
Pune : आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पुण्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, भारतीय जनता पक्षाला शहरात मोठा धक्का बसण्याची चिन्हे आहेत. निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठे खिंडार पाडून अनेक बड्या नेत्यांना प्रवेश दिला होता. त्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत अजित पवारांनी भाजपमधील नाराजांची मोट बांधत अनेक नेत्यांना प्रवेश दिला. आता निवडणूक प्रचार रंगात असताना अजित पवार भाजपला आणखी एक मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहेत.
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी शहर उपाध्यक्ष वसंत उर्फ बाळासाहेब अमराळे हे पक्षाला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. २५ वर्षांपासून पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या अमराळे यांच्या या संभाव्य निर्णयामुळे भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे. शिवाजीनगर-मॉडेल कॉलनी (प्रभाग १२) मध्ये बाळासाहेब अमराळे यांचा मोठा जनसंपर्क आहे. २०१२ च्या निवडणुकीत त्यांचा अत्यंत कमी मतांनी पराभव झाला होता, मात्र तेव्हापासून त्यांना सातत्याने उमेदवारीपासून दूर ठेवण्यात आल्याची भावना त्यांच्या समर्थकांमध्ये आहे. यंदाच्या निवडणुकीतही या प्रभागात पुरुष उमेदवाराऐवजी महिला आरक्षण टाकून अमराळे यांची संधी डावलण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. हा प्रकार भाजपमधीलच एका प्रबळ नेत्याने जाणीवपूर्वक केल्याचा आरोप अमराळे समर्थकांनी केला असून, सातत्याने होणाऱ्या या अन्यायामुळेच आता त्यांनी टोकाचे पाऊल उचलण्याचे ठरवले आहे.
|
|
अमराळे यांनी गेल्या अडीच दशकांत पुणे शहरात कार्यकर्त्यांचे मोठे जाळे निर्माण केले आहे. त्यांच्या या व्यक्तिगत 'व्होट बँक'मुळेच राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना पक्षात घेण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले असून, येत्या १० तारखेला हा पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे. या संदर्भात बाळासाहेब अमराळे यांना विचारले असता, त्यांनी सध्या तरी सावध भूमिका घेतली आहे. "येत्या दोन दिवसांत मी माझी सविस्तर भूमिका आणि पुढील निर्णय जाहीर करेन," असे त्यांनी स्पष्ट केले आहे. जर अमराळे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला, तर मतदानाच्या तोंडावर प्रभाग १२ मधील भाजपची गणिते पूर्णपणे बिघडू शकतात.
शहर
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
























Subscribe to my channel


https://shorturl.fm/IiavX