Violent Clash Over Common Land in Gunda Vadgaon: 5 Injured

बीडमध्ये जमिनीच्या वादातून मोठा राडा! गुंदा वडगावात ५ जण जखमी; पिंपळनेर पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह

Violent Clash Over Common Land in Gunda Vadgaon: 5 Injuredबीड: बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील गुंदा वडगाव येथे गायरान जमिनीच्या वादावरून दोन गटात झालेला संघर्ष विकोपाला गेला असून, या घटनेत ५ जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर पिंपळनेर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आणि महावितरणच्या (MSEDCL) भूमिकेवर पीडित कुटुंबांनी गंभीर आरोप केले आहेत.

 

नेमके काय घडले?

गायरान जमिनीच्या ताब्यावरून गावात दीर्घकाळापासून वाद सुरू होता. गुरुवारी रात्री वाद वाढल्यानंतर दोन्ही गट आमनेसामने आले. यात झालेल्या मारामारीत ५ जण जखमी झाले. घटनेची तीव्रता इतकी होती की, भीतीपोटी पीडित कुटुंबाला रात्रभर पोलीस ठाण्यात मुक्काम करावा लागला. सकाळी पुन्हा गावात गेल्यावर समोरच्या गटाने पुन्हा हल्ला केल्याचा आरोप पीडितांनी केला आहे.

पोलिस आणि महावितरणवर आरोप:

पीडित कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार, या वादात महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी देखील नियमांचे उल्लंघन करून चुकीच्या पद्धतीने कनेक्शन दिल्याचे समोर येत आहे. स्थानिक पातळीवर तक्रार करूनही पोलिसांनी सुरुवातीला ठोस कारवाई केली नाही, उलट आम्हालाच वेठीस धरले, असा आरोप जखमींनी केला आहे. या प्रकरणातील गुन्हेगारांवर कारवाई करण्याऐवजी पोलीस आरोपींना पाठीशी घालत असल्याचा खळबळजनक दावा त्यांनी बीडच्या पोलीस अधीक्षक कार्यालयात येऊन केला आहे.

 

तणावाचे वातावरण:

जखमींनी थेट जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात धाव घेऊन न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे. या घटनेनंतर गुंदा वडगाव परिसरातील तणाव वाढला आहे. पोलिसांनी आता तरी निष्पक्ष तपास करून दोषींवर कडक कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.



शहर

मनोरंजन

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *