच्या सहाय्याने चार्टर्ड अकाऊंटंटने संपवले जीवन
- उत्तर प्रदेश: 'बायकोने मृतदेहाला स्पर्शही करायचा नाही, माझा आत्मा…', भाचीला सुसाइड नोट पाठवत जिम संचालक व कॉलेज लिपिकाने स्वतःला संपवले
- ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक पराक्रम; ज्युडोमध्ये सुवर्णपदक जिंकणारी अस्मिता डे ठरली पहिली भारतीय खेळाडू!


























Subscribe to my channel



