पुणे: घाटमाथ्यावरून वाहणाऱ्या नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली असून, पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यामध्ये असलेल्या डिंभे धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरण क्षेत्रात आणि पाणलोट क्षेत्रामध्ये सातत्याने मुसळधार पाऊस पडत असल्याने धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून आणि धरणाची पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी प्रशासनाने डिंभे धरणाचे दरवाजे उघडून तब्बल १०,४३८ क्युसेक इतक्या प्रचंड वेगाने पाणी घोद नदीमध्ये सोडण्यास सुरुवात केली आहे. या वाढलेल्या विसर्गामुळे नदीकाठच्या सर्व गावांमध्ये पूरस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
जलसंपदा विभागाकडून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे डिंभे धरणात येणाऱ्या पाण्याची आवक प्रचंड प्रमाणावर वाढली आहे. यामुळे धरणाचे नियंत्रण राखण्यासाठी आपत्कालीन आराखड्यानुसार पाण्याचा विसर्ग वाढवणे अनिवार्य ठरले. घोद नदीमध्ये १०,४३८ क्युसेक पाणी सोडण्यात आल्यामुळे नदीची पाणीपातळी वेगाने वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नदीकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा कडक इशारा दिला आहे.
घोद नदीकाठी वसलेली जुन्नर, आंबेगाव, शिरूर तालुक्यातील अनेक गावे या विसर्गामुळे धोक्यात येण्याची शक्यता आहे. प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना, शेतकऱ्यांना तसेच पशुपालकांना नदीपात्रात न जाण्याचे, पात्रात उतरू नये किंवा जनावरे व शेतीची अवजारे नदीकाठी बांधू नयेत, असे आवाहन केले आहे. तसेच नदीकाठच्या शेतपिकांचे कोणतेही नुकसान होऊ नये आणि जीवितहानी टळावी यासाठी सर्व संबंधित यंत्रणांना पूर्णपणे सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन कक्ष २४ तास सज्ज ठेवण्यात आला असून, नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे, असे वारंवार सांगण्यात येत आहे.
शहर
- पुणे: अंगावर पेट्रोल ओतून जिवंत मारण्याच्या गंभीर प्रकरणातील आरोपीला उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा; जामीन मंजूर
- पुणे: अल्पवयीन नात घरात एकटी दिसली अन्...; इंदापूर तालुक्यात ६७ वर्षीय आजोबाचे संतापजनक कृत्य, पोलिसांनी केली अटक
- मुंबई: शेतकऱ्यांचा संताप आणि पेच: शासकीय योजनांसाठी आयटीआर सक्तीची अट अन् कर्जमाफीचा प्रश्न; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
- पुणे: भारत आता मार खाणारा देश राहिलेला नाही, गरज पडल्यास घरात घुसून मारणारा देश बनलाय - देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र
- पुणे: अंगावर पेट्रोल ओतून जिवंत मारण्याच्या गंभीर प्रकरणातील आरोपीला उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा; जामीन मंजूर
- पुणे: अल्पवयीन नात घरात एकटी दिसली अन्...; इंदापूर तालुक्यात ६७ वर्षीय आजोबाचे संतापजनक कृत्य, पोलिसांनी केली अटक
- मुंबई: शेतकऱ्यांचा संताप आणि पेच: शासकीय योजनांसाठी आयटीआर सक्तीची अट अन् कर्जमाफीचा प्रश्न; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
- पुणे: भारत आता मार खाणारा देश राहिलेला नाही, गरज पडल्यास घरात घुसून मारणारा देश बनलाय - देवेंद्र फडणवीस
गुन्हा
- ठाणे: उल्हासनगरमध्ये सायबर फसवणूक; लंडनच्या डॉक्टर मित्राकडून २५ हजार पाउंड्सचे आमिष दाखवून महिला डॉक्टरला २ लाखांना गंडा
- वाशिम: अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीची पत्नी आणि प्रियकराकडून निर्घृण हत्या; दारू पाजून दोरीने गळा आवळत केला गेम
- ठाणे: डोंबिवलीत संतापजनक प्रकार; नोकरीचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर तिघा नराधमांकडून अत्याचार; मानपाडा पोलिसांकडून आरोपी जेरबंद
- नागपुर: विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या संघात निवड न झाल्याने १७ वर्षीय महिला क्रिकेटपटूचे टोकाचे पाऊल
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
- आजचे राशिभविष्य २९ जुलै २०२६: गणपती बाप्पाच्या कृपेने ‘या’ राशींना मिळणार नवीन नोकरी आणि आनंदाची बातमी
- आजचे राशिभविष्य २७ जुलै २०२६ : या राशींना नोकरीत प्रमोशन तर काही राशींना व्यवहारात सतर्क राहण्याचा इशारा, जाणून घ्या आजचे भविष्य
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- गोवा: बांबोळीतील 'फुलान्चो खुरीस'जवळ भीषण अपघात; वाहन पेट घेतल्याने एक जण ठार, तर दोघे जण गंभीर जखमी
- नवी दिल्ली: आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झाले आणखी सोपे; नवीन अॅपवरून घरबसल्या करा अर्ज
- जम्मू-काश्मीर: कुलगाममधील केल्लम भागात दहशतवादी हल्ला, छत्तीसगडच्या दोन मजुरांचा मृत्यू; 'लष्कर-ए-तैयबा'कडून कृत्याची कबुली
- पश्चिम बंगाल: पश्चिम बंगालमध्ये माजी सरकारी बस चालकाच्या घरी पोलिसांची धाड, २८ कोटींची रोकड आणि १५ किलो सोने जप्त

























Subscribe to my channel




