Prostitution Racket Busted in Daund: Police Raid 'Relax Inn' Lodge, 6 Women Rescued Including Two From Bangladesh!

दौंडमध्ये खळबळ! 'रिलॅक्स इन' लॉजमधील ८ खोल्यांमध्ये सुरू होतं काळं कांड; पोलिसांच्या छाप्यात दोन बांगलादेशी महिलांसह ६ जणींची सुटका!

 

Prostitution Racket Busted in Daund: Police Raid 'Relax Inn' Lodge, 6 Women Rescued Including Two From Bangladesh!  दौंड (पुणे): काही बांगलादेशी महिलांनी मुंबईमार्गे थेट दौंड शहर गाठून एका नामांकित लॉजमध्ये सुरू केलेल्या सेक्स रॅकेटचा (Prostitution Racket) पुणे ग्रामीण पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) पर्दाफाश केला आहे. दौंड-कुरकुंभ महामार्गावरील गोपाळवाडी गावच्या हद्दीत असलेल्या "रिलॅक्स इन" (Relax Inn) या लॉजवर पोलिसांनी शनिवारी सायंकाळी अचानक छापा टाकला. या धडक कारवाईत पोलिसांनी तब्बल ८ खोल्यांमध्ये सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश करत ६ पीडित महिलांची सुटका केली आहे.

बनावट ग्राहक पाठवून रचला चक्रव्यूह: या लॉजमध्ये मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वेश्याव्यवसाय सुरू असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी एक बनावट ग्राहक (Fake Customer) पाठवून या माहितीची खातरजमा केली. धंदा सुरू असल्याचे स्पष्ट होताच सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल गावडे व त्यांच्या विशेष पथकाने लॉजवर धाड टाकली. पोलिसांनी ८ वेगवेगळ्या खोल्यांमधून ६ महिलांना ताब्यात घेतले असून, प्राथमिक चौकशीत यातील दोन महिला थेट बांगलादेशातून बेकायदेशीरपणे भारतात आल्याचे समोर आल्याने पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

माजी नगरसेवकाच्या मालकीचे लॉज; गुन्हा दाखल: धक्कादायक बाब म्हणजे, ज्या लॉजवर हा छापा टाकण्यात आला ते दौंडमधील माजी नगरसेवक नंदू पवार यांच्या मालकीचे आहे, तर आरोपी मनोज पवार याने हे लॉज चालवण्यासाठी घेतले होते. पोलिसांनी या प्रकरणी लॉज व्यवस्थापकाविरुद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार (PITA Act) गुन्हा दाखल केला आहे. सुटका करण्यात आलेल्या सर्व महिलांना पुढील समुपदेशनासाठी आणि सुरक्षेसाठी पुणे येथील महिला सुधारगृहात पाठवण्यात आले आहे. ही आंतरराष्ट्रीय टोळी मुंबईमार्गे थेट दौंडपर्यंत कशी पोहोचली, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत.



शहर

महाराष्ट्र

राजकीय

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *