पुणे: पती-पत्नीच्या वादातून संतापलेल्या पतीने घर पेटवले; तीन निष्पाप मांजरांचा होरपळून मृत्यू

पुणे: सिंहगड रस्ता परिसरातील सावित्रीबाई फुले वसाहतीत एका पती-पत्नीच्या वादातून अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीची एका अन्य महिलेशी असलेली मैत्री पत्नीला मान्य नव्हती, यावरून गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात सतत खटके उडत होते. या वादाचे रूपांतर अखेर एका गंभीर गुन्ह्यात झाले.

९ जुलै रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास त्यांच्यात पुन्हा एकदा वाद झाला. या वादाच्या रागातून आरोपी पती दयानंद आनंता कसबे (वय ३८) याने घरातील साहित्याला आग लावली. साहित्याने पेट घेतल्यामुळे घरभर आग पसरली. आग लागल्याचे पाहताच पत्नी मोहिनी यांनी घाबरून घराबाहेर धाव घेतली, त्यामुळे त्यांचे प्राण वाचले. मात्र, घरातील गृहोपयोगी साहित्यासोबतच त्यांनी पाळलेल्या तीन पाळीव मांजरांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला.

 

आग लागल्यानंतर आरोपी पती घटनास्थळावरून पसार झाला. रहिवाशांनी वेळीच धाव घेऊन पाणी ओतून आग आटोक्यात आणली. याप्रकरणी पत्नी मोहिनी यांनी पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी पती दयानंद कसबे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.



विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *