Mumbai : महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पावसाचा इशारा; अनेक जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यता, हवामान खात्याचा ‘ऑरेंज अलर्ट’

Mumbai :  महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून हवामानात झपाट्याने बदल होत असून भारतीय हवामान विभागाने (IMD) राज्यातील विविध भागांसाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवला आहे. रविवारी, ५ एप्रिल रोजी अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. बदलत्या वातावरणामुळे नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेण्याचा सल्ला प्रशासनाने दिला आहे.

कोकणात उष्ण-दमट वातावरण
मुंबई, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि पालघर या कोकणातील जिल्ह्यांमध्ये दिवसभर उष्ण आणि दमट वातावरण राहण्याची शक्यता आहे. मुंबईत कमाल तापमान ३० ते ३४ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २४ ते २७ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज आहे.

मराठवाड्यात वादळ आणि मुसळधार पावसाचा इशारा
मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड आणि परभणी जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

विदर्भात ‘ऑरेंज अलर्ट’
चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि नागपूर या जिल्ह्यांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. या भागांत वीजांच्या कडकडाटासह पाऊस आणि जोरदार वाऱ्यांची शक्यता असून नागरिकांनी वादळाच्या वेळी मोकळ्या जागी जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

उत्तर महाराष्ट्र व पश्चिम महाराष्ट्राचा अंदाज
उत्तर महाराष्ट्रातील जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांसाठी सध्या कोणताही अलर्ट जारी करण्यात आलेला नाही. तर पश्चिम महाराष्ट्रातही अलर्ट नसला तरी बदलत्या वाऱ्यांमुळे काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.

IMD कडून देशभरात इशारा
दरम्यान, भारतीय हवामान विभागाने देशातील अनेक राज्यांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. पंजाब, हरियाणा, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, पूर्व राजस्थान, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि छत्तीसगड या भागांमध्ये गारपीट, मेघगर्जना आणि ताशी ६० ते ७० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. पुढील २४ तासांत हवामानात तीव्र बदल होण्याचा इशाराही देण्यात आला आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *