नाशिक: अघोरी पूजा, पितृदोष निवारण, तंत्रविद्या आणि कुटुंबातील व्यक्तींच्या मृत्यूची भीती दाखवून नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या एका हायप्रोफाइल भोंदूबाबाचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. कमलेश उर्फ शिवकुमार अधिकारी असे अटक करण्यात आलेल्या या भोंदूबाबाचे नाव असून त्याच्या फसवणुकीचे नवे आणि धक्कादायक धागेदोरे पोलीस तपासात समोर येत आहेत.
राज्यभर वास्तव्य बदलून घातला गंडा
मूळचा पुण्याचा रहिवासी असलेला भोंदू कमलेश हा अत्यंत शातीर गुन्हेगार आहे. त्याने केवळ एकाच शहरात न थांबता त्र्यंबकेश्वर, नागपूर, सोलापूर आणि पुणे या विविध शहरांमध्ये सातत्याने आपले वास्तव्य बदलले. प्रत्येक ठिकाणी नवीन ओळख निर्माण करून त्याने शेकडो अंधश्रद्धाळू भाविकांना आपल्या जाळ्यात ओढले आणि त्यांना आर्थिक गंडा घातला.
विमानाने कोलकाता येथे नेऊन अघोरी पूजा!
तक्रारदारांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, कमलेश हा लोकांच्या अगतिकतेचा गैरफायदा घ्यायचा. काही पीडित महिला आणि त्यांच्या कुटुंबीयांना त्याने थेट विमानाने कोलकाता येथे नेले होते. तिथे महाकाली देवीच्या नावाखाली अघोरी पूजा आणि तंत्र-मंत्राचे विधी करून त्यांच्याकडून मोठी रक्कम उकळल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
धार्मिक स्थळांचा गैरवापर आणि प्रॉपर्टीवर डोळा
भोंदू कमलेशच्या फसवणुकीची पद्धत (Modus Operandi) अत्यंत नियोजनबद्ध होती. तो भाविकांना मंतरलेल्या पाण्याने आंघोळ घालणे, पितृदोष निवारण करणे आणि विशेष पूजा करण्यासाठी उज्जैन, त्र्यंबकेश्वर आणि नाशिकमधील गोदाघाट अशा प्रसिद्ध धार्मिक स्थळांवर घेऊन जायचा. या दौऱ्यांदरम्यान तो भाविकांशी अतिशय गोड बोलून त्यांच्या कौटुंबिक अडचणी आणि मुख्य म्हणजे त्यांच्या मालमत्तेची (Property) इत्थंभूत माहिती काढून घ्यायचा. एकदा का मालमत्तेचा अंदाज आला, की तो फसवणुकीचा मोठा सापळा रचायचा.
भोंदूची पत्नी फरार; पोलिसांची पथके रवाना
या गंभीर गुन्ह्यात भोंदू कमलेशला अटक करण्यात आली असली, तरी त्याची पत्नी पोलिसांना गुंगारा देऊन फरार झाली आहे. या गुन्ह्यात तिचाही सक्रिय सहभाग असल्याचा पोलिसांना संशय आहे. फरार पत्नीचा आणि या रॅकेटमधील इतर साथीदारांचा शोध घेण्यासाठी नाशिक पोलिसांनी दोन विशेष पथके वेगवेगळ्या राज्यांत आणि शहरांत रवाना केली आहेत. या भोंदूबाबाला आणखी किती लोकांनी पैसे दिले आहेत, याचा शोध आता पोलीस घेत आहेत.
शहर
- रायगड: रामधरणेश्वर येथील तलावात बुडून २६ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू!
- 'क्राईम पेट्रोल' फेम अभिनेता सतीश नायकोडी यांची फसवणूक; एसआरए इमारतीत स्वस्त फ्लॅट मिळवून देण्याच्या नावाखाली लाखांची लुबाडणूक
- छत्रपती संभाजीनगर हादरलं! सामान पॅक करण्याच्या बहाण्याने बोलावून ३१ वर्षीय पीएचडीच्या विद्यार्थिनीवर रात्री अत्याचार; डिलिव्हरी बॉयच्या कृत्याने खळबळ!
- भाजपसोबत नाही! युसूफ पठाणसह तीन एनसीपीआय (NCPI) खासदारांची एनडीएच्या बैठकीला पाठ; राजकीय वर्तुळात मोठी खळबळ!
महाराष्ट्र
- ईएमआय एक-दोन दिवस उशिरा भरल्यास सीबीआयएल स्कोअर खराब होतो का; जाणून घ्या नियम आणि परिणाम
- बीड: आष्टीत अमृता फडणवीस यांच्या हस्ते महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन; बीडमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयसाठी पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन
- कोल्हापूर: जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागातील अपहार प्रकरणात मोठी घडामोड; १५ दिवसांपूर्वी जमा झाले आणखी २८ लाख
- 'क्राईम पेट्रोल' फेम अभिनेता सतीश नायकोडी यांची फसवणूक; एसआरए इमारतीत स्वस्त फ्लॅट मिळवून देण्याच्या नावाखाली लाखांची लुबाडणूक
गुन्हा
- नागपुर: फ्रेंडशिप डे दिवशी थरार; लग्न आणि गिफ्टच्या वादातून तरुणीला नदीत ढकलून केली हत्या, खळबळजनक घटना उघड
- महाडमध्ये महिला डॉक्टरचा अमानुष छळ; १८ वर्षांत तब्बल १० वेळा सक्तीने गर्भपात केल्याप्रकरणी पतीवर गंभीर आरोप
- पुणे: ६ वर्षांनंतर अखेर न्याय मिळाला; पुण्याच्या बुधवार पेठेत २२ वर्षीय प्रेयसीच्या खून प्रकरणात नराधम प्रियकराला जन्मठेपेची शिक्षा
- चंद्रपूर: प्रेमाच्या लग्नानंतर अवघ्या तीन महिन्यांतच संपला तरुणीचा संसार; चंद्रपूरमधील दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य ३ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या आज कोणत्या राशींवर होणार शिवाची कृपा आणि कोणाला मिळणार ग्रहांची साथ
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उत्तर प्रदेश: 'बायकोने मृतदेहाला स्पर्शही करायचा नाही, माझा आत्मा…', भाचीला सुसाइड नोट पाठवत जिम संचालक व कॉलेज लिपिकाने स्वतःला संपवले
- ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक पराक्रम; ज्युडोमध्ये सुवर्णपदक जिंकणारी अस्मिता डे ठरली पहिली भारतीय खेळाडू!
- गोवा: बांबोळीतील 'फुलान्चो खुरीस'जवळ भीषण अपघात; वाहन पेट घेतल्याने एक जण ठार, तर दोघे जण गंभीर जखमी
- नवी दिल्ली: आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झाले आणखी सोपे; नवीन अॅपवरून घरबसल्या करा अर्ज




























Subscribe to my channel




