Husband murders wife over extramarital affair, tries to pass it off as heart attack; Exposed by post-mortem report!

बदलापूर: अनैतिक संबंधावरून पत्नीची निर्घृण हत्या; नवऱ्याचा 'हार्ट अटॅक'चा बनाव पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये उघड!

Husband murders wife over extramarital affair, tries to pass it off as heart attack; Exposed by post-mortem report!
बदलापूर: अनैतिक संबंधातून एका विवाहित महिलेची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्राजक्ता मेहेर (मृतक) असे या महिलेचे नाव असून, तिच्या पतीनेच तिचे नाक-तोंड दाबून तिची हत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे, पत्नीचा मृत्यू हार्ट अटॅकमुळे झाल्याचा बनाव या पतीने रचला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी पतीचे एका अन्य महिलेसोबत अनैतिक संबंध होते. या कारणावरून तो पत्नीवर सतत घटस्फोटासाठी दबाव टाकत होता. मात्र, प्राजक्ताने घटस्फोट घेण्यास स्पष्ट नकार दिला होता. या वादातूनच आरोपी पतीने पत्नीचा काटा काढण्याचे ठरवले.

 

घटनेच्या दिवशी आरोपीने प्राजक्ताचे नाक आणि तोंड दाबून तिची हत्या केली. त्यानंतर, तिचे निधन हृदयविकाराच्या झटक्याने (हार्ट अटॅक) झाल्याचे भासवले. परंतु, मृतदेहाच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून हत्येचा गौप्यस्फोट झाला. शवविच्छेदन अहवालात तिची हत्या झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी आरोपी पती आणि त्याला मदत करणाऱ्या त्याच्या आईला अटक केली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *