
Mumbai : अजित पवार यांनी नेतृत्व केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अनुभवी मंत्री आणि दिग्गज नेते असतानाही महाराष्ट्रातील राजकारणाचा प्रत्यक्ष अनुभव नसलेल्या, प्रशासन हाताळण्याचा वकुब नसलेल्या राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांचेच नाव उपमुख्यमंत्रिपदासाठी चर्चेत का आहे, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. याचं कारण बहुसंख्य आमदारांनी पक्षाची दोरी कुटुंबातील व्यक्तीकडेच राहावी, अशी मागणी केली आहे. पार्थ पवार अननुभवी असल्याचे तूर्तास सुनेत्रा वहिनींकडेच पक्षाची आणि उपमुख्यमंत्रिपदाची धुरा जाण्याचे संकेत आहेत.
‘आमचे पंचप्राण आणि राजकीय भविष्य असलेले अजितदादा आज आपल्यात नाहीत, हे अजूनही स्वीकारणे कठीण आहे. या पोरक्या झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला सावरण्याची ताकद सुनेत्रा पवारांकडेच आहे, त्यामुळे सुनेत्रा पवार यांनीच राष्ट्रवादीचे नेतृत्व करावे, अशी भूमिका नाशिकमधील राष्ट्रवादीच्या आमदारांनी घेतली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाच्या नेतृत्वाबाबत सुरू असलेल्या चर्चांमध्ये सुनेत्रा पवार यांनीच पुढाकार घ्यावा, अशी भूमिका माजी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटेंसह आमदारांनी मांडली आहे.
|
|
राज्यात सर्वाधिक सात आमदार नाशिक जिल्ह्यातून निवडून आले आहेत. त्यामुळे अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर नाशिकचे आमदार काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागून होते. शुक्रवारी (दि. ३०) सायंकाळी सिन्नर नगरपालिकेच्या सभागृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत कोकाटेंसह अन्य आमदारांची भूमिका स्पष्ट केली. यावेळी नाशिकरोड-देवळालीच्या आमदार सरोज अहिरे, इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर, कळवणचे आमदार नितीन पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विष्णूपंत म्हैसधुणे उपस्थित होते.
कुटुंबातील व्यक्तीनेच पक्षाची धुरा सांभाळावी
कोकाटे म्हणाले, ‘दादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही कोणतीही अपेक्षा न ठेवता त्यांच्यासोबत उभे राहिलो. आज दादा नसले तरी त्यांचे विचार आणि कार्यपद्धती पुढे नेण्यासाठी त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीनेच पक्षाची धुरा सांभाळावी. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्र्यांशी दादांची झालेली चर्चा सुनेत्रा वहिनींना माहिती असण्याची शक्यता आहे. त्यामुळे सत्तेतील वाटा आणि पक्षाचे नेतृत्त्व त्यांच्या हाती असावे,’ असेही ते म्हणाले.
सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल्यास राज्यसभेवर कोणाला पाठवायचे, याचा संपूर्ण निर्णयाधिकार सुनेत्रा पवार यांच्याकडेच असावा आणि आम्ही सर्व आमदार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू, अशी ग्वाही कोकाटे यांनी दिली. पत्रकार परिषदेदरम्यान उपस्थित आमदारांना भावना अनावर झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
४१ आमदारांचा पाठिंबा
अजित पवारांकडे असलेली महत्त्वाची मंत्रिपदे, राष्ट्रीय अध्यक्षपद तसेच गटनेतेपदाची जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्याकडेच सोपवावी, असा ठराव करण्यात येणार असल्याचे कोकाटे यांनी स्पष्ट केले. सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वावर पक्षातील सर्व ४१ आमदारांचा विश्वास आहे, या संदर्भात मंत्री नरहरी झिरवाळ, दत्ता भरणे, आमदार दिलीप बनकर, किरण लहामटे, आशुतोष काळे, संग्राम जगताप यांच्यासह बहुतेक आमदारांशी चर्चा झाल्याचेही कोकाटे यांनी सांगितले.
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे वय पाहता एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही, अशी भूमिका मंत्री नरहरी झिरवाळ यांनी मांडली आहे. गेल्या काही दिवसांपासून अजितदादा आणि शरद पवार यांच्यात बैठकाही होत होत्या. तर, अध्यक्ष म्हणून सुनील तटकरे निर्णय घेतील, पण दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर देशपातळीवर अजित पवार यांच्या जागेवर सुप्रिया सुळे असतील किंवा प्रफुल पटेल असतील. कारण देशात ज्यांनी काम केले आहे, त्यांनाच पुढे केले जाईल, असेदेखील झिरवाळ यांनी सांगितले. तर, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा निर्णय पवार कुटुंबच घेईल, असे कोकाटे यांनी म्हटले आहे.
शहर
- अमरावती: रिद्धपूर येथे स्कूल बसमधून उतरताना पडून ७ वर्षांच्या चिमुकलीचा जागीच मृत्यू.
- पुणे: भोरमध्ये संतापजनक घटना; दारू पिण्यास विरोध करणाऱ्या पोटच्या आईलाच दारुड्या मुलाने लोखंडी रॉडने ठेचून संपवले, मृतदेह घरात ठेवून पळाला.
- दिल्ली: ४२ वर्षीय महिला वकिलाचा हैदरपूर उड्डाणपुलावरून पडून मृत्यू; पतीने ढकलून दिल्याची कुटुंबीयांची तक्रार, पतीवर गुन्हा दाखल.
- सातारा: जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला; कोयना धरणाचे विसर्ग कमी, धरणाचे वक्र दरवाजे दोन फुटांवर खाली आणले.
महाराष्ट्र
- अमरावती: रिद्धपूर येथे स्कूल बसमधून उतरताना पडून ७ वर्षांच्या चिमुकलीचा जागीच मृत्यू.
- पुणे: भोरमध्ये संतापजनक घटना; दारू पिण्यास विरोध करणाऱ्या पोटच्या आईलाच दारुड्या मुलाने लोखंडी रॉडने ठेचून संपवले, मृतदेह घरात ठेवून पळाला.
- कोल्हापुर: कबनुरात रील बनवताना तरुणाच्या डोक्यात घुसली गोळी; दुचाकीवरून पडल्याचा बनाव सिटी स्कॅनने उघडकीस.
- रत्नागिरी: मूल होण्यासाठी औषध व विधीचे आमिष दाखवून सव्वा लाखांचे दागिने लंपास.
गुन्हा
- पुणे: भोरमध्ये संतापजनक घटना; दारू पिण्यास विरोध करणाऱ्या पोटच्या आईलाच दारुड्या मुलाने लोखंडी रॉडने ठेचून संपवले, मृतदेह घरात ठेवून पळाला.
- दिल्ली: ४२ वर्षीय महिला वकिलाचा हैदरपूर उड्डाणपुलावरून पडून मृत्यू; पतीने ढकलून दिल्याची कुटुंबीयांची तक्रार, पतीवर गुन्हा दाखल.
- कोल्हापुर: कबनुरात रील बनवताना तरुणाच्या डोक्यात घुसली गोळी; दुचाकीवरून पडल्याचा बनाव सिटी स्कॅनने उघडकीस.
- मुंबई: सायबर भामट्यांचा प्रताप! कंपनीच्या संचालकांच्या नावाने बनावट व्हॉट्सॲप डीपी आणि टीम्स ग्रुप तयार करून तब्बल ४.२८ कोटींचा गंडा.
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- अंक भविष्य ४ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या मूलांक १ ते ९ नुसार तुमचे आजचे राशीभविष्य
- आजचे राशिभविष्य ३ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या आज कोणत्या राशींवर होणार शिवाची कृपा आणि कोणाला मिळणार ग्रहांची साथ
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: ४२ वर्षीय महिला वकिलाचा हैदरपूर उड्डाणपुलावरून पडून मृत्यू; पतीने ढकलून दिल्याची कुटुंबीयांची तक्रार, पतीवर गुन्हा दाखल.
- बंगळुरु: २ कोटींच्या विम्यासाठी सलाईनमधून विष देऊन माजी सैनिकाचा खून; प्रियकराच्या सेल्फी व्हिडिओमुळे तीन महिन्यांनी मृतदेह बाहेर काढून पर्दाफाश.
- बिहार: पाटण्यात संतापाचा लाव्हा; भरधाव बसच्या धडकेत तरुणाचा मृत्यू; संतप्त लोकांकडून बस आणि पोलिसांच्या गाड्यांची तोडफोड करत आगजनी.
- हैदराबाद: ऑनलाईन बेटिंगचा बळी; युट्यूबवर पाहून हेलियम गॅसच्या सहाय्याने चार्टर्ड अकाऊंटंटने संपवले जीवन
























Subscribe to my channel




Turn your audience into earnings—become an affiliate partner today!
Join our affiliate community and maximize your profits!