Mumbai–Delhi Expressway : ६ राज्यांमधून १३५५ किमीचा प्रवास; २५ तासांची दूरी फक्त १२.५ तासांवर—मुंबई- दिल्ली एक्स्प्रेसवे कधी होणार सुरू?

Mumbai : मुंबईपासून थेट दिल्लीपर्यंत प्रवास करणं आता अधिक सोपं होणार आहे. यासाठी मुंबई- दिल्ली एक्स्प्रेस वे तयार केला जात आहे. हा एक्स्प्रेस वे नवीन इतिहास रचण्यासाठी तयार झाला आहे. हा एक्स्प्रेस वे देशातील दोन प्रमुख आर्थिक राजधानी दिल्ली आणि मुंबईला जोडला जाणार आहे. ६ राज्यातून हा एक्स्प्रेस वे जाणार आहे. ६ ते ८ लेनचा हा एक्स्प्रेस वे भविष्यात १२ लेनपर्यंत वाढवला जाणार आहे. या एक्स्प्रेस ेवेमुळे मुंबई ते दिल्ली प्रवासाचा वेळ निम्म्याहून कमी होईल.

महत्वाचे म्हणजे हा एक्स्प्रेस वे तयार झाल्यानंतर मुंबई ते दिल्ली हा प्रवास फक्त साडेबारा तासांचा होणार आहे. सध्या दिल्ली ते मुंबई प्रवासासाठी २५ तासांपेक्षा जास्त वेळ लागतो. म्हणजे प्रवासाचा कालावधी निम्म्याहून कमी होणार आहे. हा प्रोजेक्ट भारतीय रस्ते इतिहासातील सर्वात महत्त्वाकांक्षी प्रोडेक्टपैकी एक असणार आहे. हा एक्स्प्रेस वे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाद्वारे बांधला जात आहे. या एक्स्प्रेस वेच्या १,३५५ किलोमीटरच्या या मार्गापैकी ७७४ किलोमीटर आधीच प्रवाशांसाठी खुला करण्यात आला आहे आणि उर्वरित भाग मार्च २०२६ पर्यंत पूर्णपणे खुला होण्याची शक्यता आहे.

Nagpur : 28 वर्षीय विवाहित कबड्डीपटूची आत्महत्या; स्वप्नीलचे चॅट्स उघडकीस, पती फरार—महाराष्ट्र हादरला

मुंबई- दिल्ली एक्स्प्रेसवेच्या बांधकामासाठी अंदाजे १ लाख कोटी रुपयांचा खर्च आला आहेत. या एक्स्प्रेस वेचे काम वेगाने सुरू आहे. आतापर्यंत ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. हा एक्स्प्रेस वे दिल्ली, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र या सहा राज्यांना जोडला जाणार आहे. हा एक्स्प्रेस वे दिल्लीच्या डीएनडी फ्लायवे आणि हरियाणातील सोहना येथून सुरू होईल. तर महाराष्ट्रातील विरार आणि जेएनपीटी बंदरावर संपेल. या एक्स्प्रेस वेवर १२० किलोमीटर ताशी वेगाने प्रवास करता येईल. त्यामुळे लांबचा प्रवास कमी वेळात पूर्ण होईल. या एक्स्प्रेस वेसाठी एकूण १५००० हेक्टरपेक्षा जास्त जमीन वापरली गेली आहे.

मुंबई- दिल्ली एक्स्प्रेस वेची वैशिष्ट्ये -

- एकूण लांबी - १३५५ किलो मीटर

- एकूण खर्च - जवळपास १ लाख कोटी रुपये

- लेन - ८ लेन (इलेक्ट्रिक वाहनांसाठी वेगळी लेन)

- कोणत्या राज्यातून जाणार? - दिल्ली, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र

- कुठून होणार सुरूवात? - डीएनडी फ्लाईवे (दिल्ली) आणि सोहना (हरियाणा)

- कुठे संपणार? - विरार आणि जेएनपीटी पोर्ट (महाराष्ट्र)

- वेग मर्यादा- १२० किमी प्रतितास



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *