मुरबाड | ठाणे जिल्ह्यातील काळू धरण प्रकल्पासाठी राज्य सरकारने साडेचारशे कोटींचा निधी मंजूर केला असला तरी, या प्रकल्पावरून आता नव्या संघर्षाची ठिणगी पडली आहे. "स्थानिक भूमिपुत्रांना उद्ध्वस्त करून, त्यांची गावे बुडवून बाहेरून आलेल्या लोंढ्यांची तहान भागवण्यासाठी हा प्रकल्प रेटला जात असेल, तर तो कदापि सहन करणार नाही," अशा तीव्र शब्दांत शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी सरकारला फटकारले आहे.
छोटे बंधारे बांधा, गावे वाचवा!
मुरबाड तालुक्यातील १९ गावे या धरणामुळे पाण्याखाली जाणार आहेत. यावर भाष्य करताना राजू शेट्टी म्हणाले की, "शहरांना पाणी देण्यास आमचा विरोध नाही. मात्र, १४ टीएमसीचे अजस्त्र धरण बांधून गावे बेघर करण्याऐवजी छोटे बंधारे बांधा. त्यातून स्थानिक शेती आणि पिण्यासाठी थोडे पाणी द्या, बाकी सर्व पाणी खुशाल ठाणे-कल्याणला न्या. पण स्थानिक भूमिपुत्रांची राखरांगोळी करून पाणी देणार असाल, तर गावकऱ्यांमध्ये असलेला तीव्र असंतोष लवकरच रस्त्यावर येईल."
पुनर्वसनाच्या नावाखाली स्थानिक नेत्यांचा धंदा
या प्रकल्पामागे मोठ्या भ्रष्टाचाराचा संशय व्यक्त करताना शेट्टी यांनी स्थानिक नेत्यांवरही निशाणा साधला. "केवळ पुनर्वसन करायचे या नावाखाली मुरबाडमधील काही नेत्यांनी जमिनी कवडीमोल भावात विकत घेतल्या आहेत. आता याच जमिनी सरकारला चढ्या भावाने विकून अमाप पैसा मिळवण्याचा धंदा सुरू आहे. धरण पूर्ण झाल्यावरही ज्या १९ गावांतील जमिनी गेल्या, त्यांना पिण्यासाठी एक थेंब पाणीही मिळणार नाही. धरण उशाला आणि कोरड घशाला, अशी अवस्था जर शेतकऱ्यांची होणार असेल तर भूमिपुत्रांनी काय भीक मागायची का?" असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.
जमिनींच्या व्यवहारावर श्वेतपत्रिका काढा!
काळू धरणाचे नोटिफिकेशन निघाल्यानंतरही जमिनींची खरेदी-विक्री झालीच कशी? असा प्रश्न विचारत राजू शेट्टी यांनी या व्यवहारांवर श्वेतपत्रिका काढण्याची मागणी केली आहे. "जमिनी खरेदी करणारे नेमके कोण आहेत आणि त्यांना परवानगी कोणी दिली, याचे सत्य बाहेर आले पाहिजे. हा सर्व प्रकार केवळ पैसा कमावण्याचा धंदा असून शेतकऱ्यांच्या व्यथांकडे सरकारचे साफ दुर्लक्ष आहे," असा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला.
शहर
- मुंबई: धोकादायक चाळ रिकामी करतानाच मृत्यूचा सापळा, मानखुर्द दुर्घटनेत ८ जणांचा दुर्दैवी मृत्यू
- पुणे: चिंचवडमध्ये विक्रमी २०६ मिमी पाऊस; पवना धरणातील पाणीसाठा ४० टक्क्यांवर!
- सोलापूर: कुर्नूर धरणात फक्त २५% पाणीसाठा! अक्कलकोटच्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाची धडपड
- कोल्हापूर: इचलकरंजीत अल्पवयीन मुलीवरील सामूहिक लैंगिक अत्याचार प्रकरणाने खळबळ; व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल, तिघांना अटक
महाराष्ट्र
- मुंबई: धोकादायक चाळ रिकामी करतानाच मृत्यूचा सापळा, मानखुर्द दुर्घटनेत ८ जणांचा दुर्दैवी मृत्यू
- पुणे: चिंचवडमध्ये विक्रमी २०६ मिमी पाऊस; पवना धरणातील पाणीसाठा ४० टक्क्यांवर!
- सोलापूर: कुर्नूर धरणात फक्त २५% पाणीसाठा! अक्कलकोटच्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाची धडपड
- कोल्हापूर: इचलकरंजीत अल्पवयीन मुलीवरील सामूहिक लैंगिक अत्याचार प्रकरणाने खळबळ; व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल, तिघांना अटक
गुन्हा
- थरारक! कर्जात बुडालेल्या कॉलेज विद्यार्थ्याने लुटून विहिरीत ढकलले; दोरीला धरून ५५ वर्षीय महिलेचा विहिरीत २१ तासांचा मृत्यूशी संघर्ष! अखेर चमत्कारीक बचाव
- सरपंचपदासाठी काय पण! मराठा असूनही मिळवले 'पारधी' जातीचे बोगस प्रमाणपत्र; बीड जिल्हा जात पडताळणी समितीने दाखला ठरवला रद्द!
- भ्रष्टाचाराचा कुबेर! देवळाली कॅन्टोन्मेंटचे माजी सीईओ अजय कुमार यांच्यावर सीबीआयचा गुन्हा; १० वर्षांत ५२ हजारांची संपत्ती झाली थेट पाऊणेसहा कोटी!
- "जे लग्न कधी होणारच नाहीये, त्यासाठी आधार कशाला?" केतन अगरवाल हत्या प्रकरणात आरोपी सियाचे खळबळजनक व्हॉट्सॲप चॅट व्हायरल!
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- मराठवाड्यात जुलैच्या सुरुवातीलाही पावसाची ओढ! पहिल्या आठवड्यात केवळ २३.२ मिमी पाऊस; धरणे कोरडी, पेरण्या रखडल्याने बळीराजा हवालदिल!
- धाराशिवच्या जमिनीचा पोत खालावला! मृद आरोग्य पत्रिकेच्या अहवालात 'नत्र' कमतरतेची गंभीर नोंद; खरिपासाठी सेंद्रिय खतांचा वापर वाढवण्याचे आवाहन.
- शनीच्या दृष्टीचा राशींवर होणार परिणाम, जाणून घ्या ४ जुलै २०२६ चा दिवस कसा असेल!
- ३ जुलै २०२६ आजचे राशीभविष्य: संकष्टीच्या शुभ मुहूर्तावर या ४ राशींवर होणार बाप्पाची विशेष कृपा!
मनोरंजन
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- फिफा विश्वचषक २०२६ मध्ये थरार! बेलिंगहॅम चमकला, १० खेळाडूंसह खेळणाऱ्या इंग्लंडने मेक्सिकोला नमवून गाठली उपांत्यपूर्व फेरी
- पाशवी कृत्य! दारुड्या पतीने पत्नीला जिवंत जाळले, अपघाताचा बनाव रचला; फतेहपूर पोलिसांच्या तपासात अखेर सत्य उघड!
- बाप रे, भामट्यांचा नवा कारनामा! चालती ई-रिक्षा ब्लूटूथने बंद करून थेट पैशांची मागणी; सायबर गुंडांचा नवा हायटेक स्कॅम उघड!
- इराणमध्ये युद्धाच्या छायेत सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांच्या अंत्यसंस्काराला सुरुवात! तेहरानमध्ये लाखो जनसमुदाय रस्त्यावर, डोनाल्ड ट्रम्प विरोधात संतापाचा उद्रेक!

























Subscribe to my channel



