
Pune : महपालिकेच्या विविध खात्यांत काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना दिवाळीचा बोनस देण्याचे आदेश कामगार आयुक्त कार्यालयाने दिल्यानंतरही अनेक ठेकेदारांनी त्याची अंमलबजावणी केलेली नाही. त्यामुळे कंत्राटी कामगारांना अद्यापही बोनस मिळालेला नाही. बोनसबाबत तातडीने निर्णय न घेतल्यास विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर हे कामगार बहिष्कार टाकतील, असा इशारा राष्ट्रीय मजदूर संघाने दिला आहे.
महापालिकेत कायमस्वरूपी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना दिवाळीत बोनस आणि सानुग्रह अनुदान दिले जाते. मात्र कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कामगारांना बोनसपासून वंचित ठेवले जाते. पालिकेत सध्या साडेदहा हजार कंत्राटी कामगार वेगवेगळ्या विभागात काम करत आहेत. त्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत.
त्याबाबत पालिका प्रशासनाने एकही बैठक घेतली नाही. त्यातच बोनसचा प्रश्नही रखडलेला आहे. कामगारांना बोनस मिळावा, यासाठी राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष सुनील शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन आणि उपोषण करण्यात आले होते. त्यावेळी कामगारांना बोनस देण्याचा विचार सुरू असल्याचे पालिका प्रशासनाने सांगितले होते. मात्र त्यावर अद्यापही ठोस निर्णय न झाल्याने हजारो कामगार बोनसपासून वंचित असल्याचे कामगार नेते सुनील शिंदे यांनी सांगितले.
|
|
कंत्राटी कामगारांना बोनस देणे हा त्यांचा अधिकार असून त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश कामगार उपायुक्त कार्यालयातील सहायक कामगार आयुक्त निखिल वाळके यांनी दिले होते. महापालिका आयुक्तांनी याबाबत सर्व ठेकेदारांना सूचना देऊन बोनस देण्यास भाग पाडावे, अशा सूचना काही दिवसांपूर्वी वाळके यांनी केल्या होत्या. मात्र या सूचनांनंतही अद्यापही कामगारांना बोनस मिळाला नसल्याचे समोर आले आहे. ठेकेदार बोनस देण्यास टाळाटाळ करत असल्याची तक्रार अनेकदा पालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे करूनही संबंधित ठेकेदावर कोणतीही कारवाई पालिका करत नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. कामगारांचा हक्क असलेला बोनस मिळावा, यासाठी अनेकदा आंदोलने, उपोषण करूनही पालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने कामगार हवालदिल झाले आहेत. निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्याने पोलीस प्रशासन आंदोलन, उपोषण करण्यास परवानगी देत नाही. त्यामुळे निवडणुकीच्या मतदानावरच बहिष्कार टाकण्याचा विचार कामगारवर्ग करत आहे. प्रशासनाने यावर तातडीने निर्णय न घेतल्यास मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला जाईल, असेही शिंदे यांनी सांगितले.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
- पुणे: लवळे फाट्या जवळ भीषण साखळी अपघात! सिमेंटचा ट्रक, डंपर, टेम्पो आणि दोन दुचाकींमध्ये जोरदार धडक; एक जण जागीच ठार, दोघे गंभीर जखमी
- पुणे: म्हाळुंगे-नांदे रोडवर मोठा अपघात! चालकाला डुलकी लागल्याने कर्नाटक पासिंगचा आरएमसी ट्रक उलटला; रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप
महाराष्ट्र
- पुणे: सरकारला फुले-आंबेडकरी विचारांची ताकद बघायची आहे का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा संतप्त सवाल
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- कोल्हापूर: गांधी जयंतीनिमित्त कोल्हापुरात अनोखी परंपरा! कारागीर फिरोज सत्तारमेकर यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यास सर्वप्रथम अर्पण केली पुष्पमाला
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
























Subscribe to my channel




