‘सर, प्लीज सांगा ना की आम्ही आमच्या वेळेचे व्यवस्थापन कसे करावे?’ तरुणांनी मला हाच एक प्रश्न अनेकदा विचारला आहे. जेव्हा जेव्हा ते विचारतात, मी लगेच उत्तर देतो की ‘मनाचे व्यवस्थापन करण्यासाठी तुम्हाला योगासने करण्याची गरज आहे’ आणि माझे बोलणे पूर्ण होण्यापूर्वीच विद्यार्थी मधेच बोलतो, ‘सर, मी वेळेच्या व्यवस्थापनाबद्दल विचारले आहे.’ मी आत्मविश्वासाने उत्तर देतो- ‘मीसुद्धा हेच सांगत आहे की मनाचे व्यवस्थापन कसे करावे.’ तरुण चिडून म्हणेल, ‘सर टाइम, टाइम.’ मी उत्तर देईन, ‘तू माइंड म्हणालास का?’ तो पळत येईल आणि समोर उभा राहून ओरडेल- ‘सर, टाइम.’ यामुळे इतर लोक हसतील, कारण काहींना वाटेल की मला कमी ऐकू येते, तर बाकीचे समजून चुकतील की मी प्रँक करत आहे. त्यानंतर मी त्याला मंचावर बोलावतो आणि 1980 ची एक गोष्ट सांगतो, ज्यामध्ये इटालियन युनिव्हर्सिटीचा एक विद्यार्थी फ्रान्सिस्को सिरिलो परीक्षेच्या तारखांमुळे प्रचंड दबावाखाली होता आणि अभ्यासाचा त्याला खूप कंटाळा आला होता. त्याला जाणीव झाली की त्याचे मन लक्ष विचलित करण्यात पटाईत आहे. तो तासन््तास डेस्कवर बसायचा, पण हाती काहीच लागत नसे. हताश होऊन त्याने स्वतःशीच पैज लावली की तो फक्त 10 मिनिटे पूर्ण एकाग्रतेने आणि कोणत्याही अडथळ्याशिवाय अभ्यास करू शकतो का? त्याने स्वयंपाकघरात जाऊन टोमॅटोच्या आकाराचा आणि मोठा आवाज करणारा मेकॅनिकल किचन टायमर आणला, ज्याला इटालियन भाषेत ‘पोमोडोरो’ म्हणतात. त्याने टायमर फिरवून सेट केला आणि तो अभ्यासाला बसला. सुरुवातीच्या काही प्रयत्नांत तो अपयशी ठरला, कारण अंतर्गत विचारांचे विचलित होणे त्याला रोखत होते, परंतु तो वेळ बदलत राहिला. अखेर त्याला समजले की, 25 मिनिटांचा वेळ हा सर्वात योग्य ‘स्वीट स्पॉट’ आहे- जो कामात लक्षणीय प्रगती करण्यासाठी पुरेसा मोठा आणि मन विचलित होऊ नये यासाठी पुरेसा लहान आहे. एका वेळी फक्त 25 मिनिटांचा एक-एक ब्लॉक पूर्ण करत, सिरिलो एकाग्रतेच्या अपयशापासून थेट युनिव्हर्सिटीची परीक्षा उत्तीर्ण होण्यापर्यंत पोहोचला. शेवटी त्याने त्याच लहान किचन टायमरला जागतिक प्रॉडक्टिव्हिटी मुव्हमेंटमध्ये बदलले. आज सिरिलो यांनी विकसित केलेल्या ‘पोमोडोरो तंत्राचा’ वापर पाश्चात्त्य जगात असे अनेक लोक करतात, ज्यांनी कामाची टाळाटाळ करण्याची सवय सोडवण्यासाठी सर्व काही करून पाहिले, पण ते अपयशी ठरले, तर हे कसे करावे? याच्या 5 स्टेप्स येथे दिल्या आहेत: 1. एक काम निवडा : जे करायचे आहे, ते एक विशिष्ट काम निवडा.
2. टायमर सेट करा : 25 मिनिटांचा टायमर सेट करा.
3. काम करा : टायमर वाजेपर्यंत पूर्ण लक्ष त्याच कामावर केंद्रित करा. मल्टिटास्किंग करू नका आणि फोनही चेक करू नका.
4. लहान ब्रेक घ्या : टायमर वाजताच 5 मिनिटांचा ब्रेक घ्या. शरीर थोडे ताणा (स्ट्रेच करा) किंवा काहीतरी प्या.
5. मोठा ब्रेक घ्या : सलग 25 मिनिटांचे चार ‘पोमोडोरो’ पूर्ण केल्यानंतर 15-30 मिनिटांचा पुन्हा ताजेतवाने करणारा ब्रेक घ्या.
ही पद्धत यासाठी प्रभावी ठरते, कारण केवळ 25 मिनिटे काम करण्याचा संकल्प सोडणे हे तासन््तास चालणाऱ्या एखाद्या मोठ्या प्रोजेक्टपेक्षा खूपच कमी भीतीदायक वाटते. कडक टायमर व्यक्तीचे लक्ष वेगवेगळ्या गोष्टींमध्ये विचलित करण्याऐवजी सिंगल टास्किंग विचारसरणीला प्रोत्साहन देतो. तरुणांना याचा हा फायदा मिळतो की लहान आणि नियमित अंतर मनाला आवश्यक विश्रांती देतात, ज्यामुळे माहितीवर प्रक्रिया करणे सोपे होते आणि दिवसभर कार्यक्षमता उच्च राहते. यासाठी कोणत्याही विशेष टायमर मशीनमध्ये पैसे खर्च करण्याची गरज नाही. जुने साधे घड्याळही उपयुक्त ठरू शकते, परंतु कृपया मोबाइल फोन वापरू नका. जर तुम्ही सखोल अभ्यास किंवा क्लिष्ट समस्या सोडवण्यासारख्या अत्यंत बौद्धिक मेहनतीच्या विषयावर काम करत असाल, तर तुम्ही हे तंत्र तुमच्या ऊर्जेनुसार बदलू शकता. फंडा असा आहे की, कमीत कमी त्या लोकांसाठी ज्यांना कामाची टाळाटाळ करण्याची खूप सवय आहे, 5 मिनिटांचा ब्रेक घेत कामाला 25 मिनिटांच्या एकाग्र भागांमध्ये विभागणे केवळ थकव्यापासून वाचवणार नाही, तर एकाग्रतादेखील जास्तीत जास्त वाढवेल.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: पत्नीच्या सततच्या त्रासाला कंटाळून ३५ वर्षीय तरुणाची आत्महत्या; लोहगाव पोलीस ठाण्यात पत्नीविरोधात गुन्हा दाखल
- नवी मुंबई: सीबीडी बेलापूरच्या पारसिक हिलवरून थेट रेल्वे रुळावर कोसळली कार; १७ वर्षीय विद्यार्थी थोडक्यात बचावला, लोकल सेवा विस्कळीत
- पुणे: मंचर-कलंब परिसरात शेतातील कृषी पंप सुरू करताना विजेचा धक्का लागून महिलेचा जागीच मृत्यू
- पुणे: आंबेगाव तालुक्यातील मंचरमध्ये पहाटेच्या सुमारास खिडकी तोडून घरात घुसले तीन चोरटे; बेडरूममधून सोन्याचे मंगळसूत्र आणि ऐवज लांबवला, संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद
महाराष्ट्र
- पुणे: पत्नीच्या सततच्या त्रासाला कंटाळून ३५ वर्षीय तरुणाची आत्महत्या; लोहगाव पोलीस ठाण्यात पत्नीविरोधात गुन्हा दाखल
- नवी मुंबई: सीबीडी बेलापूरच्या पारसिक हिलवरून थेट रेल्वे रुळावर कोसळली कार; १७ वर्षीय विद्यार्थी थोडक्यात बचावला, लोकल सेवा विस्कळीत
- पुणे: मंचर-कलंब परिसरात शेतातील कृषी पंप सुरू करताना विजेचा धक्का लागून महिलेचा जागीच मृत्यू
- पुणे: आंबेगाव तालुक्यातील मंचरमध्ये पहाटेच्या सुमारास खिडकी तोडून घरात घुसले तीन चोरटे; बेडरूममधून सोन्याचे मंगळसूत्र आणि ऐवज लांबवला, संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद
गुन्हा
- पुणे: आंबेगाव तालुक्यातील मंचरमध्ये पहाटेच्या सुमारास खिडकी तोडून घरात घुसले तीन चोरटे; बेडरूममधून सोन्याचे मंगळसूत्र आणि ऐवज लांबवला, संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद
- पुणे: लॉजमध्ये प्रियकरासोबत वाद; तरुण रागाने निघून गेला अन् तरुणीने संपवलं आयुष्य, हडपसरमधील घटना
- पुणे: जावयाचा आई-वडिलांना कॉल अन् काही क्षणांतच पुण्यात नामांकित आयटी कंपनीतील वैष्णवीचा धक्कादायक मृत्यू; हुंड्यासाठी छळाचा गंभीर आरोप
- पुणे : ज्येष्ठ डॉक्टरांच्या घरात घुसून मारहाण अन् खंडणी, 'बिग बॉस' फेम दिव्या शिंदेवर पुण्यात गुन्हा दाखल!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

१०७ वर्षे जुन्या गणेशोत्सव मंडळात १६ फूट बाप्पांवर पहिल्यांदाच 3D मॅपिंग!
कारखेल खुर्दच्या गणपती विसर्जनात चिमुकल्यांनी साकारले महापुरुष-संत! 🙏✨
वर्दीची दुसरी बाजू! पोलिसांनी गणेश मंडळाच्या गाड्याला रेटण्यासाठी केली मदत!
देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!























Subscribe to my channel




