सध्या देशभरात चर्चा आहे ती अयोध्येतील श्रीराममंदिराची आणि मंदिराच्या दानपेटीतील कथित चोरीची.काही जण म्हणतात, मोठ्या लोकांना वाचवले जातआहे व लहान कर्मचाऱ्यांवर कारवाई होत आहे. तरसरकारचे म्हणणे आहे की, दोषी कुणीही असो, त्यालाशिक्षा टाळता येणार नाही. रामधनाची चोरी केव्हापासून सुरू होती व किती रक्कमलंपास झाली, हे अद्याप स्पष्ट नाही. तपासादरम्यानकाहींच्या घरातून सोने-चांदी जप्त झाल्याचे सांगितलेजाते. काहींकडून मंदिराच्या दानपेट्याच जप्त केल्याचे समोर आले आहे. या तपासातून अखेर काय निष्पन्नहोईल, हे अद्याप सांगता येत नाही. या प्रकरणात कोण कुणाला वाचवत आहे किंवा कुणाला गोवण्याचा प्रयत्नहोत आहे, याचा अधिकृत निष्कर्ष समोर आलेला नाही. मात्र तपास करणाऱ्या विशेष तपास पथकावर (एसआयटी) कोणत्याही प्रकारचा राजकीय किंवा प्रशासकीय दबाव येऊ नये, ही राज्य सरकारचीजबाबदारी आहे. शक्य असल्यास न्यायालयाच्या देखरेखीखाली तपास व्हावा. तसेच मंदिरातील देणगीचेनिष्पक्ष व स्वतंत्र ऑडिट झाल्याशिवाय चोरीची खरीरक्कम समोर येणे कठीण आहे. या घटनेमुळेअयोध्येच्या आध्यात्मिक व सांस्कृतिक महत्त्वालाहीधक्का बसला आहे. अयोध्येचा पहिला उल्लेखअथर्ववेदात आढळतो. त्यामध्ये अयोध्येचे वर्णनदेवतांची नगरी म्हणून केले गेले – "अष्टचक्रा नवद्वारादेवानां पुरयोध्या." ब्रह्मदेवाचे मानसपुत्र मनू यांनी भगवानविष्णूंच्या सल्ल्याने व विश्वकर्म्यांच्या देखरेखीखाली यानगरीची स्थापना केली होती. स्कंदपुराणानुसार अयोध्याभगवान विष्णूंच्या सुदर्शन चक्रावर वसलेली आहे.त्याशिवाय वैवस्वत मनू यांनी ही नगरी प्रथमवसवल्याचेही मानले जाते. अयोध्येसाठी अशा घटनानवीन नाहीत. या देवनगरीने वैभव, पराक्रम आणि त्यागपाहिला. डोंगराएवढी दुःखेही अनुभवली. ऋषितुल्यराजा मांधाता यांचे साम्राज्य पाहिले, तर सत्यासाठीसर्वस्वाचा त्याग करणाऱ्या राजा हरिश्चंद्रांचे जीवनहीअनुभवले. कैकेयीने युद्धात तुटलेल्या रथाच्या चाकातस्वतःचे बोट अडकवून केलेला त्याग पाहिला तर त्याचकैकेयीच्या हट्टामुळे प्रभू श्रीरामांना वनवासालाजातानाही पाहिले. अयोध्येची तुलना स्वर्गाशी केलीगेली, पण तिच्या वेदनांनाही अंत नव्हता. पुत्रवियोगानेराजा दशरथांनी प्राणत्याग केला. भरताने सिंहासननाकारून श्रीरामांच्या पादुकांची पूजा केली. लक्ष्मणानेचौदा वर्षे अखंड सेवा केली, तर ऊर्मिलेने विरह सहनकेला. त्रेतायुगापासून कलियुगापर्यंतच्या असंख्य कथाया नगरीच्या इतिहासात कोरल्या गेल्या. आज श्रीराम मंदिरात भाविकांना रामलल्लाचे दर्शन घेतायेते. त्या जन्मभूमीसाठी साडेचारशे वर्षांहून अधिककाळ संघर्ष झाला. कधी संत, धर्मगुरूंनी याआंदोलनाचे नेतृत्व केले. कधी राजकीय पक्ष त्यातसहभागी झाले. आंदोलनामुळे अनेक सरकारेकोसळली.काही सत्तेत आली. या आंदोलनाला मोठीगती मिळाली ती बाबरी मशिदीचे कुलूप उघडल्यानंतर.शाहबानो प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निर्णय केंद्रानेमुस्लिम समाजाच्या दबावाखाली बदलल्यानंतर हिंदूसमाजात नाराजी निर्माण झाली. त्यानंतर 1 फेब्रुवारी1986 रोजी बाबरीचे कुलूप उघडले. त्या बंददरवाजांमागे संघर्ष दडलेला आहे, याची कुणालाहीकल्पना नव्हती. अशोक सिंघल यांच्या शिलापूजनामुळेहे आंदोलन घरोघर पोहोचले. आज अशोक सिंघलहयात असते, तर त्यांना काय वाटले असते? त्यांनीआयुष्य मंदिरासाठी संघर्षात घालवले आणि अखेर "श्रीराम मंदिर उभे राहताना पाहणे हीच अखेरची इच्छाआहे," असे म्हणत या जगाचा निरोप घेतला. अयोध्येतील श्रीराम मंदिरासाठी शेकडोनव्हे, तर हजारो लोकांनी अनेक वर्षे संघर्षकेला. अनेकांनी प्राणांचीही आहुती दिली.अशा मंदिरात देणगीच्या रकमेतील कथितचोरीच्या घटनांमुळे त्यांच्या आत्म्यालाकिती वेदना झाल्या असतील, याचीकल्पनाही करणे कठीण आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: जुन्नर तालुक्यातून खळबळजनक बातमी; बेपत्ता तरुणाचा मृतदेह आढळला आभाटेक जंगलात, परिसरात उडाली मोठी दहशत व शोककळा
- पुणे: विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात कसूर चालणार नाही; राज्य शिक्षण विभागाकडून शाळांसाठी नियमावली जाहीर, दिले ११ महत्त्वाचे निर्देश
- पुणे: भिंतीवर कशाला, मी माझ्या कपाळावरच नरेंद्र मोदींचा फोटो चिटकवून फिरतो; भाजप-मनसे फोटो राजकारणावर संदीप देशपांडे यांचे जोरदार आव्हान
- पुणे: पंतप्रधान मोदींचे नेतृत्व मान्य नसेल तर पाकिस्तानात जा! मनसे नेते अमित ठाकरेंवर शिंदेसेनेचे नेते सिद्धेश कदम यांची घणाघाती टीका
महाराष्ट्र
- पुणे: जुन्नर तालुक्यातून खळबळजनक बातमी; बेपत्ता तरुणाचा मृतदेह आढळला आभाटेक जंगलात, परिसरात उडाली मोठी दहशत व शोककळा
- पुणे: विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात कसूर चालणार नाही; राज्य शिक्षण विभागाकडून शाळांसाठी नियमावली जाहीर, दिले ११ महत्त्वाचे निर्देश
- पुणे: भिंतीवर कशाला, मी माझ्या कपाळावरच नरेंद्र मोदींचा फोटो चिटकवून फिरतो; भाजप-मनसे फोटो राजकारणावर संदीप देशपांडे यांचे जोरदार आव्हान
- जालना: मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्र पेटला! मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनात उद्या जालना, बीड, परभणी आणि लातूर कडकडीत बंद; काय सुरू आणि काय राहणार बंद?
गुन्हा
- उत्तर प्रदेश: आग्रा येथे संतापजनक प्रकार! माजी राष्ट्रीय पॉवरलिफ्टर खेळाडूवर पतीकडून हॉटेलमध्ये चाकूने प्राणघातक हल्ला
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

पुण्यात NCP कार्यालयाबाहेर तरुणांच्या दोन गटांत राडा; एकमेकांना मारहाण
मुंबई लोकलच्या छतावर चढला तरुण; ओव्हरहेड वायरच्या संपर्कात येऊन 45% भाजला
वादळाआधीच मेक्सिकोत जोरदार वाऱ्यांचा तडाखा; मैदानातून खेळाडूंची धावपळ!
देश विदेश
- नेपाळ: पूर येताच सर्वात पहिली मदत भारताकडून आली; नेपाळच्या पंतप्रधानांचे संसदेत भारत आणि चीनचे मानले आभार; महाप्रलयाच्या पार्श्वभूमीवर मोठी घडामोड
- उत्तराखंड: पूर आलेली नदी पार करताना हातातून निसटली चिमुकली, लेकीला वाचवण्यासाठी आईने पाण्यात मारली उडी अन् दोघींचाही मृत्यू
- चेन्नई: थलपती विजय भारताचे पंतप्रधानच काय, अमेरिकेचे अध्यक्षही होऊ शकतात; ई. पलानीस्वामींचा उपरोधिक टोला
- पश्चिम बंगाल: ममता बॅनर्जींच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर! भाचीचा राहत्या घरी संशयास्पद मृत्यू; नोकरी गेल्यामुळे आणि घटस्फोटाच्या प्रकरणामुळे होती तणावात


























Subscribe to my channel




