कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्याचे अर्थकारण आणि राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या 'गोकुळ' दूध संघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेले काँग्रेसचे आमदार सतेज पाटील (बंटी) आणि भाजपचे खासदार धनंजय महाडिक (मुन्ना) यांच्यात आता थेट संघर्ष सुरू झाला आहे. गोकुळच्या सत्तासंघर्षात आमदार सतेज पाटील यांनी केलेल्या एका खळबळजनक वक्तव्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. सतेज पाटील यांनी थेट महाडिक काका-पुतण्यांवर (माजी आमदार महादेवराव महाडिक आणि खासदार धनंजय महाडिक/आमदार अमल महाडिक) निशाणा साधत "भावकीनं हे लक्षात ठेवावं," असा जाहीर इशारा दिला आहे.
वादाची नेमकी पार्श्वभूमी काय?
गोकुळ दूध संघात गेल्या ६ दशकांच्या इतिहासात पहिल्यांदाच ४२७ दूध संस्था अपात्र ठरल्याने आणि प्रशासक नियुक्तीची नामुष्की ओढवल्याने नवा वाद उभा राहिला आहे. या मुद्द्यावरून खासदार धनंजय महाडिक यांनी महाविकास आघाडी आणि आमदार सतेज पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. "आगामी गोकुळ निवडणुकीत सतेज पाटील यांचा २५-० ने पराभव करू," असा निर्धार महाडिक यांनी व्यक्त केला होता. महाडिक यांच्या या आव्हानाला उत्तर देताना सतेज पाटील यांनी महाडिक कुटुंबीयांवर सडकून टीका केली आहे.
सतेज पाटील यांचे महाडिक गटावर थेट वार
आमदार सतेज पाटील यांनी महाडिक यांच्या सत्तेच्या काळातील संदर्भ देत म्हटले की, जेव्हा गोकुळवर महादेवराव महाडिक यांची २५ ते ३० वर्षे सत्ता होती, तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्र्यांचा किंवा राज्याच्या नेतृत्वाचा गोकुळमध्ये कधीही राजकीय हस्तक्षेप नव्हता. मात्र आता सत्ताधाऱ्यांकडून यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे.
पाटील पुढे म्हणाले की, मंत्री हसन मुश्रीफ यांनी गोकुळवर प्रशासक येऊ नये म्हणून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे २२ वेळा विनंत्या केल्या, तरीही प्रशासक नियुक्त करण्यात आला. यावरून जिल्ह्यातील महायुतीचे नेतृत्व किती कमकुवत आहे, हे स्पष्ट होते. महायुतीमधील अंतर्गत कुरघोडी आणि विरोधकांच्या नेभळट वृत्तीमुळेच गोकुळवर ही वेळ आल्याचा आरोप त्यांनी केला.
'काका-पुतण्यां'ना इशारा
खासदार धनंजय महाडिक यांनी केलेल्या टीकेचा समाचार घेताना सतेज पाटील यांनी 'काका-पुतण्यांच्या' राजकारणावर तोफ डागली. "आपली सत्ता असताना काय परिस्थिती होती आणि आता काय सुरू आहे, हे भावकीनं (महाडिक कुटुंबीयांनी) नीट लक्षात ठेवावं. दबाव आणून किंवा संस्था अपात्र करून निवडणुका जिंकता येत नाहीत," असा इशारा त्यांनी दिला.
या पलटवारानंतर खासदार धनंजय महाडिक यांनीही सतेज पाटील यांना जुन्या आठवणींची जाणीव करून दिली. "मागील निवडणुकीत राज्यात पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना सतेज पाटील यांना सत्तेचा कसा अदृश्य हात मिळाला, हे सर्वांना माहीत आहे," असा प्रतिआरोप महाडिक यांनी केला.
या आरोप-प्रत्यारोपांमुळे गोकुळच्या निमित्ताने कोल्हापुरात 'बंटी विरुद्ध मुन्ना' असा हायव्होल्टेज राजकीय सामना पुन्हा एकदा पेटला असून आगामी काळात हा संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत.
सविस्तर वाचा, लिंक कमेंट मध्ये:https://punenews24.in/
शहर
- पुणे: अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीत डीजेवरील वादानंतर रक्तरंजित थरार; टोळक्याच्या बेदम मारहाणीत तरुण जागीच ठार, १० जण अटकेत
- पुणे: सदाशिव पेठेत पोलीस व्हॅनचा थरार! भरधाव गाडीने उडवल्या अनेक वाहने, सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल
- पुणे: पाण्याची चिंता मिटली! खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणे तुडुंब भरण्याच्या मार्गावर, पाणीसाठा ९६ टक्क्यांवर
- मुंबई: जुलैमध्ये पावसाचा दिलासा, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद, पण ऑगस्टमध्ये काय होणार? हवामान विभागाचा ताजा अंदाज
महाराष्ट्र
- राज्यातील ९० लाखांहून अधिक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे ४००० रुपये एकत्रित मिळणार का
- नागपुर: अवघ्या एकाच दिवसात तीन वेगवेगळ्या महिलांच्या अंगावरील लाखांचे सोन्याचे दागिने लांबवले
- वर्धा: एटीएम फोडून १२ लाखांची रोकड लांबवली; पुरावा नष्ट करण्यासाठी चोरांनी एटीएमलाच लावली आग
- पुणे: अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीत डीजेवरील वादानंतर रक्तरंजित थरार; टोळक्याच्या बेदम मारहाणीत तरुण जागीच ठार, १० जण अटकेत
गुन्हा
- अमरावती: बापट चौकात मध्यरात्री रक्ताचा थरार; तरुणाची निर्घृण हत्या, शहरात एकच खळबळ
- पुणे: सिंहगड रोड परिसरात खळबळ; किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या, परिसरात तीव्र संताप
- सांगली: बकरी विकण्याच्या आमिषाखाली ठाणे आणि सोलापूरमधील चार जणांची सायबर फसवणूक; सांगलीच्या सिमकार्डचा वापर
- ठाणे: उल्हासनगरमध्ये सायबर फसवणूक; लंडनच्या डॉक्टर मित्राकडून २५ हजार पाउंड्सचे आमिष दाखवून महिला डॉक्टरला २ लाखांना गंडा
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
- आजचे राशिभविष्य २९ जुलै २०२६: गणपती बाप्पाच्या कृपेने ‘या’ राशींना मिळणार नवीन नोकरी आणि आनंदाची बातमी
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक पराक्रम; ज्युडोमध्ये सुवर्णपदक जिंकणारी अस्मिता डे ठरली पहिली भारतीय खेळाडू!
- गोवा: बांबोळीतील 'फुलान्चो खुरीस'जवळ भीषण अपघात; वाहन पेट घेतल्याने एक जण ठार, तर दोघे जण गंभीर जखमी
- नवी दिल्ली: आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झाले आणखी सोपे; नवीन अॅपवरून घरबसल्या करा अर्ज
- जम्मू-काश्मीर: कुलगाममधील केल्लम भागात दहशतवादी हल्ला, छत्तीसगडच्या दोन मजुरांचा मृत्यू; 'लष्कर-ए-तैयबा'कडून कृत्याची कबुली




























Subscribe to my channel




