प्रा. चेतनसिंह सोळंकी यांचा कॉलम:आपली पृथ्वी हेच आपले मोठे घर; स्वतःच्या घराप्रमाणे ते स्वच्छ ठेवावे‎

आपली दोन घर असतात – एक लहान आणि एक मोठे.‎ लहान घर म्हणजे चार भिंतींचे आपले निवासस्थान. त्यात‎सोफा असतो. जेवणाचे टेबल, बिछाना असतो. या घराची‎आपण विशेष काळजी घेतो. ते स्वच्छ ठेवतो, जपतो;‎कारण ते आपल्याला सुरक्षितता देते. धूळ, उष्णता, थंडी,‎वारा व पावसापासून संरक्षण करते.‎ याचप्रमाणे आपले आणखी एक मोठे घर आहे – पृथ्वीचे‎पर्यावरण. हेही आपले संरक्षण करते. हे मोठे घर नसते तर‎सूर्याची किरणे इतकी तीव्र असती की ती सहन करणे‎अशक्य झाले असते. किंवा पृथ्वीचे तापमान इतके कमी‎झाले असते की येथे जीवनच शक्य राहिले नसते. मग‎असे असतानाही आपण या मोठ्या घराची काळजी का‎घेत नाही? पर्यावरणात अतिउष्णता, अतिथंडी किंवा‎अतिवृष्टी झाली, तर त्याचा परिणाम थेट आपल्यावर‎होतो. एकूणच पर्यावरणात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा‎परिणाम आपल्या जीवनावर होतो. पण आपण काही‎करतो, त्याचाही परिणाम पर्यावरणावर होतो. प्रत्यक्षात‎ आधुनिक जीवनात पर्यावरणावर परिणाम होत नाही असे‎माणसाचे फार कमी काम असेल. दुर्दैवाने आपल्या‎बहुतांश कृती पर्यावरणाला सकारात्मक नव्हे, तर‎नकारात्मक पद्धतीने प्रभावित करतात. हे पर्यावरण,‎म्हणजेच आपले हे मोठे घर, आपल्याला जीवन देते. तेच‎आपल्याला हवा, पाणी, अन्न वजगण्यालायक परिस्थिती‎उपलब्ध करून देते. पण त्याच्या बदल्यात आपण त्याला‎काय देतो? आपण ते प्रदूषित करतो. त्यात कार्बन‎डायऑक्साइड आणि इतर प्रदूषक सोडतो. आपण‎स्वयंपाक करतो, प्रवास करतो, वीज वापरतो किंवा‎एखादी वस्तू खरेदी करतो, तेव्हा प्रत्येक वेळी कार्बन‎डायऑक्साइडच्या रूपातील अदृश्य कचरा वातावरणात‎सोडतो. हाच कचरा पृथ्वीचे तापमान वाढवण्याचे काम‎करतो. आपल्याला वाटते की हवामान बदल किंवा प्रदूषण‎केवळ कारखान्यांमुळे होते. तसे नाही. आपल्या दैनंदिन‎जीवनातील आणि कारखान्यांत तयार होणाऱ्या वस्तूंच्या‎अनियंत्रित वापरामुळेही ते मोठ्या प्रमाणात वाढते. आपण‎सर्वजण दररोज, किंबहुना प्रत्येक मिनिटाला, हा अदृश्य‎कचरा फेकून आपल्या वातावरणरूपी मोठ्या घराचे‎नुकसान करत आहोत. एकदा माझ्या व्याख्यानात मी‎श्रोत्यांना म्हणालो, //"मी तुम्हा प्रत्येकाला थोडासा कचरा‎देतो. तो तुम्ही घरी नेऊन स्वतःच्या घरात टाकाल का? ‘‎सर्वांनी तात्काळ नकार दिला. कुणी म्हणाले, //"बायको‎रागावेल.//" कुणी म्हणाले, //"आई ओरडेल.’ तेव्हा मी‎विचारले, //" आपण आपल्या छोट्या घरातही कचरा‎टाकत नाही, तेव्हा आपल्याला जीवन देणाऱ्या या मोठ्या‎घरात कचरा कसा टाकतो?//" आज देश-विदेशात अवेळी‎पाऊस पडत आहे. थंड युरोपात जीवघेणी उष्णतेची लाट‎आली आहे. जंगलांना आग लागत आहे. हवामानातील हा‎असमतोल म्हणजे निसर्गाची प्रतिक्रिया आहे. काहीतरी‎गंभीर बिघडत असल्याचा तो निसर्गाचा इशारा आहे. कधी‎कधी मला वाटते, आपणच निसर्ग असतो, तर कदाचित‎अशीच शिक्षा दिली असती. कारण आपण त्याच्या घरात‎कचरा पसरवत आहोत. त्याचे संतुलन बिघडवत आहोत‎आणि तरीही सर्व काही पूर्ववत राहावे, अशी अपेक्षा करत‎आहोत. आज आपण पृथ्वीवर कचरा टाकत आहोत,‎त्याची शिक्षा पुढील पिढ्यांना भोगावी लागणार आहे. हे‎कटू सत्य आपल्याला जागे करण्यासाठी पुरेसे आहे.‎कदाचित याच जाणिवेतून पर्यावरण संवर्धनाची खरी‎सुरुवात होईल आणि मर्यादित संसाधने असलेल्या या‎पृथ्वीवर आपल्या गरजाही मर्यादित ठेवण्याचा आपण‎प्रयत्न करू.‎ हवामान सुधारणा केवळ तंत्रज्ञानाने किंवा कायद्यांनी सुरू‎होत नाही. ती जागरूकतेतून सुरू होते. ती संयमातून सुरू‎होते. आणि आपल्यापैकी प्रत्येकाने आपल्या या मोठ्या‎घराशी तितक्याच आदराने वागण्यापासून सुरू होते,‎जितक्या आदराने आपण आपल्या शयनकक्षाची काळजी‎घेतो. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे. )‎

This post was originally published on this site.



विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *