Secures Second Place Nationally with Over 6 Lakh Rooftop Solar Installations!

सूर्यघर वीज योजनेत महाराष्ट्र देशात चमकला! दोन वर्षांत ६ लाखांहून अधिक सौर प्रकल्प बसवून मिळवले देशात दुसरे स्थान.

Secures Second Place Nationally with Over 6 Lakh Rooftop Solar Installations! सूर्यघर योजनेत महाराष्ट्राची उत्तुंग भरारीकेंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी 'प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजने'मध्ये महाराष्ट्राने देदीप्यमान कामगिरी करत देशात दुसरे स्थान पटकावले आहे. महावितरणने गेल्या दोन वर्षांत ६ लाख ५ हजार ८४७ घरांच्या छतावर सौर प्रकल्प कार्यान्वित केले आहेत. या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत केंद्र शासनाच्या नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने महाराष्ट्राला विविध वर्गवारींत आठ राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित केले आहे.

कामगिरीचे प्रमुख पैलू:राष्ट्रीय रँकिंग: या योजनेत गुजरात ६,८१,४११ प्रकल्पांसह पहिल्या, तर महाराष्ट्र ६,०५,८४७ प्रकल्पांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. उत्तर प्रदेश ५,६४,८४६ प्रकल्पांसह तिसऱ्या स्थानी आहे. नागपूर जिल्ह्याचे वर्चस्व: या यशात नागपूर जिल्ह्याचा वाटा सिंहाचा आहे. नागपूरने ८९,२५५ सौर प्रकल्प बसवून राज्यात अव्वल आणि देशात दुसरा क्रमांक मिळविला आहे. नागपूरसोबतच जलजगाव (९ वा क्रमांक) आणि पुणे (१० वा क्रमांक) या जिल्ह्यांनीही देशातील पहिल्या १० जिल्ह्यांच्या यादीत स्थान मिळवून राज्याची मान उंचावली आहे.

'मंथ ऑफ सोलर' मधील योगदान: मे २०२६ मध्ये राबविण्यात आलेल्या 'मंथ ऑफ सोलर' मोहिमेत महाराष्ट्राने मोठी आघाडी घेतली. मे महिन्यात राज्यात ६५,७८६ अर्ज प्राप्त झाले आणि ५४,२४६ सौर प्रकल्प उभारले गेले, ज्यामध्येही राज्याने देशात दुसरा क्रमांक मिळवला.

विक्रमी कामगिरी: २९ मे २०२६ रोजी संपूर्ण देशात एकाच दिवसात १५,००० सौर प्रकल्प उभारण्याचा विक्रम झाला, ज्यामध्ये एकट्या महाराष्ट्राचा वाटा ४,७०० प्रकल्पांचा होता. या यशाचे श्रेय महावितरणचे अधिकारी, कर्मचारी आणि सौर ऊर्जा स्वीकारणाऱ्या जागरूक ग्राहकांना जाते.
घरोघरी जाऊन जनजागृती करणे आणि तांत्रिक सोयीसुविधा पुरविल्यामुळेच महाराष्ट्र या योजनेत अग्रगण्य राहिला आहे.



विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *