जळगाव:राज्य शासनाच्या 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६' अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील थकबाकीदार आणि पात्र शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील विविध बँका आणि सेवा संस्थांमार्फत एकूण ८७ हजार ८२६ कर्जखात्यांची माहिती सहकार विभागाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली होती. त्यापैकी पहिल्या टप्प्यात ६५ हजार ३४३ कर्जखात्यांची यादी आधार प्रमाणीकरणासाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
३५ हजार शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण:
प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीतील शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण (Aadhaar Authentication) करण्याची प्रक्रिया जिल्ह्यात वेगाने सुरू आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील सुमारे ३५ हजार पात्र शेतकऱ्यांनी आपले आधार प्रमाणीकरण यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे. उर्वरित सुमारे ३० हजार शेतकऱ्यांनीही तातडीने आपले प्रमाणीकरण पूर्ण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
२ लाख रुपयांपर्यंत मिळणार कर्जमाफीचा लाभ:
राज्य शासनाने २ जून २०२६ रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. या योजनेअंतर्गत कर्जमाफी, एकवेळ समझोता (OTS) आणि प्रोत्साहनपर लाभ असे तीन प्रमुख घटक समाविष्ट आहेत. यातील पात्र शेतकरी ५० हजार रुपयांपासून ते २ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीच्या लाभासाठी पात्र ठरणार आहेत.
ॲग्रीस्टॅक नोंदणी अन् ई-केवायसी अनिवार्य:
कर्जमाफीची रक्कम थेट शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यासाठी आधार प्रमाणीकरणासोबतच 'ॲग्रीस्टॅक' (AgriStack) पोर्टलवर फार्मर आयडी (Farmer ID) नोंदणी असणे अत्यंत आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांची नावे पहिल्या यादीत आली आहेत, त्यांनी आपल्या नजीकच्या महा-ई-सेवा केंद्र, सांग्राम केंद्र किंवा संबंधित विकास सोसायटी/बँकेत जाऊन प्रमाणीकरणाची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी, जेणेकरून थेट लाभ हस्तांतरण (DBT) प्रक्रियेद्वारे रक्कम जमा होण्यास कोणतीही अडचण येणार नाही.
शहर
- पुणे: अंगावर पेट्रोल ओतून जिवंत मारण्याच्या गंभीर प्रकरणातील आरोपीला उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा; जामीन मंजूर
- पुणे: अल्पवयीन नात घरात एकटी दिसली अन्...; इंदापूर तालुक्यात ६७ वर्षीय आजोबाचे संतापजनक कृत्य, पोलिसांनी केली अटक
- मुंबई: शेतकऱ्यांचा संताप आणि पेच: शासकीय योजनांसाठी आयटीआर सक्तीची अट अन् कर्जमाफीचा प्रश्न; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
- पुणे: भारत आता मार खाणारा देश राहिलेला नाही, गरज पडल्यास घरात घुसून मारणारा देश बनलाय - देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र
- जळगाव : मासे पकडण्याची हौस पडली भारी; जळगावच्या धरणगाव तालुक्यात नदीच्या पात्रात पुराच्या पाण्यात अडकला तरुण, पाच तास काढले झाडावर
- पुणे: अंगावर पेट्रोल ओतून जिवंत मारण्याच्या गंभीर प्रकरणातील आरोपीला उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा; जामीन मंजूर
- पुणे: अल्पवयीन नात घरात एकटी दिसली अन्...; इंदापूर तालुक्यात ६७ वर्षीय आजोबाचे संतापजनक कृत्य, पोलिसांनी केली अटक
- मुंबई: शेतकऱ्यांचा संताप आणि पेच: शासकीय योजनांसाठी आयटीआर सक्तीची अट अन् कर्जमाफीचा प्रश्न; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
गुन्हा
- ठाणे: उल्हासनगरमध्ये सायबर फसवणूक; लंडनच्या डॉक्टर मित्राकडून २५ हजार पाउंड्सचे आमिष दाखवून महिला डॉक्टरला २ लाखांना गंडा
- वाशिम: अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीची पत्नी आणि प्रियकराकडून निर्घृण हत्या; दारू पाजून दोरीने गळा आवळत केला गेम
- ठाणे: डोंबिवलीत संतापजनक प्रकार; नोकरीचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर तिघा नराधमांकडून अत्याचार; मानपाडा पोलिसांकडून आरोपी जेरबंद
- नागपुर: विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या संघात निवड न झाल्याने १७ वर्षीय महिला क्रिकेटपटूचे टोकाचे पाऊल
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
- आजचे राशिभविष्य २९ जुलै २०२६: गणपती बाप्पाच्या कृपेने ‘या’ राशींना मिळणार नवीन नोकरी आणि आनंदाची बातमी
- आजचे राशिभविष्य २७ जुलै २०२६ : या राशींना नोकरीत प्रमोशन तर काही राशींना व्यवहारात सतर्क राहण्याचा इशारा, जाणून घ्या आजचे भविष्य
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- गोवा: बांबोळीतील 'फुलान्चो खुरीस'जवळ भीषण अपघात; वाहन पेट घेतल्याने एक जण ठार, तर दोघे जण गंभीर जखमी
- नवी दिल्ली: आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झाले आणखी सोपे; नवीन अॅपवरून घरबसल्या करा अर्ज
- जम्मू-काश्मीर: कुलगाममधील केल्लम भागात दहशतवादी हल्ला, छत्तीसगडच्या दोन मजुरांचा मृत्यू; 'लष्कर-ए-तैयबा'कडून कृत्याची कबुली
- पश्चिम बंगाल: पश्चिम बंगालमध्ये माजी सरकारी बस चालकाच्या घरी पोलिसांची धाड, २८ कोटींची रोकड आणि १५ किलो सोने जप्त


























Subscribe to my channel




