उमाताईंनी मराठीत अनुवादित केलेल्या कन्नड साहित्यापैकी बहुतेक वेळा भैरप्पा, शिवराम कारंत किंवा गिरीश कार्नाड यांचे साहित्य वाचले जाते. ‘के. पी. पूर्णचंद्र तेजस्वी’ या गुणी लेखकाचे साहित्य मात्र त्यामानाने कमी वाचले गेले. चौकटीबाहेरचे वाचनही व्हावे या उद्देशाने पूर्णचंद्र तेजस्वी या डाव्या चळवळीतील लेखकाचे ‘चिदंबर रहस्य’ हे साहित्य अकादमी पुरस्कार (१९८७) प्राप्त पुस्तक वाचले. गर्दी, गजबज, गोंगाट यापासून दूर निसर्गाच्या सानिध्यात रमणाऱ्या लेखकाच्या नावावर कर्नाटकात मलेनाडजवळ कॅाफी आणि वेलदोड्याच्या कित्येक एकारांच्या इस्टेटी होत्या. ‘कार्व्हालो’ ही त्यांची मराठीत अनुवादित झालेली व गाजलेली पहिली साहित्यकृती. कन्नड महाकवी कुवेंपू यांचे ते सुपुत्र होते. २००७ साली पूर्णचंद्र तेजस्वी निवर्तले. वेलदोड्याच्या उत्पादनातून मिळणाऱ्या नफ्यात लक्षणीय घट झाल्याचे लक्षात आल्यानंतर तोवर निद्रिस्त असलेल्या सरकारला जाग येते. वेलदोड्याच्या घटलेल्या उत्पादनाची कारणे शोधण्यासाठी, तसेच ‘वेलदोडा संशोधन केंद्रा’चे प्रमुख जोगीहाळ यांच्या संशयास्पद मृत्यूचा तपास करण्यासाठी श्यामनंदन अंगडी नावाच्या इंटेलिजन्स ॲाफिसरची केसरूर या गावात नियुक्ती केली जाते. या कामात त्याला जयराम नावाच्या लेखकाच्या कल्पनाशक्तीची बरीच मदत होते. तसेच संशोधन केंद्रातील इतर कर्मचारी, केसरूरच्या ज्युनियर कॉलेजचे प्राध्यापक रामचंद्र यांचीही त्याला साथ मिळते. प्राध्यापक रामचंद्र विद्यार्थीप्रिय शिक्षक आहेत आणि अडीअडचणीला विद्यार्थी त्यांच्याकडे विनासंकोच धाव घेतात. बंडखोरी इथल्या विद्यार्थ्यांच्या रक्तातच आहे आणि ते त्यांच्या प्राचार्यांनाही जुमानत नाहीत. मुलींबद्दल त्यांना ओढ वाटते, पण मुली समोर असल्या की मग यांची तंतरते, असा तो काळ. ब्राह्मण, लिंगायत, वोक्कलिग, गोसावी, हरिजन अशा अनेक जाती आणि त्यांच्या अनेक कहाण्या परस्परांच्या चष्म्यातून पाहायला मिळतात. ‘आम्ही जात सोडून दिली आहे’ हे उच्चारवाने सांगत फिरणारे क्रांतिकारक मित्र हातघाईच्या प्रसंगात परस्परांना जातीवाचक शिवीगाळ करतात, तेव्हा जातीची मुळे समाजात किती खोलवर रुजली आहेत, हे लक्षात येते. हिंदू समाजाला एक करण्यापेक्षा त्यांच्यात विभाजनाचे बीज कालवणे किती सहजपणे शक्य आहे, अशा आशयाचा संवाद येतो तो अतिशय प्रत्ययकारी आहे. मुसलमान समाजाने केलेली अतिक्रमणे आणि बांधकामे, पद्धतशीरपणे घडवून आणलेली लोकसंख्यावाढ आणि गुंडगिरीच्या जोरावर चालवलेली शिरजोरी, त्याकडे आत्ममग्न हिंदूंचा कानाडोळा याकडेही पुस्तक लक्ष वेधते. सुलेमान बेरी आणि त्याचे चेलेचपाटे उघडपणे खलनायकी भूमिकेत असतानाही लेखकाने रामाचारी यांचा कावेबाजपणा अधिक गडदपणे ठसवला आहे, हे जाणवते. गंभीर विषय, उपहासगर्भ शैली व नर्मविनोदी फोडणीच्या जोडीने मांडल्याने वाचकांना खेळकरपणा जाणवत राहतो. इंग्लिशगौडा, रफी, जयंती, संशोधन केंद्रातील संचालक पाटील, कृष्णेगौडा, बाबू गोसावी, जादूगार मुत्तू व अन्य बहुतेक पात्रांच्या वाट्याला सशक्त भूमिका आली आहे. विविध पात्रांकडून गावपातळीवरील गलिच्छ राजकारणाला असणारे अनेक सूक्ष्म पदर अलगदपणे उलगडत जातात. सरतेशेवटी या राजकारणाची परिणती धार्मिक हिंसाचारात होते, ही अन्यथा वास्तवात घडणारी कथावस्तू पुस्तकात वाचणे जड जाते. पुस्तकाची गोष्ट मोबाइल, इंटरनेट, टीव्ही किंवा संपर्काची अत्याधुनिक साधने असणाऱ्या काळातली नाही. ती ज्या काळात लिहिली गेली, त्यापेक्षा आज निसर्गाचा ऱ्हासही कितीतरी पटीने जास्त झाला, होत आहे आणि जातीय द्वेषही वाढला आहे. तरीही कथानकाच्या मूळ गाभ्याचा संदर्भ टिकून आहे, ही विशेष महत्त्वाची गोष्ट आहे. वेलदोड्याचे उत्पादन नेमके का कमी होते?, त्यामागे नैसर्गिक वातावरणातील चढउतार कारणीभूत असतात, की कोणते षडयंत्र असते?, उत्पादन वाढवण्याचा कोणता उपाय जोगीहाळांना ठाऊक असतो?, जोगीहाळांचा खरोखरच मृत्यू झाला असतो का?, कृष्णेगौडाच्या घरावर दगडं टाकणारे ‘भूत’ कोण असते?, यातील चिदंबर रहस्य नेमके कोणते? अशा अनेक प्रश्नांची उकल होण्यासाठी हे पुस्तक मुळातून वाचणेच श्रेयस्कर ठरेल. त्यांची उत्तरे देणं म्हणजे स्पॅायलर ठरेल. तामिळनाडूतील ‘चिदंबर नटराज मंदिरा’त गर्भगृहातील सोन्याच्या बिल्वपत्रांच्या पडद्यामागे नटराजाची कोणतीही मूर्ती नाही, तिथे नटराज निराकार रूपात (अंबर - आकाश) आहे, असे मानले जाते. मायेचा पडदा दूर झाल्यावरच, चेतनेला (चिद्) निराकार (अंबर -आकाश) रूपातील ईश्वराचे रहस्य समजते, असा प्रतीकात्मक अर्थ येथे अभिप्रेत आहे. पुस्तक वाचताना, वेगवेगळे तर्क बांधताना, शेवटाकडे पोहोचल्यावरच शीर्षकाचा उलगडा होतो. कर्नाटकच्या चिकमंगलूर जिल्ह्यात केसरूर नावाच्या एका काल्पनिक गावात घडलेले हे कथानक भारताच्या कोणत्याही गावात सहजच घडू शकेल, इतके सार्वत्रिक अपिल त्यात आहे. तात्कालीक कारणे आणि फायद्यांसाठी फारसा विचार न करता बिनदिक्कत विधीनिषेधशून्यतेने निसर्गाला ज्ञात-अज्ञातपणे वेठीला धरणारी माणसाची प्रवृत्ती, निसर्गासह आत्मविनाशाला कारणीभूत गुन्हेगारी वृत्ती, सरकारी संशोधन केंद्रांतील अनागोंदी, त्याबद्दलची सरकारी अनास्था, भ्रष्टाचारी यंत्रणा, मनुष्यमात्रांची दांभिकता आणि भाबडेपणा, जातीय विद्वेष आणि धार्मिक उन्माद या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर कथानक पुढे सरकत जाते. ‘कांतारा’, ‘दशावतार’ यांसारख्या सिनेमांना डोक्यावर घेणाऱ्या प्रेकक्षांना आवडेल असे हे गूढरम्य पुस्तक.
ते वाचकाला अंतर्मुख करते आणि तत्त्वचिंतनाच्या पातळीवर विचार करण्यास प्रवृत्त करते. शेवटच्या प्रसंगातील दोघांनाच असे दृश्य दिसू शकते, जे इतर कोणाला दिसू शकत नाही; पण त्याकरता त्यांना अनेक खस्ता खाऊन, चढण चढून जावे लागते या सूचक रूपकाचा अफलातून दाखला देण्यात आला आहे. माणसाच्या आकलनाला असणाऱ्या मर्यादांसाठी केलेला चिदंबराच्या उपमेचा वापर अप्रतिम आहे. साचेबद्ध पद्धतीने ठरलेल्या पठडीतील शेवट न करता तो वाचकांच्या विचारशक्तीला आवाहन करतो, हे महत्त्वाचे. वाचकांना सुरुवातीपासून खिळवून ठेवण्याची किमया साधताना शेवटाकडे येताना पुस्तक जी उंची गाठते, त्याने ते जास्त प्रभावी होते. वास्तविक आयुष्यात घडणाऱ्या घटनांचे प्रतिबिंब साहित्यात पाहताना वाचाकाला हसू आले, बुचकळ्यात पडले, उत्सुकता ताणली गेली, विचार करण्यास भाग पडले, अस्वस्थ वाटले, तर ती साहित्यकृती यशस्वी मानावी, असा साधारण संकेत आहे. ‘चिदंबर रहस्य’ हे सगळे अनुभव वाचकांना सहजपणे देते. लेखक - के.पी. पूर्णचंद्र तेजस्वी मराठी अनुवाद - उमा वि. कुलकर्णी प्रकाशक - मेहता पब्लिशिंग हाऊस मूल्य - ₹ 195 /- पृष्ठसंख्या - 196 संबंधित वृत्त बुक रिव्ह्यू:'काजवा' म्हणजे अंधाऱ्या रात्री स्वतःच्या प्रकाशात वाट शोधणारा बेमालूम संघर्षमय प्रवास! बुक रिव्ह्यू:'पुस्तके साद आणि दाद'मध्ये मुखापासून उगमाकडे जाणारा प्रवास; मूळ साहित्यकृती वाचायला येतो हुरूप! 'वसुंधरेचे शोधयात्री':साहसी दर्यावर्दींचा चित्तथरारक इतिहास मांडणारे लेखक डॉ. अनुराग लव्हेकर यांची मुलाखत, ऐका आणि पाहा VIDEO https://link.divyamarathi.com/lHdELfz6JPb
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- टोमॅटोच्या किमती गगनाला भिडल्या! सामान्यांना दिलासा देण्यासाठी सरकारचा 'अनुदानित' विक्रीचा मोठा निर्णय
- शेअर बाजाराची दमदार 'यु टर्न' कामगिरी; सेन्सेक्स ७९० अंकांनी वधारला, निफ्टी पुन्हा २४,००० च्या पार!
- जालन्यात खळबळ: दीड वर्षात १५ बांगलादेशी घुसखोर जेरबंद; बनावट ओळखपत्रांचे मोठे रॅकेट उघड!
- इंडिगोची एअरपोर्ट टॅक्सी सेवा सुरू! आता अवघ्या ४९ रुपयांपासून कॅब बुकिंग, प्रवाशांना मिळणार मोठा दिलासा
महाराष्ट्र
- शेअर बाजाराची दमदार 'यु टर्न' कामगिरी; सेन्सेक्स ७९० अंकांनी वधारला, निफ्टी पुन्हा २४,००० च्या पार!
- जालन्यात खळबळ: दीड वर्षात १५ बांगलादेशी घुसखोर जेरबंद; बनावट ओळखपत्रांचे मोठे रॅकेट उघड!
- इंडिगोची एअरपोर्ट टॅक्सी सेवा सुरू! आता अवघ्या ४९ रुपयांपासून कॅब बुकिंग, प्रवाशांना मिळणार मोठा दिलासा
- अमरावतीत अंगावर काटा आणणारी घटना! सकाळी फिरायला निघालेल्या मुलालाच आढळला वडिलांचा रक्ताच्या थारोळ्यातील मृतदेह; ६५ वर्षीय वृद्धाची निर्घृण हत्या
गुन्हा
- अमरावतीत अंगावर काटा आणणारी घटना! सकाळी फिरायला निघालेल्या मुलालाच आढळला वडिलांचा रक्ताच्या थारोळ्यातील मृतदेह; ६५ वर्षीय वृद्धाची निर्घृण हत्या
- लोहगड किल्ला हत्याकांडाचा धक्कादायक खुलासा! केतन अग्रवालचा मृत्यू 'अपघात' नसून मंगेतर आणि तिच्या प्रियकराने केलेली सुनियोजित हत्या
- मुंबई: लोकलमध्ये प्रवाशावर जीवघेणा हल्ला; दरवाजा बंद करण्याच्या वादातून तरुणावर चाकूने वार!
- गोव्यातील आलिशान सोसायटीतून चालत होते सायबर फ्रॉडचे साम्राज्य; ६.२५ कोटींचे व्यवहार उघड, १२ जणांना बेड्या
राजकीय
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
- 'ऑपरेशन टायगर'ची इनसाईड स्टोरी! एकनाथ शिंदेंनी कसा घडवून आणला उद्धव ठाकरेंच्या खासदारांमध्ये ऐतिहासिक भूकंप?
इतर
- छत्रपती संभाजीनगरच्या अन्न प्रयोगशाळेत ढिगाऱ्याखाली तपासणी! कर्मचारी कमतरता आणि नादुरुस्त AC मुळे ४ हजार नमुने प्रलंबित.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!
- दैनिक राशिभविष्य २३ जून २०२६: आज कोणाचे नशीब चमकणार? जाणून घ्या तुमची रास काय सांगते!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
देश विदेश
- स्कोडाची दमदार एन्ट्री! एका चार्जवर ६४७ किमी धावणार ७-सीटर लक्झरी इलेक्ट्रिक एसयूव्ही 'पीक' (Peaq) लाँच
- उत्तर प्रदेशात खळबळ! काकी गरोदर राहिली अल्पवयीन पुतण्यामुळे; नात्याला काळीमा फासणाऱ्या प्रकरणामुळे गाव हादरले!
- प्रवाशांसाठी मोठा दिलासा! हायवेवर आता मिळणार गाडी दुरुस्ती आणि पंचरची सुविधा; NHAI चा महत्त्वाचा निर्णय
- टेलिग्रामवरील बंदी अखेर उठली; मात्र 'मेसेज एडिटिंग' फिचर ३० जूनपर्यंत बंदच राहणार
























Subscribe to my channel




