
नवी मुंबई:
नवी मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त कैलास गायकवाड यांना लाच घेताना रंगेहात पकडल्यानंतर आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) आपला मोर्चा पालिकेच्या इतर अधिकाऱ्यांकडे वळवला आहे. अतिक्रमण विभागासह विविध विभागांतील तब्बल १३ अधिकाऱ्यांची आता चौकशी होणार असून, 'एसीबी'ने तसे पत्र पालिका आयुक्त कैलास शिंदे यांना धाडले आहे.
काय आहे प्रकरण?
अतिक्रमणविरोधी कारवाईच्या ठेक्याचे बिल मंजूर करण्यासाठी दोन टक्के लाच (बक्षीस) स्वीकारल्याच्या आरोपावरून मंगळवारी कैलास गायकवाड यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. या कारवाई दरम्यान झालेल्या संभाषणाच्या रेकॉर्डिंगमध्ये अतिक्रमण विभागातील इतर व्यवहारांचे आणि संशयास्पद हालचालींचे पुरावे समोर आले आहेत. यामुळे संपूर्ण अतिक्रमण विभागच आता संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
चौकशीच्या फेऱ्यात असलेले अधिकारी:
एसीबीने खालील अधिकाऱ्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत:
१. रोहित ठाकरे, २. सचिन भगत, ३. प्रशांत नेरकर, ४. सुखदेव एडवे, ५. वसंत मुंडावरे, ६. प्रबोधन मवाडे, ७. चंद्रकांत धोत्रे, ८. संजय सोनटक्के, ९. आत्माराम काळे, १०. महेश होलगीर, ११. सागर मोरे, १२. भरत धांडे, १३. अनुराधा बाबर आणि साधना पाटील.
राजकीय वळण आणि संशय:
या प्रकरणानंतर भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. "गायकवाड हे नेमके कोणाचे 'कलेक्टर' होते?" असा सवाल करत त्यांनी या भ्रष्टाचारात राजकीय हस्तक्षेपाचा संशय व्यक्त केला आहे. घणसोली आणि इतर विभागांत दीर्घकाळ ठाण मांडून बसलेल्या काही अभियंत्यांवरही संशयाची सुई वळली आहे.
सद्यस्थिती:
कैलास गायकवाड यांना शुक्रवारी न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या बड्या अधिकाऱ्याच्या अटकेनंतर संपूर्ण यंत्रणेचीच चौकशी लावण्यात आल्याने पालिका वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. या चौकशीतून भ्रष्टाचाराची आणखी किती मोठी मुळे समोर येतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शहर
- मुंबई: लोकलमध्ये दरवाजा बंद करण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या!
- मुंबई: मुसळधार पावसासाठी २ जुलैपर्यंत वाट पाहावी लागणार? हवामान विभागाचा अंदाज. मान्सून महाराष्ट्रात दाखल, पण दमदार पावसासाठी अजून काही दिवस प्रतीक्षा!
- मुंबई: मीरा रोडवर विचित्र अपघात: पार्क केलेल्या कारमधील एअरबॅग अचानक उघडल्याने २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू!
- बदलापूर: अनैतिक संबंधावरून पत्नीची निर्घृण हत्या; नवऱ्याचा 'हार्ट अटॅक'चा बनाव पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये उघड!
महाराष्ट्र
- मुंबई: लोकलमध्ये दरवाजा बंद करण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या!
- मुंबई: मुसळधार पावसासाठी २ जुलैपर्यंत वाट पाहावी लागणार? हवामान विभागाचा अंदाज. मान्सून महाराष्ट्रात दाखल, पण दमदार पावसासाठी अजून काही दिवस प्रतीक्षा!
- मुंबई: मीरा रोडवर विचित्र अपघात: पार्क केलेल्या कारमधील एअरबॅग अचानक उघडल्याने २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू!
- बुलढाणा: 'क्रांतीज्योती' योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी लाच मागणारा अधिकारी एसीबीच्या जाळ्यात!
गुन्हा
- बुलढाणा: 'क्रांतीज्योती' योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी लाच मागणारा अधिकारी एसीबीच्या जाळ्यात!
- बदलापूर: अनैतिक संबंधावरून पत्नीची निर्घृण हत्या; नवऱ्याचा 'हार्ट अटॅक'चा बनाव पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये उघड!
- प्लाझ्मा विक्रीचा काळा बाजार? ठराविक फार्मा कंपन्यांना चढ्या दराने प्लाझ्मा विक्रीची तक्रार; अन्न व औषध प्रशासनाकडे चौकशीची मागणी.
- पुणे: लोहगड हत्या प्रकरण: चेतन-केतन प्रकरणात नीरज कुमारची एन्ट्री; सिया गोयलशी काय कनेक्शन?
राजकीय
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
- 'ऑपरेशन टायगर'ची इनसाईड स्टोरी! एकनाथ शिंदेंनी कसा घडवून आणला उद्धव ठाकरेंच्या खासदारांमध्ये ऐतिहासिक भूकंप?
इतर
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
- आजचे राशिभविष्य (२१ जून २०२६): या राशींवर बरसणार नशिबाची कृपा; करिअर आणि नोकरीत मिळणार मोठे यश!
- आजचे राशीभविष्य २० जून २०२६: शनिदेव आणि हनुमानजींची कृपादृष्टी; या राशींचे नशीब फळफळणार!
- औषधांशिवाय रक्तातील साखर कमी करायचीये? दररोज १५ मिनिटं करा हे काम; तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
देश विदेश
- एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाचा नियम: पीएनजी कनेक्शन घेतल्यास ३० दिवसांच्या आत एलपीजी कनेक्शन सरेंडर करणे अनिवार्य!
- विराट कोहलीच्या 'One8' शूजची जबरदस्त क्रेझ! २४ तासांत दीड लाख जोड्यांची विक्री; जाणून घ्या किंमत.
- औषधांची विश्वासार्हता तपासणे होणार सोपे! आता सर्व लसी आणि कर्करोगाच्या औषधांवर 'QR कोड' अनिवार्य; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
- अध्यात्मिक पर्यटनाची मोठी झेप! अयोध्या, काशी ते मथुरा-वृंदावन; 'या' धार्मिक शहरांमुळे उत्तर प्रदेश देशात अव्वल























Subscribe to my channel




