Dhule Laling Waterfall : मित्रांसोबत पोहायला गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू; धुळ्याजवळील लळींग धबधब्यावरील घटना

Dhule : धुळे शहरापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या लळींग धबधब्याच्या परिसरात चार मित्र फिरण्यासाठी गेले होते. येथील धबधब्याचे पाणी पाहून पोहण्याचा मोह आवरला गेला नसल्याने चारही मित्र पोहण्यासाठी उतरले. मात्र चौघांपैकी एकाचा धबधब्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

जयेश गरुड (वय २२) असे बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला असलेल्या जयेश गरुड व त्याचे तीन मित्र असे (Dhule) धुळे शहरापासून जवळ असलेल्या लळींग धबधब्याच्या ठिकाणी संध्याकाळच्या सुमारास फिरण्यासाठी गेले होते. या धबधब्यामध्ये त्यांनी पोहण्यासाठी उड्या टाकल्या. परंतु पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे जयेशचा त्या ठिकाणी बुडून दुर्दैवी मृत्यू (Death) झाला आहे.

Pune Gas Explosion: पुण्यात अग्नितांडव, भल्यापहाटे गॅस गळतीने स्फोट, पाचजण जखमी

 

घटनेची माहिती मोहाडी पोलिसांना मिळाल्यानंतर मोहाडी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. याठिकाणी शोधकार्य सुरु करण्यात आले होते. परंतु संध्याकाळी उशीर झाला असल्या कारणाने रेस्क्यू ऑपरेशन राबविण्यासाठी अडचणी येत असल्यामुळे, रेस्क्यू ऑपरेशन थांबवण्यात आले होते. त्यानंतर आज सकाळी पुन्हा शोधकार्य राबवत धबधब्याच्या पाण्यात बुडालेल्या युवकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *