
मुंबई : परिवहन विभागाच्या मोटार वाहन कायद्यांतर्गत विविध सेवा ऑनलाईन करण्यात आल्या आहेत. याच ऑनलाईन सेवांमध्ये आता बदल झाल्याने वाहनचालक शिकाऊ परवाना ,पक्का परवाना, परवान्याची वैधता, वैधता संपल्यानंतर परवाना नूतनीकरणाच्या दक्षतेसंदर्भात नागरिकांनी माहिती करून घेण्याची गरज निर्माण झाली आहे. ज्या व्यक्तींना शिकाऊ परवान्याची आवश्यकता आहे, अशा व्यक्ती संकेतस्थळाला भेट देऊन परवाना स्वतः प्राप्त करू शकतात. शिकाऊ परवाना प्राप्त करण्यासाठी दोन पर्याय देण्यात आले आहेत.
आपल्या सोयीनुसार पर्याय निवडून ऑनलाईन फॉर्म सादर करावयाचा आहे. वय ४० च्या आत आधार कार्डधारक व्यक्तींना शिकाऊ परवाना प्राप्त करण्यासाठी फक्त सही अपलोड करावयाची आहे. मात्र आधार कार्डमध्ये बदल असल्यास त्यांना मूळ कागदपत्रांसोबत आरटीओमध्ये जावे लागेल. वय वर्षे ४० पेक्षा जास्त असलेल्यांना वैद्यकीय प्रमाणपत्र अपलोड करून तपासणी करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये यावे लागेल. आधार कार्ड शिवाय ज्या व्यक्तींना शिकाऊ परवाना प्राप्त करावयाचा आहे, त्यांना प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये येऊन ऑनलाईन परीक्षा द्यावी लागेल.
शिकाऊ परवाना आधार आधारित सेवा-शिकाऊ परवाना आधारविरहित सेवा चाचणी शुल्क ५० रुपये - चाचणी शुल्क ५० रुपये परवाना शुल्क १५० रुपये - परवाना शुल्क १५० रुपये एकूण शुल्क २०० रुपये - एकूण शुल्क २०१ रुपये अतिरिक्त वर्ग शुल्क १५० रुपये - अतिरिक्त वर्ग शुल्क १५१ रुपये
शिकाऊ परवाना प्राप्त केल्यानंतर शिकाऊ परवाना जारी केलेल्या दिनांकापासून तीस दिवसांच्या कालावधीनंतर अर्जदारास पक्क्या परवान्याकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतो. प्रत्येक वाहन संवर्गाकरिता स्वतंत्र शिकाऊ परवाना जारी करण्यात येतो. पक्का परवाना एकच असल्यामुळे पक्या परवान्याकरिता अर्ज करताना अर्ज केलेले सर्व वाहन संवर्ग एकत्रित सीलेक्ट करून त्याकरिता विहित शुल्क भरणा करता येतो. वैद्यकीय प्रमाणपत्र हे शिकाऊ परवान्याच्या वेळी अपलोड केले असल्याने पक्क्या परवान्याच्या वेळी ते पुन्हा अपलोड करण्याची आवश्यकता नाही.
परिवहन वाहन, तसेच जड वाहन संवर्गाकरिता शिकाऊ परवाना प्राप्त केला असल्यास पक्क्या परवान्याच्या वेळी अधिकृत मोटार ट्रेनिंग स्कूलमार्फत विहित प्रशिक्षण प्राप्त करणे व त्यासंबंधी असलेले ५ अ या विहित नमुन्यामध्ये प्रमाणपत्र मोटार ट्रेनिंग स्कूलमार्फत प्राप्त करून ते अपलोड करणे आवश्यक आहे.
तर परिवहन वाहन संवर्गाकरिता परवाना वैधता ही ५ पाच वर्षे असून धोकादायक पदार्थ वाहतूक करणाऱ्या वाहन संवर्गाकरिता परवाना वैधता तीन वर्षे इतकी देण्यात येते. पक्क्या परवान्याच्या चाचणीकरिता आरटीओ मुंबई (मध्य) कार्यालयामध्ये प्रतिदिन ९०० वाहन संवर्ग इतका कोटा ठेवण्यात आलेला आहे. त्याकरिता परिवहन विभागाच्या संकेतस्थळावर स्लॉट बुकिंग ही सुविधा उपलब्ध आहे. परवाना वैधतेबाबत
मोटार वाहन विभागाकडून जारी करण्यात येणारा परवाना वैधतेबाबत नवीन केंद्रीय मोटार वाहन कायद्यांतर्गत आता परवानाधारकाच्या वयानुसार परवान्याची वैधता ठरवली जाते. धारकांचे वय - वैधता - वय वर्ष ३० पर्यंत - धारक व्यक्तीच्या वयाच्या ४० वयापर्यंत - वय वर्ष ३१ ते ५० पर्यंत - जारी केल्याच्या दिनांकापासून पुढील १० वर्षाकरिता - वय वर्ष ५१ ते ५५ पर्यंत - धारक व्यक्तीच्या वयाच्या ६० वर्षापर्यंत - वय ५५ वर्ष नंतर - जारी केल्याच्या दिनांकापासून पुढील ५ वर्षाकरिता
यामध्ये धारकाने पुन्हा शिकाऊ परवाना प्राप्त करून वाहन चालविण्याची चाचणी देणे ही अतिरिक्त प्रक्रिया टाळण्याकरिता परवान्याची वैधता संपण्याआधी १ वर्षांचे आत परवाना नूतनीकरणाकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची दक्षता धारकांना घ्यावी लागणार आहे.
परवाना नूतनीकरण
परवान्याची वैधता संपल्यानंतर एक वर्ष झाले असल्यास अशा धारकांकरिता पुन्हा चाचणी देणे बंधनकारक करण्यात आले आहे. मोटार वाहन कायदा १९८८ च्या कलम १५ मधील तरतुदीनुसार परवान्यामध्ये असलेल्या प्रत्येक वाहन संवर्गाकरिता शिकाऊ परवाना प्राप्त करून विहित शुल्क भरणा केल्यावर वाहन चाचणीकरिता स्लॉट आरक्षित करून चाचणी उत्तीर्ण होणे क्रमप्राप्त आहे. धारकाने त्याच्या परवान्याची वैधता संपण्याआधी अथवा संपल्यावर एका वर्षांचे आत नूतनीकरणाकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज केल्यास केवळ ऑनलाईन विहित अर्ज व त्यासोबतच्या कागदपत्रांच्या प्रिंट प्रादेशिक परिवहन कार्यालयात सादर करावयाच्या आहेत.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




