आषाढी वारी २०२६: वारकऱ्यांसाठी धावणार १२६० जादा बस; पंढरपूरच्या वारीसाठी 'एसटी'चे मराठवाड्यातील मोठे नियोजन!

धाराशिव:आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या वारकरी आणि भाविकांच्या सोयीसाठी राज्य परिवहन महामंडळ (एसटी) पूर्णपणे सज्ज झाले आहे. वारीच्या काळात प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन मराठवाड्यातील सात विभागांमधून एकूण १२६० जादा बस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या नियोजनात जळगाव विभागाकडून चालक आणि वाहकांसह मिळणाऱ्या ५० अतिरिक्त बसचाही समावेश करण्यात आला आहे.

पंढरपूरला जाणाऱ्या वारकरी आणि भाविकांचा प्रवास सुखाचा आणि सुरक्षित व्हावा यासाठी एसटी महामंडळाने विशेष व्यवस्था केली आहे. यामध्ये प्रवाशांसाठी विशेष आरक्षण खिडक्या, अतिरिक्त कर्मचारी आणि सुरक्षित प्रवासाची चोख व्यवस्था करण्यात आली आहे.



गुन्हा

मनोरंजन

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *