ठाणे: पालघर-माहीम रोडवरील मनसे कार्यालयात कामगारांच्या प्रश्नावर बैठक आयोजिली होती. ही बैठक आटोपल्यानंतर जिल्हाप्रमुख समीर मोरे यांनी मनसेचे माजी शहरप्रमुख आणि मनसे नेते अविनाश जाधव यांचे निकटवर्तीय सुनील राऊत यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात राऊत जखमी झाले आहेत.कामगार सेनेचे उपाध्यक्ष नीलेश पाटील यांच्यासमोरच ही हाणामारी झाली. या प्रकरणामुळे पालघर मनसेमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला असून, पालघर पोलिस पुढील तपास करीत आहेत.
पालघर शहरातील माहीम रोडवर असलेल्या मनसे कार्यालयात पालघर शहरातील एका कंपनीमधील कामगारांच्या प्रश्नावर बैठकीचे आयोजन मंगळवारी करण्यात आले होते. त्या बैठकीला मुंबईमधील कामगार सेनेचे उपाध्यक्ष नीलेश पाटील उपस्थित राहणार होते.
या बैठकीच्या आधीच जिल्हाध्यक्ष समीर मोरे कार्यालयात आल्यानंतर त्यांनी सभांच्या बाबतीत मला कुठलीही कल्पना दिली जात नसल्याचे आक्षेप नोंदवले. यावर दोन गटांत शाब्दिक बाचाबाची झाली. कामगारांच्या प्रश्नावर बैठक पार पडल्यावर उपाध्यक्ष पाटील उपस्थित असताना पुन्हा जिल्हाध्यक्ष मोरे यांनी वाद घातला.
मनसे तालुकाध्यक्ष तथा केळवेचे सरपंच संदीप किणी यांची कॉलर पकडून त्यांना शिवीगाळ केल्याचे त्यांनी 'लोकमत'ला सांगितले.
यावेळी कार्यालयात बसलेल्या सुनील राऊत यांना समीर मोरे आणि त्यांच्या सोबत असलेल्या ८-९ लोकांनी जोरदार मारहाण केली. झेंडा असलेल्या काठीचा जोरदार प्रहार सुनील राऊत यांच्या डोक्यात करण्यात आल्याने ते गंभीर जखमी झाले.
मुंबईमधील कामगार सेनेचे उपाध्यक्ष नीलेश पाटील ह्यांच्या उपस्थितीत हा प्रकार घडल्याने मनसेमधील हा वाद पुढे वाढणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.
जखमी राऊत यांना पालघरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पालघर पोलिस स्टेशनचे साहाय्यक पोलिस निरीक्षक मल्हार थोरात यांनी घटनास्थळी धाव घेत पुढील तपास सुरू केला आहे.
शहर
- 'क्राईम पेट्रोल' फेम अभिनेता सतीश नायकोडी यांची फसवणूक; एसआरए इमारतीत स्वस्त फ्लॅट मिळवून देण्याच्या नावाखाली लाखांची लुबाडणूक
- छत्रपती संभाजीनगर हादरलं! सामान पॅक करण्याच्या बहाण्याने बोलावून ३१ वर्षीय पीएचडीच्या विद्यार्थिनीवर रात्री अत्याचार; डिलिव्हरी बॉयच्या कृत्याने खळबळ!
- भाजपसोबत नाही! युसूफ पठाणसह तीन एनसीपीआय (NCPI) खासदारांची एनडीएच्या बैठकीला पाठ; राजकीय वर्तुळात मोठी खळबळ!
- पुणे:वृत्तपत्राच्या दणक्याने पुणे महापालिकेची नरमाई; कचरा प्रकल्पाच्या निविदेत दर कपात केल्याने तब्बल १४९ कोटी रुपयांची बचत!
महाराष्ट्र
- कोल्हापूर: जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागातील अपहार प्रकरणात मोठी घडामोड; १५ दिवसांपूर्वी जमा झाले आणखी २८ लाख
- 'क्राईम पेट्रोल' फेम अभिनेता सतीश नायकोडी यांची फसवणूक; एसआरए इमारतीत स्वस्त फ्लॅट मिळवून देण्याच्या नावाखाली लाखांची लुबाडणूक
- कोल्हापुर: सुर्वेनगरात मालमत्तेच्या वादातून तब्बल आठ जिलेटिन स्फोट; दोन खोल्या पूर्णपणे उद्ध्वस्त, परिसर हादरला
- कोल्हापुर: इचलकरंजीतील तरुणाचे मालमत्तेच्या वादातून अपहरण करून निपाणीत निर्घृण खून; तिघे संशयित जेरबंद
गुन्हा
- नागपुर: फ्रेंडशिप डे दिवशी थरार; लग्न आणि गिफ्टच्या वादातून तरुणीला नदीत ढकलून केली हत्या, खळबळजनक घटना उघड
- महाडमध्ये महिला डॉक्टरचा अमानुष छळ; १८ वर्षांत तब्बल १० वेळा सक्तीने गर्भपात केल्याप्रकरणी पतीवर गंभीर आरोप
- पुणे: ६ वर्षांनंतर अखेर न्याय मिळाला; पुण्याच्या बुधवार पेठेत २२ वर्षीय प्रेयसीच्या खून प्रकरणात नराधम प्रियकराला जन्मठेपेची शिक्षा
- चंद्रपूर: प्रेमाच्या लग्नानंतर अवघ्या तीन महिन्यांतच संपला तरुणीचा संसार; चंद्रपूरमधील दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य ३ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या आज कोणत्या राशींवर होणार शिवाची कृपा आणि कोणाला मिळणार ग्रहांची साथ
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उत्तर प्रदेश: 'बायकोने मृतदेहाला स्पर्शही करायचा नाही, माझा आत्मा…', भाचीला सुसाइड नोट पाठवत जिम संचालक व कॉलेज लिपिकाने स्वतःला संपवले
- ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक पराक्रम; ज्युडोमध्ये सुवर्णपदक जिंकणारी अस्मिता डे ठरली पहिली भारतीय खेळाडू!
- गोवा: बांबोळीतील 'फुलान्चो खुरीस'जवळ भीषण अपघात; वाहन पेट घेतल्याने एक जण ठार, तर दोघे जण गंभीर जखमी
- नवी दिल्ली: आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झाले आणखी सोपे; नवीन अॅपवरून घरबसल्या करा अर्ज





























Subscribe to my channel




