पुणे: पिंपरीतील कुटुंब मृत्यू प्रकरण, घरातून ऑनलाईन मागवलेले 'सोडियम नायट्रेट' आणि सुसाईड नोट हस्तगत!

पुणे: पिंपरी-चिंचवड शहरात घडलेल्या एका उच्चशिक्षित कुटुंबाच्या सामूहिक मृत्यू प्रकरणाने संपूर्ण राज्यभरात खळबळ उडाली आहे. पिंपरीतील मोरवाडी भागात एकाच कुटुंबातील तिघांचा संशयास्पद आणि वेदनादायी मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणात पोलिसांच्या तपासात आता एक अत्यंत धक्कादायक बाब समोर आली असून, मृत्यूपूर्वी घरात ऑनलाइन मागवलेले 'सोडियम नायट्रेट' (Sodium Nitrate) हे रासायनिक द्रव्य आणि एक चिठ्ठी (सुसाईड नोट) आढळून आली आहे.

नेमकी घटना काय?
पिंपरीतील मोरवाडी परिसरामध्ये ही घटना घडली. विनोद पिल्लई आणि त्यांच्या कुटुंबीयांचा मृतदेह त्यांच्याच घरात आढळून आल्याने परिसरात एकच शोककळा पसरली. सुरुवातीला हा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याबाबत उलट-सुलट चर्चा सुरू होत्या. मात्र पोलिसांनी जेव्हा घराची कसून पाहणी केली, तेव्हा तपासाला एक नवीन वळण मिळाले.

पोलिसांना घराजितील तपासणीदरम्यान ऑनलाइन पद्धतीने मागवण्यात आलेले 'सोडियम नायट्रेट' रसायन सापडले आहे. तसेच कुटुंबाने हे टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी नेमकी काय परिस्थिती होती किंवा काय कारण होते, याचा खुलासा करणारी एक चिठ्ठी (सुसाईड नोट) देखील पोलिसांच्या हाती लागली आहे. या प्रकरणातील प्राथमिक संशयानुसार, हे पाऊल रागाच्या किंवा क्षुल्लक कारणातून नव्हे, तर अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने उचलण्यात आल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पोलिसांकडून सखोल तपास सुरू
या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच पिंपरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतले आणि विच्छेदनासाठी पाठवले. पिल्लई कुटुंबीयांनी हे टोकाचे पाऊल उचलण्यामागील नेमके कारण काय? त्यांनी हे रसायन ऑनलाइन कुठे आणि कसे मागवले? तसेच सुसाईड नोटमध्ये नेमक्या काय गोष्टी नमूद करण्यात आल्या आहेत, याचा कसून तपास सध्या पोलीस प्रशासनाकडून केला जात आहे. या घटनेमुळे पिंपरी-चिंचवड परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

 



महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *