पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आईच्या हातच्या अन्नात‎ स्मृती, प्रेम अन् पावित्र्य

मुलांच्या भविष्यासाठी आपल्या आर्थिक क्षमतेपलीकडे जाऊन प्रयत्न‎करणे, ही आज भारतीय पालकांची जीवनशैली बनली आहे.‎दुसरीकडे सत्तेत बसलेले लोक आपल्या कृतींमधून मुलांच्या स्वप्नांवर‎आघात करताना दिसतात. सध्या परीक्षा पद्धती, शिक्षण आणि‎बेरोजगारीमुळे घराघरांत मुले त्रस्त आहेत. अशा वेळी पालकांनी एक‎प्रयोग करावा. मातांनी अन्न स्वतःच्या हाताने तयार करावे आणि‎मुलांना आईच्या हातचेच जेवण मिळावे. आजकाल आपल्या घरातील‎स्वयंपाकघर आईच्या हातातून निसटून इतरांच्या हातात गेले आहे.‎आईच्या हातच्या अन्नात अनुभव, स्मृती, प्रेम आणि पवित्रता‎उतरलेली असते. आईला स्वयंपाक करता येतो किंवा नाही, याने‎फारसे महत्त्वाचे नाही. पण तिचा स्पर्श अन्नाला झाला, तरी त्या‎अन्नाचा भाव बदलतो. भारतीय संस्कृतीत अन्नाला केवळ खाद्यपदार्थ‎मानले जात नाही, तर ते एक जिवंत अस्तित्व मानले जाते. आपल्या‎येथे प्रसाद, लंगर आणि भंडाऱ्यांद्वारे अन्नात प्राणप्रतिष्ठा केली जाते.‎मंदिरांमध्ये जितका मान मूर्तीला असतो. तितकाच तेथे अर्पण केलेल्या‎नैवेद्यालाही असतो. ‎‎

This post was originally published on this site.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *