
Mahakukbh Mela Stampede : प्रयागराजमध्ये आयोजित करण्यात आलेल्या महाकुंभ मेळ्यामध्ये आज मोठी दुर्घटना घडली. याठिकाणी झालेल्या चेंगराचेंगरीदरम्यान १० भाविकांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले. मौनी अमावस्येनिमित्त अमृतस्नान करण्यासाठी देश-विदेशातील नागरिकांनी कुंभमेळ्यात मोठी गर्दी केली आहे. याठिकाणी कडक सुरक्षाव्यवस्था करण्यात आली आहे असे असताना देखील संगम घाटावर चेंगराचेंगरी झाली. या घनटनेनंतर एकेच गोंधळ उडाला आणि भाविकांची पळापळ झाली. सर्वजण आपला जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळत होते.
पोलिसांनी कशीतरी परिस्थिती नियंत्रणात आणली. घटनास्थळावरचे काही फोटो समोर आले आहेत त्यावरून त्याची भीषणता लक्षात येत आहे. भाविकांचे सामान, चप्पल, कपडे सर्वत्र विखुरलेले दिसत आहे. या चेंगराचेंगरीमध्ये जखमी झालेल्यांना तात्काळ रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये अनेकांची प्रकृती गंभीर आहे त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. अनेकांच्या सोबत असलेले त्यांचे नातेवाईक हरवले. ही घटना नेमकी कशी घडली याबाबतची भयानक परिस्थिती प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आहे.
एका प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, आंघोळीनंतर जमावाला बाहेर पडण्याचा मार्ग न मिळाल्याने चेंगराचेंगरी झाली. काही लोकं वाटेत असलेल्या लोखंडी डस्टबिनवर आदळले त्यामुळे ते पडले आणि त्यांच्यासोबत इतर लोकही पडले. त्याचवेळी प्रचंड गर्दी असल्यामुळे काही महिलांचा श्वास गुदमरला. सर्वजण एकमेकांच्या अंगावर पडले. गर्दी ऐवढी होती की सर्वजण ढकलले जात होते. त्यामुळे काही वेळातच बॅरिकेडिंग तुटून चेंगराचेंगरी झाली.
|
|
एका महिलेने सांगितले की, 'मला श्वासोच्छवासाचा त्रास होत आहे. मला खूप दडपण येत आहे. खूप त्रास होत आहे.' एका रुग्णवाहिका चालकाने सांगितले की, 'त्यांनी रुग्णालयात २० फेऱ्या केल्या आहेत आणि आज एकट्याने ३५ रुग्णांना रुग्णालयात नेले आहे.'
चेंगराचेंगरीमध्ये अडकलेल्या एका व्यक्तीने सांगितले की, 'चेंगराचेंगरी झाली तेव्हा मीही तिथे होतो. आंघोळीनंतर कुठे जायचे हे गर्दीला समजत नव्हते. ठिकठिकाणी ठेवलेले लोखंडी डस्टबीनही भाविकांना दिसत नव्हते. त्यामुळे अनेकजण पडून त्यांच्या सोबत असलेल्या बॅगा आणि इतर सामान इकडे-तिकडे पडले गेले. मी स्वतः पडलो आणि माझ्या पायाला दुखापत झाली. माझे आई-वडीलही खाली पडले. ज्यांना मी मदत केली. गर्दीतील काही तरुण घाबरून एकमेकांना धक्काबुक्की करू लागले त्यामुळे चेंगराचेंगरी झाली.'
आणखी एका भाविकाने सांगितले की, 'बाहेर पडण्याचा मार्ग पूर्णपणे ठप्प झाल्यामुळे चेंगराचेंगरी झाली. आम्ही चार जण होतो. आमचे काही मित्र आधीच नंदनी द्वारला पोहोचले होते. आम्ही मागे राहिलो आणि अचानक रस्ता पूर्णपणे बंद झाला. समोर लोकं पडत होती आणि मागूनही गर्दी वाढत होती. त्यामुळे चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली.'
शहर
- लाचखोर पोलिसांचा पर्दाफाश! हुंड्या प्रकरणातील केस कमकुवत करण्यासाठी लाच घेणाऱ्या कर्नाटक पोलिसांना राजस्थानात अटक
- पुण्यात आरटीई प्रवेशाचा 'खेळखंडोबा'; युरो स्कूलने ५ वर्षांच्या बालकाला हाकलले, प्रवेशासाठी ५० हजारांची मागणी; शिक्षण संचालकांचे एफआयआरचे आदेश!
- राजकीय दौरा ठरला थरारक! नाशिकमध्ये भाजप नगरसेवकांच्या बसचा हॉटेलच्या भिंतीला भीषण अपघात
- नागपूर: तर्री पोह्यावरून झालेल्या वादाचे पर्यवसान तुंबळ हाणामारीत; ७ जणांविरोधात गुन्हा दाखल
महाराष्ट्र
- पुण्यात आरटीई प्रवेशाचा 'खेळखंडोबा'; युरो स्कूलने ५ वर्षांच्या बालकाला हाकलले, प्रवेशासाठी ५० हजारांची मागणी; शिक्षण संचालकांचे एफआयआरचे आदेश!
- राजकीय दौरा ठरला थरारक! नाशिकमध्ये भाजप नगरसेवकांच्या बसचा हॉटेलच्या भिंतीला भीषण अपघात
- नागपूर: तर्री पोह्यावरून झालेल्या वादाचे पर्यवसान तुंबळ हाणामारीत; ७ जणांविरोधात गुन्हा दाखल
- रेल्वे प्रवाशांसाठी मोठा दिलासा! सोलापूरजवळील टिकेकरवाडी यार्डाचा कायापालट; गाड्या धावणार आता अधिक वेगाने आणि सुरक्षित!
गुन्हा
- लाचखोर पोलिसांचा पर्दाफाश! हुंड्या प्रकरणातील केस कमकुवत करण्यासाठी लाच घेणाऱ्या कर्नाटक पोलिसांना राजस्थानात अटक
- नागपूर: तर्री पोह्यावरून झालेल्या वादाचे पर्यवसान तुंबळ हाणामारीत; ७ जणांविरोधात गुन्हा दाखल
- पुणे-नाशिक महामार्गावर संतापजनक घटना; तरुणीला ओढून नेऊन कालव्यात फेकले, नराधमाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
- कल्याणमध्ये क्रूरतेचा कळस! हुंड्यासाठी गर्भवती महिलेचे मुंडण, गरम पाण्याने चटके देत सासरच्यांनी केला छळ!
राजकीय
- 'टीएमसी' कुणाची? ममता बॅनर्जींच्या पक्षात फूट; बंडखोर खासदारांची आता पक्षाचे नाव आणि चिन्हावर दावा करण्याची तयारी!
- चंद्रपूर काँग्रेसमध्ये राजकीय वादळ; धानोरकर-वडेट्टीवार यांच्या दोन 'व्हीप'मुळे नगरसेवक संभ्रमात!
- विधान परिषद निवडणुकीत पुन्हा 'हॉटेल पॉलिटिक्स'चा खेळ; दगाफटका टाळण्यासाठी महायुतीकडून नगरसेवकांचे 'ऑपरेशन ठाणे'!
- दादरमध्ये पांढऱ्या पट्ट्यांवरून नवा वाद: संदीप देशपांडेंचा आक्रमक पवित्रा, पालिकेला दिला ३ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम!
इतर
- आजचे राशिभविष्य १४ जून २०२६: बाप्पा आणि हनुमानजींच्या कृपेने कोणत्या राशींचे नशीब चमकणार? जाणून घ्या तुमची रास काय सांगते!
- पुणे: आजी-आजोबांच्या डोळ्यांतील प्रकाश जपण्यासाठी पुण्यात अनोखा उपक्रम; मोतीबिंदू शस्त्रक्रिया फक्त ₹६,९९९ मध्ये
- आजचे राशिभविष्य १२ जून २०२६: 'या' राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा; जाणून घ्या तुमचे नशीब!
- आर्थिक राशिभविष्य ११ जून २०२६: कमला एकादशीच्या दिवशी या राशींवर बरसणार धन, मिळेल यश!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
देश विदेश
- अमेरिका-इराण शांतता करार: इराणकडून तुर्की, इराक आणि इजिप्तशी चर्चा; पंतप्रधान मोदींनी केले स्वागत
- ब्रिटनचा ऐतिहासिक निर्णय! १६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया बंदी; ऑनलाइन सुरक्षिततेसाठी मोठे पाऊल
- इंधन दरांचा खेळ! पाकिस्तानमध्ये पेट्रोल स्वस्त तर भारतात महाग; दोन्ही देशांच्या दरामागचे अर्थकारण काय?
- बापरे! हवेतच दोन हेलिकॉप्टरची भीषण धडक; अपघातात ६ जणांचा मृत्यू, अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर!
























Subscribe to my channel



