
Ahilyanagar : देशभरात प्रसिद्ध असलेल्या अहिल्यानगर येथील शनि मंदिर विश्वस्तमंडळ बरखास्त करून प्रशासकाच्या हाती दिलेला कारभार उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने पुन्हा विश्वस्त मंडळाकडे देण्याचा आदेश दिला असल्याची माहिती सचिव आप्पासाहेब शेटे यांनी दिली आहे. गेल्या काही वर्षांपासून शनी विश्वस्त मंडळाचा वाद कोर्टामध्ये गेला होता. यात काही महिन्यांपूर्वी औरंगाबाद खंडपीठाने विश्वस्त मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमणुकीचा निर्णय दिला होता. त्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून उपजिल्हाधिकारी आणि स्थानिक अधिकाऱ्यांच्या देवस्थानच्या विविध पदांवर नेमणूक देखील केल्या, मात्र विस्त विश्वस्त मंडळाकडून उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. या याचिकेवर आज सुनावणी झाली असून उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने प्रशासकाकडे असलेला कारभार काढून घेऊन पुन्हा विश्वस्त मंडळाकडे द्यावा, असा निर्णय दिला आहे.
भाजप आमदार सुरेश धस यांनी शनैश्वर देवस्थान ट्रस्टच्या कारभारात 500 कोटी रुपयांचा, तर स्थानिक आमदार विठ्ठलराव लंघे यांनी 100 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप केला. याच काळात देवस्थानचे बनावट अॅप प्रकरण देखील गाजले. बनावट अॅप तयार करून कोट्यावधीचा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला आणि या प्रकरणात गुन्हा दाखल झाला असून, यात दोघांना अटक केली आहे.
|
Pune : पुणे रिंगरोडसह मेट्रो प्रकल्पांची कामे वेगात; दादा भुसे यांनी दिली महत्त्वाची माहिती |
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोटाळ्यांच्या आरोपाची दखल घेत, कारभाराची चौकशी करणार असल्याचं सांगून प्रशासक नियुक्तीची घोषणा केली होती. देवाच्या नावाखाली घोटाळा करणाऱ्यांना सोडणार नाही, असा इशारा फडणवीस यांनी दिला होता.
पावसाळी अधिवेशनात देवस्थान विश्वस्तांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर राज्य सरकारच्या उपविधी सल्लागार व उपसचिव सागर बेंद्रे यांच्या स्वाक्षरीनं 22 सप्टेंबरला शनैश्वर देवस्थान ट्रस्टला पत्र मिळाले आणि त्यामध्ये विश्वस्त मंडळ बरखास्त करून जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली होती. यानंतर पुढे जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी 11 जणांची कार्यकारी समिती स्थापन करून प्रत्यक्ष कामकाज पाहण्यास सुरूवात केली. यानंतर बरखास्त केलेल्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष भागवत बनकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात याचिका दाखल केली होती.
बरखास्त विश्वस्तांनी दाखल केलेल्या याचिकेवर वेळोवेळी सुनावण्या झाल्या. विश्वस्तांनी आपल्या याचिकेत, देवस्थान ट्रस्टवर प्रशासक म्हणून जिल्हाधिकारी यांची नियुक्ती करणे कायद्यात तरतूद आहे का? आणि प्रशासकांनी नियुक्त केलेली कार्यकारी समिती कायदेशीर आहे की, बेकायदेशीर? असा प्रश्न उपस्थित केला होता.
अहिल्यानगर जिल्ह्यातील श्री शनैश्वर देवस्थान ट्रस्ट (शिंगणापूर) च्या व्यवस्थापनावरून निर्माण झालेल्या कायदेशीर वादावर मा. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने निकाल दिला आहे. अध्यक्ष भागवत बनकर व इतर विश्वस्तांनी दाखल केलेली याचिका अंशतः मंजूर करत, राज्य सरकारने २२ सप्टेंबर २०२५ रोजी काढलेला शासन निर्णय उच्च न्यायालयाने रद्द ठरवला आहे.
शनैश्वर देवस्थान न्यास अधिनियम, २०१८ या कायद्याची अंमलबजावणी २२.०९.२०२५ रोजी करण्याची अधिसूचना विधी व न्याय विभागाद्वारे प्रसिद्ध करण्यात आली होती. २२.०९.२०२५ रोजी राज्यशासनाने विश्वस्त मंडळ बरखास्त करून जिल्हाधिकारी, अहिल्यानगर यांची श्री शनैश्वर देवस्थान येथे प्रशासक म्हणून नियुक्ती केली.
दरम्यान, अध्यक्ष भागवत बनकर व इतर विश्वस्थांनी सदर शासन निर्णय २२.०९.२०२५ यास मा. उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे रिट याचिका दाखल करून आव्हान दिले. मा. उच्च न्यायालयाने प्रथम सुनावणी दरम्यान (दि.०४.१०.२०२५) उभय पक्षांचा युक्तिवाद ऐकून ‘जैसे थे’ परिस्थिती ठेवण्याचा आदेश पारित केला होता. ‘जैसे थे’ परिस्थितीत याचिकाकर्ते तसेच जिल्हाधिकारी, अहिल्यानगर व त्यांनी नेमलेली प्रशासकीय समिती देवस्थानचे कामकाज पाहत होते.
दरम्यान, याचिकाकर्ते यांच्या वतीने अॅड. सतीश तळेकर यांनी मा. उच्च न्यायालय येथे असा युक्तिवाद केला की, श्री शनैश्वर देवस्थान न्यास अधिनियम, २०१८ च्या कलम ५ व ३६ मध्ये प्रशासक नेमण्याची कोणतीही स्पष्ट तरतूद नाही. या कलमानुसार व्यवस्थापन समिती गठीत करण्याची कायदेशीर आवश्यकता आहे. कायद्यामध्ये तरतूद नसताना प्रशासकाची नियुक्ती करणे हे अधिकाराचा अतिरेक आणि मनमानी असल्याचा युक्तिवाद याचिकाकर्ते यांच्या वतीने करण्यात आला. तसेच जिल्हाधिकारी, अहिल्यानगर व त्यांनी नेमलेली प्रशासकीय समिती यांनी राजकीय हस्तक्षेपामुळे एकतर्फी देवस्थानचा कारभार स्वीकारून मनमानी करत असल्याची बाब मा. न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली होती.
सदर युक्तिवाद लक्षात उच्च न्यायालयाचे मा. न्या. विभा कंकणवाडी व मा. न्या. हितेन वेणेगावकर यांच्या खंडपीठाने २२.०९.२०२५ च्या शासन निर्णयांव्ये जिल्हाधिकारी, अहिल्यानगर यांची शनैश्वर देवस्थान येथे प्रशासक म्हणून नेमणूक नियमबाह्य असल्याचे ठरवले व सदर शासन निर्णय रद्द केला आहे. तसेच जिल्हाधिकारी, अहिल्यानगर यांनी ३०.०९.२०२५ च्या आदेशाने गठीत केलेली प्रशाकीय समिती नियमबाह्य असल्याचे ठरवले व सदर आदेश रद्द केला आहे.
जिल्हाधिकारी, अहिल्यानगर यांची प्रशासक म्हणून नेमणूक करण्याआधी ‘जैसे थे’ परिस्थिती होती तशी ठेवण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हाधिकारी, अहिल्यानगर व त्यांनी गठीत केलेली प्रशासकीय समिती यांनी देवस्थानचे स्थिर व अस्थिर मालमत्ता पूर्वीच्या व्यवस्थापन समितीकडे ७ दिवसांच्या आत हस्तांतर करण्याचे आदेश दिले आहेत.
श्री शनैश्वर देवस्थान न्यास अधिनियम, २०१८ मधील तरतुदीनुसार राज्य शासनाने नियमावली बनवुन पुढील कार्यवाही करावी व तोपर्यंत पूर्वीचे व्यवस्थापन समिती देवस्थानचे आर्थिक कामकाज बघतील असे निर्देश देत याचिका अंशत: निकाली काढली आहे. याचिकाकर्त्यांच्या वतीने वकील अॅड. सतीश तळेकर, अॅड. प्रज्ञा तळेकर व अॅड. अजिंक्य काळे यांनी काम पहिले, शासनाच्या वतीने अॅड. अतुल काळे यांनी काम पहिले.
शहर
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
- पुणे: के. बी. जोशी इन्स्टिट्यूटमध्ये एस.एन.डी.टी.चा पश्चिम महाराष्ट्र विभागीय युवा महोत्सव उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न.
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
महाराष्ट्र
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
- पुणे: के. बी. जोशी इन्स्टिट्यूटमध्ये एस.एन.डी.टी.चा पश्चिम महाराष्ट्र विभागीय युवा महोत्सव उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न.
गुन्हा
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!

























Subscribe to my channel


