
Pune : भारताचे ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ आणि पर्यावरण संरक्षण चळवळीचे मार्गदर्शक डॉ. माधव गाडगीळ यांचे काल रात्री उशिरा पुण्यातील खासगी रुग्णालयात निधन झाले. वयाच्या ८३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने देशाच्या पर्यावरणीय विश्वावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पार्थिवावर आज (गुरुवारी) दुपारी चार वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
डॉ. गाडगीळ यांचा जन्म २४ मे १९४२ रोजी पुण्यात झाला. त्यांचे शालेय शिक्षण देखील पुण्यातच झाले. पुणे विद्यापीठ आणि मुंबई विद्यापीठ येथून त्यांनी जीवशास्त्रातील पदवी शिक्षण घेतले. हार्वर्ड विद्यापीठातून त्यांनी मॅथेमॅटिकल इकॉलॉजी या विषयात पीएच.डी. मिळवली. हार्वर्ड विद्यापीठाच्या आयबीएम संगणन केंद्राचे तसेच उपयोजित गणितशास्त्र विभागाचे ते फेलो होते. १९७३ ते २००४ या कालावधीत ते बेंगळुरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये प्राध्यापक होते. त्यांनी तेथे ‘सेंटर फॉर इकॉलॉजिकल सायन्सेस’ची स्थापना केली.
|
Nashik : शिर्डी दर्शनानंतर परतताना भीषण अपघात, दोन कारंचा जबर धडक; चौघांचा जागीच मृत्यू |
डॉ. गाडगीळ यांनी जैवविविधता संवर्धन, लोकसहभागातून नैसर्गिक साधनसंपत्तीचे व्यवस्थापन आणि शाश्वत विकास या विषयांवर मोलाचे संशोधन व लेखन केले.
त्यांच्या पत्नी डॉ. सुलोचना गाडगीळ या पुण्यातील भारतीय उष्णप्रदेशीय हवामानशास्त्र संस्थेत हवामानशास्त्रज्ञ होत्या. काही महिन्यांपूर्वी त्यांचेही निधन झाले. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने २०१० मध्ये पश्चिम घाटाच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी डॉ. माधव गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. या समितीने पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रांचा सविस्तर अभ्यास करून अहवाल सादर केला होता. हा अहवाल पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने मैलाचा दगड मानला जातो.
डॉ. माधव गाडगीळ यांनी विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संरक्षणाची जाणीव निर्माण व्हावी यासाठी त्यांनी शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी, तसेच प्राध्यापकांच्या साहाय्याने देशातील जैवविविधतेचे सर्वेक्षण आणि संवर्धन या विषयांवर विविध अभिनव प्रयोग केले. भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था, भारतीय विज्ञान अकादमी तसेच पर्यावरणाशी संबंधित विविध राष्ट्रीय समित्यांमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. डॉ. गाडगीळ यांच्या निधनाने पर्यावरण, जैवविविधता आणि परिसंस्था संवर्धनासाठी आयुष्यभर झटणारा एक प्रखर आवाज, अभ्यासू मार्गदर्शक आणि संवेदनशील शास्त्रज्ञ देशाने गमावला आहे.
शहर
- बारामती: पुण्यात भीषण अपघातात बोडरे कुटुंबातील तीनही भावंडांचा दुर्दैवी अंत
- पुणे: नवले ब्रिजवर भरधाव सिमेंट टँकर पलटी झाल्याने दुचाकीस्वाराचा चिरडून मृत्यू.
- मुंबईत सरकारचा मोठा दणका! १९,७३४ जन्म दाखल्यांमधील बेकायदेशीर दुरुस्त्या रद्द होणार; मूळ नोंदी पुनर्संचयित करण्याचे आदेश!
- बारामती तालुक्यात जलक्रांती! सुनेत्रा पवार यांच्या पुढाकाराने खांडज येथील बेंदचारीच्या खोलीकरण व रुंदीकरण कामाला जोरदार प्रारंभ; शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण!
महाराष्ट्र
- बारामती: पुण्यात भीषण अपघातात बोडरे कुटुंबातील तीनही भावंडांचा दुर्दैवी अंत
- भंडारा: वासनांधांचा नकार देणाऱ्या अल्पवयीन मुलीला ब्लॅकमेल; आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल केल्याने खळबळ
- अमरावती: 'बोगस' जन्मप्रमाणपत्रांचा मोठा स्फोट; तब्बल ४० हजार संशयास्पद नोंदी उघड!
- पुणे: नवले ब्रिजवर भरधाव सिमेंट टँकर पलटी झाल्याने दुचाकीस्वाराचा चिरडून मृत्यू.
गुन्हा
- अमरावती: 'बोगस' जन्मप्रमाणपत्रांचा मोठा स्फोट; तब्बल ४० हजार संशयास्पद नोंदी उघड!
- पुणे: आर्मीच्या सुभेदाराला दोन कोटींचा गंडा! प्रसिद्ध सीए दाम्पत्यासह पाच जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल.
- महाराष्ट्र: पुणे मनपा, विधान भवन आणि आरएसएस मुख्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 'खलिस्तान नॅशनल आर्मी'च्या नावाने आला ईमेल.
- पनवेल: लग्नाच्या तगाद्यातून प्रेयसीची हत्या करून मृतदेह जाळला; दोन महिन्यांनी प्रियकर अटकेत.
राजकीय
- कर्नाटकच्या राजकारणात मोठा भूकंप! डी. के. शिवकुमार मुख्यमंत्री होताच पक्षात बंडाळी; असंतुष्ट नेते दिल्लीला रवाना
- कोल्हापुरात 'शक्तीपीठ महामार्गा'वरून राजकीय ठिणगी; सतेज पाटील आणि राजेश क्षीरसागर आमनेसामने!
- तृणमूल काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप; २० खासदार 'नॉट रिचेबल', गुप्त बैठका आणि संभाव्य फुटीच्या चर्चांनी ममता बॅनर्जींची चिंता वाढली.
- पंजाब भाजपमध्ये मोठी खळबळ; प्रदेशाध्यक्षपदी के.एस. ढिल्लों यांच्या नियुक्तीनंतर सरचिटणीस डॉ. जगमोहन सिंग राजू यांचा राजीनामा.
इतर
- एफडी (FD) धारकांसाठी मोठी बातमी! आता बँकांना दररोज जाहीर करावे लागणार व्याजदर; आरबीआयचा पारदर्शकतेवर भर
- आजचे राशीभविष्य: मंगळाच्या कृपेने या राशींना होणार धनलाभ, मालमत्ता खरेदीचे योग!
- एसटीचा प्रवास आता अधिक हायटेक! सवलतीसाठी 'एनसीएमसी' स्मार्ट कार्ड अनिवार्य, तर बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात अवैध वाहतुकीवर बंदी!
- रोज सकाळी जिरे पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर की अपायकारक? डॉक्टरांनी सांगितली सत्यता.
मनोरंजन
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
देश विदेश
- लंडन: मराठी कुटुंबावर काळाचा घाला; 'एलिफंट अँड कॅसल' येथील ३६ व्या मजल्यावरून पडून दाम्पत्यासह नऊ वर्षांच्या मुलाचा मृत्यू.
- महाराष्ट्र: पुणे मनपा, विधान भवन आणि आरएसएस मुख्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 'खलिस्तान नॅशनल आर्मी'च्या नावाने आला ईमेल.
- ओमान-गुजरात सब-सी गॅस पाइपलाइन: होर्मुझवरील अवलंबित्व संपवून भारताची ऊर्जा सुरक्षा बळकट करणारा एक ऐतिहासिक प्रकल्प!
- लग्नापूर्वीचे शारीरिक संबंध म्हणजे चारित्र्यावर डाग नव्हे; सर्वोच्च न्यायालयाची अत्यंत महत्त्वपूर्ण टिप्पणी!


























Subscribe to my channel




https://shorturl.fm/RYmCO
https://shorturl.fm/2uJQb