अहिल्यानगर (श्रीरामपूर): अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातून रक्ताच्या नात्याला काळिमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. कुटुंबातील कथित पक्षपात आणि वडिलांनी मारलेल्या चापटीचा राग मनात धरून एका सुशिक्षित मेकॅनिकल इंजिनिअर मुलाने राहत्या घरात आपल्या सख्ख्या वडिलांची डोक्यात टिकाव (Crowbar) घालून निर्घृण हत्या केली आहे. श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा येथील अशोकनगर फाटा परिसरात ही थरारक घटना घडली.
नेमके काय घडले?
मृताचे नाव सचिन ढोकचौळे असे असून, त्यांचा मोठा मुलगा प्रणव ढोकचौळे (मॅकेनिकल इंजिनिअर) याने हा खून केला आहे. ढोकचौळे दाम्पत्य आपल्या मुलांसह नेवासे रस्त्यावरील अशोकनगर फाटा येथे राहतात. त्यांना दोन मुले असून मोठा मुलगा प्रणव हा इंजिनिअर आहे, तर लहान मुलगा संकेत हा छत्रपती संभाजीनगर येथे इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत आहे. प्रणव हा १५ दिवसांपूर्वीच गुजरात येथील आपली नोकरी सोडून गावी आला होता.
बुधवारी सकाळी सचिन ढोकचौळे हे हॉलमध्ये झोपलेले होते. त्यांचे सासरे अंगणात साफसफाई करत होते. दरम्यान, सचिन यांच्या पत्नी भारती ढोकचौळे या घरात आल्या असता त्यांना पती सचिन यांच्या डोक्यातून रक्ताच्या धारा वाहताना दिसल्या आणि बाजूलाच रक्ताने माखलेला टिकाव पडलेला दिसला. त्यांनी आरडाओरडा करून कुटुंबीयांना बोलावले, मात्र तोपर्यंत सचिन ढोकचौळे यांचा मृत्यू झाला होता.
"होय, मीच मारलं पप्पांना..."
घटनेनंतर अंगणात चकरा मारत असलेल्या आरोपी मुलगा प्रणव याला विचारले असता, त्याने अत्यंत थंड डोक्याने आपला गुन्हा कबूल केला. त्याने सांगितले की, "तुम्ही दोघेही (आई-वडील) लहानपणापासून लहान भाऊ संकेतलाच जास्त जीव लावता. तसेच काल रात्री पप्पांनी माझ्या डोक्यात चापट मारली होती. याचा राग माझ्या डोक्यात रात्रीपासून घोळत होता. म्हणून मी बाहेर पडलेला टिकाव त्यांच्या डोक्यात मारून त्यांना ठार केले." मुलाचे हे उत्तर ऐकून आईने घटनास्थळीच हंबरडा फोडला.
मुलगा मानसिक रुग्ण असण्याची शक्यता
या घटनेनंतर मृत सचिन यांच्या पत्नी भारती ढोकचौळे यांच्या फिर्यादीवरून श्रीरामपूर पोलिसांनी आरोपी मुलगा प्रणव ढोकचौळे याच्याविरुद्ध खुनाचा (Murder) गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, प्रणव हा नोकरीमध्ये वारंवार धरसोड करायचा आणि मानसिकदृष्ट्या काहीसा अस्वस्थ असायचा. इतक्या किरकोळ कारणावरून जन्मदात्या वडिलांची हत्या केल्याने तो मानसिक रुग्ण असावा असा पोलिसांना संशय असून, त्याची वैद्यकीय तपासणी केली जात आहे. या घटनेमुळे संपूर्ण श्रीरामपूर परिसर हादरून गेला आहे.
शहर
- मुंबई: आपण चोर असल्याचे सांगत भामट्याने विद्यार्थ्यांचे साहित्य लांबवले, भांडुपमधील घटना
- महाडमध्ये महिला डॉक्टरचा अमानुष छळ; १८ वर्षांत तब्बल १० वेळा सक्तीने गर्भपात केल्याप्रकरणी पतीवर गंभीर आरोप
- नारायणगावमध्ये कोट्यवधींची सायबर फसवणूक! फेक ट्रेडिंग ॲप्सद्वारे व्यापाऱ्याची १ कोटी ९३ लाखांची लूट, ५७ जणांवर गंभीर गुन्हे दाखल
- पुणे: ६ वर्षांनंतर अखेर न्याय मिळाला; पुण्याच्या बुधवार पेठेत २२ वर्षीय प्रेयसीच्या खून प्रकरणात नराधम प्रियकराला जन्मठेपेची शिक्षा
महाराष्ट्र
- मुंबई: आपण चोर असल्याचे सांगत भामट्याने विद्यार्थ्यांचे साहित्य लांबवले, भांडुपमधील घटना
- महाडमध्ये महिला डॉक्टरचा अमानुष छळ; १८ वर्षांत तब्बल १० वेळा सक्तीने गर्भपात केल्याप्रकरणी पतीवर गंभीर आरोप
- मुंबई:दिशा सालियन मृत्यू प्रकरण: संशय व्यक्त केला तरी पोलिसांनी एफआयआर का नोंदवला नाही? हायकोर्टाचे पोलिसांना खडे बोल
- नारायणगावमध्ये कोट्यवधींची सायबर फसवणूक! फेक ट्रेडिंग ॲप्सद्वारे व्यापाऱ्याची १ कोटी ९३ लाखांची लूट, ५७ जणांवर गंभीर गुन्हे दाखल
गुन्हा
- पुणे: ६ वर्षांनंतर अखेर न्याय मिळाला; पुण्याच्या बुधवार पेठेत २२ वर्षीय प्रेयसीच्या खून प्रकरणात नराधम प्रियकराला जन्मठेपेची शिक्षा
- चंद्रपूर: प्रेमाच्या लग्नानंतर अवघ्या तीन महिन्यांतच संपला तरुणीचा संसार; चंद्रपूरमधील दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ
- जालना: अंबड येथे सतर्क नागरिकांमुळे टळला अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न; पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू
- १५ हजारांच्या कर्मचाऱ्याला फ्लॅट आणि पैशांचे आमिष; महाराष्ट्र टीईटी पेपर लीक प्रकरणातील सर्वात मोठा खुलासा समोर
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य ३ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या आज कोणत्या राशींवर होणार शिवाची कृपा आणि कोणाला मिळणार ग्रहांची साथ
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक पराक्रम; ज्युडोमध्ये सुवर्णपदक जिंकणारी अस्मिता डे ठरली पहिली भारतीय खेळाडू!
- गोवा: बांबोळीतील 'फुलान्चो खुरीस'जवळ भीषण अपघात; वाहन पेट घेतल्याने एक जण ठार, तर दोघे जण गंभीर जखमी
- नवी दिल्ली: आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झाले आणखी सोपे; नवीन अॅपवरून घरबसल्या करा अर्ज
- जम्मू-काश्मीर: कुलगाममधील केल्लम भागात दहशतवादी हल्ला, छत्तीसगडच्या दोन मजुरांचा मृत्यू; 'लष्कर-ए-तैयबा'कडून कृत्याची कबुली
























Subscribe to my channel




