मुंबई पश्चिम बंगालमधील निवडणूक निकाल आणि देशातील सध्याच्या राजकीय घडामोडींवर शिवसेना (उबाठा) नेते संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर प्रखर टीका केली आहे. "ममता बॅनर्जींचा पराभव झालेला नाही, तर सैन्य आणि आर्थिक दहशतवादाचा वापर करून त्यांना सत्तेपासून रोखण्यात आले आहे," असा खळबळजनक दावा राऊत यांनी केला. यावेळी त्यांनी नितीश कुमार यांच्यावरही बोचऱ्या शब्दांत निशाणा साधला.
हुकूमशाहीविरोधात 'इंडिया' आघाडी ठाम
संजय राऊत यांनी ममता बॅनर्जी यांना खंबीर पाठिंबा जाहीर केला आहे. "ममता बॅनर्जी यांनी राजीनामा न देण्याचा घेतलेला निर्णय हा सरकारविरोधी आंदोलनाचाच एक भाग आहे. उद्धव ठाकरेंसह 'इंडिया' आघाडीचे सर्व प्रमुख नेते त्यांच्या पाठीशी उभे आहेत. जर निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षाचा गुलाम होणार असेल, तर विरोधी पक्षांनी निवडणुकीबाबत काय भूमिका घ्यावी, याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे," असे राऊत यांनी नमूद केले.
नितीश कुमारांचे 'मानसिक संतुलन' बिघडले?
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर टीका करताना राऊत यांची जीभ घसरली. "नितीश कुमार पहिल्यापासूनच भरकटलेले आहेत, ते कधीच कुठे स्थिर नव्हते. त्यांचे मानसिक संतुलन किती बिघडले आहे, हे संपूर्ण देश पाहत आहे. ते आघाडी सोडून जाणार आहेत, हे ममता बॅनर्जी यांनी पहिल्याच बैठकीत स्पष्ट केले होते," असा टोला त्यांनी लगावला. जर ममतांनी बंगालमध्ये काँग्रेसला सोबत घेतले असते, तर निकाल आज वेगळा असता, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
लाडकी बहीण योजनेवर ताशेरे
राज्यातील 'लाडकी बहीण' योजनेवरूनही राऊत यांनी सरकारला धारेवर धरले. "या योजनेचे पैसे जर चुकीच्या मार्गाने कोणाच्या खिशात जात असतील, तर तो मोठा गुन्हा आहे. सरकारला या भ्रष्टाचाराची जाणीव असेल, तर त्यांनी तातडीने दोषींवर कठोर कारवाई केली पाहिजे," अशी मागणी त्यांनी केली.
मराठी भाषेचा सन्मान सर्वोच्च
हिंदी आणि इंग्रजी भाषेबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना राऊत म्हणाले की, "आमचा हिंदीला विरोध नाही, राष्ट्रीय स्तरावर कामासाठी ती गरजेची आहे. मात्र, महाराष्ट्राची पहिली भाषा ही मराठीच आहे आणि तिचा सन्मान राखलाच गेला पाहिजे." सत्तेतील काही लोकांना लोकशाहीचे पतन मान्य नाही, त्यांनी हुकूमशाहीविरोधात एकत्र यावे, असे आवाहनही त्यांनी सत्ताधारी पक्षातील नेत्यांना केले.
शहर
- पुणे: बेल्हे येथे ५०० मेट्रिक टन क्षमतेच्या आधुनिक धान्य गोदामाचे उद्घाटन; शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा
- अमरावती: जीर्ण वीज खांब कोसळल्याने शेतकरी दाम्पत्य व दोन बैलांचा दुर्दैवी मृत्यू
- नागपूर: महिलेच्या घरात बेकायदा प्रवेश प्रकरणी पोलिसांना उच्च न्यायालयाचा दणका; नुकसानभरपाई देण्याचे आदेश
- पुणे: 'ज्ञानोबा-तुकाराम'च्या गजरात ओतूरहून श्री बाबाजी चैतन्य महाराज पालखीचे पंढरपूरकडे उत्साहात प्रस्थान.
महाराष्ट्र
- अमरावती: जीर्ण वीज खांब कोसळल्याने शेतकरी दाम्पत्य व दोन बैलांचा दुर्दैवी मृत्यू
- नागपूर: महिलेच्या घरात बेकायदा प्रवेश प्रकरणी पोलिसांना उच्च न्यायालयाचा दणका; नुकसानभरपाई देण्याचे आदेश
- पुणे: 'ज्ञानोबा-तुकाराम'च्या गजरात ओतूरहून श्री बाबाजी चैतन्य महाराज पालखीचे पंढरपूरकडे उत्साहात प्रस्थान.
- मुंबई: पनवेलमध्ये गाडेश्वर धरणात पोहताना एका युवकाचा बुडून मृत्यू; एक जण बेपत्ता!
गुन्हा
- पुणे: शिक्रापूरमध्ये माजी महिला सरपंचाच्या गळ्यातील सोन्याचे गंठण चोरट्यांनी हिसकावले
- उत्तर प्रदेश: कौटुंबिक वादातून पत्नीने पतीला जिवंत जाळले; पोलीस तपासात धक्कादायक कबुली!
- थरारक! कर्जात बुडालेल्या कॉलेज विद्यार्थ्याने लुटून विहिरीत ढकलले; दोरीला धरून ५५ वर्षीय महिलेचा विहिरीत २१ तासांचा मृत्यूशी संघर्ष! अखेर चमत्कारीक बचाव
- सरपंचपदासाठी काय पण! मराठा असूनही मिळवले 'पारधी' जातीचे बोगस प्रमाणपत्र; बीड जिल्हा जात पडताळणी समितीने दाखला ठरवला रद्द!
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- मराठवाड्यात जुलैच्या सुरुवातीलाही पावसाची ओढ! पहिल्या आठवड्यात केवळ २३.२ मिमी पाऊस; धरणे कोरडी, पेरण्या रखडल्याने बळीराजा हवालदिल!
- धाराशिवच्या जमिनीचा पोत खालावला! मृद आरोग्य पत्रिकेच्या अहवालात 'नत्र' कमतरतेची गंभीर नोंद; खरिपासाठी सेंद्रिय खतांचा वापर वाढवण्याचे आवाहन.
- शनीच्या दृष्टीचा राशींवर होणार परिणाम, जाणून घ्या ४ जुलै २०२६ चा दिवस कसा असेल!
- ३ जुलै २०२६ आजचे राशीभविष्य: संकष्टीच्या शुभ मुहूर्तावर या ४ राशींवर होणार बाप्पाची विशेष कृपा!
मनोरंजन
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- फिफा विश्वचषक २०२६ मध्ये थरार! बेलिंगहॅम चमकला, १० खेळाडूंसह खेळणाऱ्या इंग्लंडने मेक्सिकोला नमवून गाठली उपांत्यपूर्व फेरी
- पाशवी कृत्य! दारुड्या पतीने पत्नीला जिवंत जाळले, अपघाताचा बनाव रचला; फतेहपूर पोलिसांच्या तपासात अखेर सत्य उघड!
- बाप रे, भामट्यांचा नवा कारनामा! चालती ई-रिक्षा ब्लूटूथने बंद करून थेट पैशांची मागणी; सायबर गुंडांचा नवा हायटेक स्कॅम उघड!
- इराणमध्ये युद्धाच्या छायेत सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांच्या अंत्यसंस्काराला सुरुवात! तेहरानमध्ये लाखो जनसमुदाय रस्त्यावर, डोनाल्ड ट्रम्प विरोधात संतापाचा उद्रेक!

























Subscribe to my channel



