मुंबई: वसई-विरारमध्ये मुसळधार पावसाचा जोर कमी झाला असला तरी पूरस्थितीची भीषणता अद्याप कायम आहे. नालासोपारा पूर्व परिसरात घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण राज्याला हादरवून सोडले आहे. पूराच्या पाण्यात अडकलेल्या २२ वर्षीय कविता दुधनाथ जैस्वाल या तरुणीचा उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना दुर्दैवी मृत्यू झाला.
७ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे नालासोपारा पूर्वेतील बकरा कंपाऊंड, मनीचा पाडा परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. कमरेएवढ्या पाण्यामुळे रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचू शकत नव्हती. अशा बिकट परिस्थितीत स्थानिक नागरिकांनी चादरीचे तात्पुरते स्ट्रेचर तयार करून तरुणीला पाण्यातून मार्ग काढत रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती तिला मृत घोषित केले. संकटाच्या काळात नागरिकांनी दाखवलेली माणुसकी कौतुकास्पद असली, तरी या घटनेचा शेवट अत्यंत दुःखद ठरला.
दरम्यान, वसई-विरार आणि नालासोपारा परिसरात अजूनही अनेक भागांमध्ये कंबरभर पाणी साचले असून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. अनेक सोसायट्या, रुग्णालये आणि रस्ते अद्याप पाण्याखाली आहेत. रुग्णालयांमध्येही पाणी शिरल्याने काही रुग्णांना अन्यत्र हलवावे लागले असून, रुग्णवाहिकांना पोहोचण्यात अडचणी येत आहेत. नागरिकांना अत्यावश्यक सेवांसाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे.
शहर
- रक्षकच बनले भक्षक! पुण्यात खंडणीसाठी कुटुंबाचे अपहरण करणाऱ्या ५ पोलीस कर्मचाऱ्यांना अटक; एक जण फरार
- चंद्रपूर: ७७१ कोटींच्या महाजेनको प्रकल्पांवर संशय! RTI मधून धक्कादायक माहितीची उघड
- पुणे: कचऱ्याचा डोंगर कोसळून इमारत जमीनदोस्त,अजून काही जन अडकल्याची भीती ! बचावकार्य युद्धपातळीवर
- नागपुर: FDAची धडक मोहीम; स्वीट फॅक्टरीचा परवाना निलंबित, बेकायदेशीर सौंदर्यप्रसाधनांचा पर्दाफाश
महाराष्ट्र
- रक्षकच बनले भक्षक! पुण्यात खंडणीसाठी कुटुंबाचे अपहरण करणाऱ्या ५ पोलीस कर्मचाऱ्यांना अटक; एक जण फरार
- भ्रष्टाचाराचा महापूर! निवृत्त आरटीओ अधिकाऱ्याच्या घरी छापा; १.६२ कोटींची रोकड, १३ किलो सोने आणि ३५ कोटींची मालमत्ता जप्त
- चंद्रपूर: ७७१ कोटींच्या महाजेनको प्रकल्पांवर संशय! RTI मधून धक्कादायक माहितीची उघड
- सोलापूर: उजनी धरण धोक्यात गाळ आणि प्रदूषणावर तातडीने उपाययोजना हवी, अन्यथा भविष्यातील जलसंकट अटळ!
गुन्हा
- हिंगोली: पहिली पत्नी जिवंत असतानाच दुसरं लग्न; मंडपातच पोलिसाने पत्नीला बेदम मारहाण
- कोल्हापूर: एसटी स्टँड परिसरात पतीकडून पत्नीची भरदिवसा हत्या
- सोलापुरात मालमत्तेच्या वादातून काका-काकूंची निर्घृण हत्या; पुतण्यांनी चोरीचा बनाव रचला, साहिल शेख मुंबईतून अटकेत
- "उत्तर प्रदेशात भीषण अपघात: पंक्चर काढताना अज्ञात वाहनाची धडक; ४ तरुणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू"
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- हाय ब्लड प्रेशरचे ५ गंभीर संकेत! शरीरात ही लक्षणे दिसल्यास करू नका दुर्लक्ष.
- आर्थिक राशिभविष्य ८ जुलै २०२६: 'सम योगा'मुळे कोणाचे नशीब उजळणार? जाणून घ्या आजचे विशेष शुभ संकेत!
- 'लाडकी बहीण' योजनेच्या लाभाची रक्कम २१०० रुपये होणार का? केंद्राच्या अहवालामुळे पुन्हा चर्चेला उधाण!
- पावसाळी आरोग्य इशारा: कॅन्सर रुग्ण आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या व्यक्तींनी राहावे सावधान!
मनोरंजन
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उत्तर प्रदेशातील कुख्यात गँगस्टरला महाराष्ट्रात मोठा झटका; उमरग्यातील दाल मिलसह १०० कोटींची मालमत्ता जप्त!
- देश-विदेश: पंतप्रधान नरेंद्र मोदी देणार इंडोनेशियातील प्रंबनम मंदिराला भेट!!
- "उत्तर प्रदेशात भीषण अपघात: पंक्चर काढताना अज्ञात वाहनाची धडक; ४ तरुणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू"
- मोठी बातमी! पीएफ काढण्याचे नियम बदलले; आता पैसे काढताना 'हे' नियम पाळावे लागणार!


























Subscribe to my channel



