६ महिने उलटले तरी अल्पवयीन मुलगी बेपत्ता! आमदार रोहित पवार थेट पोलीस ठाण्यात; तपासाच्या गतीवर व्यक्त केली तीव्र नाराजी!

Minor Girl Missing For 6 Months: MLA Rohit Pawar Storms Sangvi Police Station Over Slow Investigation!६ महिने उलटूनही बेपत्ता अल्पवयीन मुलीचा शोध नाही; रोहित पवारांचा पोलिसांना जाब, न्याय न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा!

पिंपरी-चिंचवड: अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याप्रकरणी गेल्या सहा महिन्यांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या हताश आई-वडिलांच्या तक्रारीची दखल घेत, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी थेट सांगवी पोलीस स्टेशनला भेट दिली. यावेळी त्यांनी बेपत्ता मुलीच्या तपासाबाबत सविस्तर माहिती घेतली आणि पोलिसांच्या ढिसाळ कारभारावर व तपासाच्या गतीवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत पोलिसांना जाब विचारला.

नेमकं काय आहे प्रकरण? पीडित कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ डिसेंबर २०२५ रोजी त्यांची अल्पवयीन मुलगी अचानक बेपत्ता झाली होती. याप्रकरणी त्यांनी तात्काळ सांगवी पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता (मिसिंग) झाल्याची तक्रार नोंदवली होती. मात्र, या घटनेला सहा महिने उलटून गेले तरी पोलिसांना अद्याप मुलीचा कोणताही ठावठिकाणा लावता आलेला नाही. वारंवार पोलीस ठाण्याचे उंबरठे झिजवून आणि पाठपुरावा करूनही तपासात काहीच प्रगती होत नसल्याने पीडित पालकांमध्ये तीव्र अस्वस्थता आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

रोहित पवारांची थेट पोलीस ठाण्यात एन्ट्री आपल्या मुलीचा शोध लागण्यात पोलीस अपयशी ठरत असून आपल्याला न्याय मिळत नसल्याची भावना निर्माण झाल्यानंतर, संबंधित पीडित कुटुंबीयांनी आमदार रोहित पवार यांची भेट घेऊन त्यांच्याकडे मदतीची आर्त हाक मारली होती. कुटुंबियांचे दुःख पाहून रोहित पवार यांनी गुरुवारी दुपारी थेट सांगवी पोलीस ठाणे गाठले. तिथे त्यांनी सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन हिरे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी यांच्याशी या संवेदनशील प्रकरणावर चर्चा केली. तसेच या अल्पवयीन मुलीच्या बेपत्ता प्रकरणाचा तपास अधिक वेगाने आणि प्रभावीपणे करण्याची गरज असल्याचे पोलिसांना खडसावून सांगितले.

न्याय न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना रोहित पवार यांनी प्रशासनावर निशाणा साधला. "सहा महिने उलटूनही एका अल्पवयीन मुलीचा शोध लागत नाही, ही अत्यंत गंभीर आणि चिंताजनक बाब आहे. पोलिसांचा तपास योग्य दिशेने आणि जलद गतीने व्हायला हवा. जर पीडित कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळाला नाही, तर पुढील काळात आम्हाला पोलिसांविरोधात आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल," असा इशारा त्यांनी दिला.

तांत्रिक अडचणींमुळे तपास रेंगाळला: पोलीस या संदर्भात सांगवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी यांनी सांगितले की, तक्रार दाखल झाल्यापासून पोलीस या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत आहेत. संशयित मोबाईल क्रमांकाचा सीडीआर (CDR), परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच इतर तांत्रिक बाबींची तपासणी करण्यात आली आहे. मात्र, बेपत्ता असलेल्या मुलीचा मोबाईल फोन सातत्याने बंद येत असल्याने तपासात मोठ्या अडचणी येत आहेत. तपासाच्या सद्यस्थितीची सर्व माहिती आमदार रोहित पवार यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली असून त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले आहे, असेही पोलिसांनी स्पष्ट केले.



शहर

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *