अकृषक परवानगी रद्द, पुढे कायImage Credit source: टीव्ही ९ मराठी
NA Permission cancelled : राज्य सरकारने एनए परवानगी रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. शेतजमिनीच्या निवासी, व्यावसायिक अथवा औद्योगिक वापरासाठी लागणारी बिनशेती अथवा अकृषिक परवानगीची अट आता कायमची हद्दपार करण्यात आली आहे. राज्यातील जनतेसह बांधकाम व्यावसायिक, गृहनिर्माण संस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे. एनए परवानगीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवण्याची गरज नाही. पण आता बांधकामासाठी कुणाकडं परवानगी मागायची आणि पुढील प्रक्रिया काय आहे, याविषयी जनतेच्या मनात संभ्रम आहे. तर स्थानिक स्वराज्य संस्थांकडं हे अधिकार देण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे एनए परवानगीसाठी जाण्याची गरज नाही. सरकारने जिल्हाधिकाऱ्यांचे अधिकार कमी करून थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना हे अधिकार दिले आहेत.
बांधकाम नकाशा परवानगी हाच NA
एनएची जाचक प्रक्रिया राज्य सरकारने रद्द केली आहे. आता नगररचना विभाग अथवा स्थानिक प्राधिकरणाची बांधकाम नकाशाला जी परवानगी असेल तीच एनए परवानगी ग्राह्य धरली जाणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडून स्वतंत्र बांधकाम परवानगीची गरज नाही. याशिवाय वार्षिक बिनशेती करही रद्द करण्यात आला आहे. नवीन नियमानुसार एखाद्या जमिनीचा वापर विकास आराखड्यानुसार असेल तर नियोजन प्राधिकरणाने दिलेली बांधकाम परवानगी हीच अकृषक परवानगी मानली जाईल. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वतंत्र परवानगीची किंवा सनदेची गरज नाही.
बांधकाम परवानगीसाठी असा करा अर्ज
नव्या नियमांबरोबरच बांधकाम परवानगीसाठी BPMS अथवा Auto DCR द्वारे ऑनलाईन अर्ज करता येईल. बांधकाम परवानगी मिळताच महसूल विभागाच्या संगणकीय प्रणाली्वारे 7/12 उताऱ्यात आपोआप फेरफार नोंद घेतली जाईल. केवळ बांधकाम परवानगी मिळाली म्हणून भोगवटादार वर्ग 2 दर्जामध्ये बदल होणार नाही. त्यासाठी आवश्यक असलेले नजराणा शुल्क नागरिकांना, बांधकाम व्यावसायिकांना भरावे लागणार आहे, असे महसूल विभागाने स्पष्ट केले आहे.
थकबाकीतून नागरिकांची सूटका
ज्या नागरिकांचा अकृषक कर थकीत आहे. त्यांना या सुधारणेच्या दिनांकापर्यंत थकीत कर वसूल करण्यापासून सूट देण्यात आली आहे. तर ज्या जमिनी 2001 पूर्वी अथवा त्यानंतर बिनशेती झाल्या आहेत. त्यांना एका वर्षाच्या आत विहित दराने एकरक्कमी अधिमूल्य भरावे लागणार आहे. त्यात त्यांना सवलत देण्यात आलेली नाही.
मग आता किती शुल्क आकारले जाणार?
अकृषक कर रद्द झाला असला तरी जमिनीच्या बाजारमुल्यानुसार टप्पानिहाय एकरक्कमी रुपांतरण अधिमूल्य आता आकारण्यात येणार आहे. त्यासाठी 1 हजार चौरस मीटरपर्यंतच्या क्षेत्रफळासाठी चालू बाजारमूल्याच्या 0.10 टक्के, तर 1001 ते 4000 चौरस मीटरपर्यंतच्या क्षेत्रफळासाठी 0.25 टक्के आणि 4 हजार चौरस मीटरपेक्षा जास्त असलेल्या क्षेत्रफळासाठी चालू बाजारमूल्याच्या 0.50 टक्क्यानुसार दर आकारल्या जाईल.
शहर
- पावसाचा कहर! भाजी आणायला गेलेल्या वैभववाडीच्या युवकाचा मुंबईतील साचलेल्या पाण्यात बुडून दुर्दैवी अंत
- पुणे: ७२ दरडग्रस्त गावांचा प्रश्न कायम! फक्त ४४ गावांना पुनर्वसनाची मंजुरी, २२ ठिकाणीच काम सुरू
- केडीएमसी रुग्णालयातील मारहाणीचे पडसाद: शिवसेनेच्या नगरसेवकाने मारहाण केल्याने दोन डॉक्टरांचे राजीनामे
- मुंबई विद्यापीठाचा दणका! पायाभूत सुविधा आणि प्राध्यापकांची कमतरता असलेल्या ३० बी.एड. महाविद्यालयांची संलग्नता रद्द
महाराष्ट्र
- पावसाचा कहर! भाजी आणायला गेलेल्या वैभववाडीच्या युवकाचा मुंबईतील साचलेल्या पाण्यात बुडून दुर्दैवी अंत
- पुणे: ७२ दरडग्रस्त गावांचा प्रश्न कायम! फक्त ४४ गावांना पुनर्वसनाची मंजुरी, २२ ठिकाणीच काम सुरू
- केडीएमसी रुग्णालयातील मारहाणीचे पडसाद: शिवसेनेच्या नगरसेवकाने मारहाण केल्याने दोन डॉक्टरांचे राजीनामे
- मुंबई विद्यापीठाचा दणका! पायाभूत सुविधा आणि प्राध्यापकांची कमतरता असलेल्या ३० बी.एड. महाविद्यालयांची संलग्नता रद्द
गुन्हा
- बीडच्या शेतकऱ्याची किमया! पडीक जमिनीवर बहरली 'कोकण बहाडोली' जांभळाची यशस्वी बाग
- रक्षकच बनले भक्षक! पुण्यात खंडणीसाठी कुटुंबाचे अपहरण करणाऱ्या ५ पोलीस कर्मचाऱ्यांना अटक; एक जण फरार
- हिंगोली: पहिली पत्नी जिवंत असतानाच दुसरं लग्न; मंडपातच पोलिसाने पत्नीला बेदम मारहाण
- कोल्हापूर: एसटी स्टँड परिसरात पतीकडून पत्नीची भरदिवसा हत्या
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- हाय ब्लड प्रेशरचे ५ गंभीर संकेत! शरीरात ही लक्षणे दिसल्यास करू नका दुर्लक्ष.
- आर्थिक राशिभविष्य ८ जुलै २०२६: 'सम योगा'मुळे कोणाचे नशीब उजळणार? जाणून घ्या आजचे विशेष शुभ संकेत!
- 'लाडकी बहीण' योजनेच्या लाभाची रक्कम २१०० रुपये होणार का? केंद्राच्या अहवालामुळे पुन्हा चर्चेला उधाण!
- पावसाळी आरोग्य इशारा: कॅन्सर रुग्ण आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या व्यक्तींनी राहावे सावधान!
मनोरंजन
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
विडियो गॅलेरी

देश विदेश
- तुम्हाला खरंच गांभीर्य कळतंय का?; शिवम दुबेच्या आधी हर्षित राणाला फलंदाजीला पाठवल्याने दिनेश कार्तिक टीम इंडियावर भडकला
- उत्तर प्रदेशातील कुख्यात गँगस्टरला महाराष्ट्रात मोठा झटका; उमरग्यातील दाल मिलसह १०० कोटींची मालमत्ता जप्त!
- देश-विदेश: पंतप्रधान नरेंद्र मोदी देणार इंडोनेशियातील प्रंबनम मंदिराला भेट!!
- "उत्तर प्रदेशात भीषण अपघात: पंक्चर काढताना अज्ञात वाहनाची धडक; ४ तरुणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू"

























Subscribe to my channel




